Login

एक कथा अशीही.........2

Story Of Two Souls...Who Were Aparted By Destiny
2 वर्षापूर्वी...........

शहराच्या शेवटी असलेल्या अनाथ आश्रमात वाढदिवस साजरा होत असतो...ह्या अनाथ आश्रमात खूप लहान मोठे मूल मुली होते......कुसुमताई आणि विनायक काका अगदी सख्या मुलांसारखे सगळ्यांना जीव लावत होते......त्याचा अगदी प्रेमाने सांभाळ करत होते....
ह्या सर्व मुलांमध्ये एक सुंदर मुलगी तिथे होती.....सुंदर निळेशार पाणीदार डोळे....काळेभोर लांबसडक केस......गोरी कांती....आणि हसल्यावर गालावर पडणारी खळी.....जणू काई एक परी जमिनीवर आलेली....
हीच सुंदर मुलगी आपली नायिका आहे बरं का.......श्रावणी......सुंदर..नितळ....मनाची..

श्रावणीच्या आई बाबांचा एक भिषण अपघातात मृत्यू झाल्याने तिला कुणीतरी नातेवाईकाने इथे आणून सोडलेला......श्रावणीला आपल्या आई बाबांची खूप आठवण यायची.....पण काई वेळासाठी का होईना पण ह्या सर्व मंडळीत ती आपलं दुःख विसरायची......त्या रात्रीच्या भीषण अपघातात ती एकटीच बचावली होती.........

काही महिनेच झाले होते तिला या अनाथ आश्रमात येऊन.........आणि तोच संपूर्ण महाजन कुटुंब त्या अनाथ आश्रमात आलेला....मदतीचा हात घेऊन.......त्यात अमरेंद्र सुद्धा आलेला.....आपल्या कुटुंबासोबत....

त्या दिवशी अमरेंद्र ने श्रावणीला बघितला आणि त्याला काहीतरी आठवलं....त्याच्या मनात विचारांनी गर्दी केली......श्रावणीचा निरागस आणि मरगळलेला चेहरा बघून त्याला क्षणाक्षणाला स्वतःच्या केलेल्या चुकीची आठवण येत होती.....ज्या चुकीमुळे तो रात्री झोपू शकत नव्हता.....त्याला त्यांच्या चुकीची जाणीव होती....पण तो काहीच करू शकत नव्हता..........आजोबांना दिलेल्या वचनात तो बांधील होता....

काई झाला होता अस ज्याने श्रावणीचा आयुष्य एका क्षणात बदलला.....मध्यमवर्गीय सुखवस्तू कुटुंबातील श्रावणी...डोळ्यांमध्ये भरभर स्वप्न असलेली.....शिक्षिका बनायचे स्वप्न असणारी.....आणि सगळा संपला.......एका क्षणात....ती अनाथ पोरकी झाली......

त्या दिवशी श्रावणी खूप आनंदी होती....कारण..तिच्या मामेबहींच्या लग्नासाठी म्हणून ते पुण्याला निघालेले....श्रावणी ,तिची आई आणि बाबा...प्रवासाचा आनंद घेत घेत ते चालले होते.......लवकर ते लग्नास्थळी पोहचले.....कार्यक्रम खूप छान झाला....आता सर्व घरी जायला निघाले.....
प्रवास चालू झाला..........आणि अचानक.......एक अघटीत घडला.......परतीचा प्रवास जणू तिथेच थांबला....एक भरधाव कार वेगाने येत होती........ क्षणाचाही विलंब न होता ती रॉयल कार श्रावणीच्या वाहनाला धडकली आणि सगळा संपला.........धडक एवढी जोरात होती..की आजुबाजूच्या आणखी दोन वाहनाचा स्पोट झाला.......सगळीकडे रक्तच रक्त पसरला..........सुदैवाने म्हणाव की दुर्दैवाने श्रावणी बचावली....पण तिला शुद्ध नव्हती....इकडे समोरून येणाऱ्या रॉयल कार मधे एक तरूण भयंकर जखमी झालेला......त्याची सुद्धा शुद्ध हरपली........पोलिस ॲम्ब्युलन्स असे आवाज आजुबाजू घुमत होते....वातावरणात एक प्रकारची नीरव शांतता होती.....अघटीत घडून गेल्यानंतरची शांतता.......

🎭 Series Post

View all