Login

एक कथा अशीही.......3

The Story Of Two Souls...Who Were Aparted By Destiny
एक्सिडेंट एवढा भीषण होता की तो तरुण आणि श्रावणी सोडलं तर तास 10 लोक मृत्युमुखी पडले होते......लवकरच सगळ्या लोकांना हॉस्पिटल मधे नेण्यात आले.......तो तरुण अजूनही शुद्धीवर आला नव्हता.....पोलिस तपास करत होते......अचानक हॉस्पिटल च्या बाहेर अनेक रॉयल कार्स येऊन थांबल्या...सोबत एक अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स पण होती....त्या कार मधून मिस्टर महाजन उतरले.....तो जखमी तरुण दुसरा कुणी नसून...अमरेंद्र महाजन होता.........महाजन एम्पायर चा वारस....

लवकरच अमरेंद्र ला...त्या अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स मधून मोठ्या हॉस्पिटल मध्ये शिफ्ट करण्यात आला....आणि तिथूनच त्याला अमेरिकेला उपचारांसाठी पाठवण्यात आले......त्याचे आजोबा स्वतः अमेरिकेला सोबत गेले....हळू हळू...उपचारांमुळे अमरेंद्र ला शुद्ध आली.......त्याच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली.....

इकडे श्रावणी चा आयुष्य उध्वस्त झाला होता...क्षणात...ती पोरकी अनाथ झाली....काई दिवस उपचार झाल्यानंतर तिला पण शुद्ध आली....आणि तिला हॉस्पिटल मधून घरी पाठवण्यात आले......
आता श्रावणी खूप उदास राहू लागली होती....अश्यातच तिच्या घरावर मालकी हक्क दाखवून तिच्या नातेवाईकांनी तिला अनाथ आश्रमात आणून सोडला..........

तश्यात खूप मोठी असामी असल्यामुळे अमरेंद्रच्या आजोबांनी पोलिस केस दाबून टाकली..... अमेरांद्रचा नाव त्यांनी कुठेही येऊ दिला नाही....खरा तर एवढा भीषण अपघात अमरेंद्राच्या चुकीमुळे झाला होता....

मित्रांसोबत कार रेसिंग शर्यत करण्यामुळे............अनेक जीवना आपल्या प्राणास मुकावे लागले होते...... खेळा खेळत अनेक लोकांच्या जीवाशी खेळ झाला होता.......आणि हे सर्व प्रकरण लपवण्यात येत होता.........

इकडे श्रावणी अनाथ आश्रमात राहत होती..आणि अमरेंद्र अमेरिकेला नॉर्मल आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत होता....त्याला राहून राहून तोच दिवस आठवत होता....कस मित्रांसोबत झालेल्या शर्यतीत त्याने गाडीचा स्पीड वाढवला आणि....स्पीड कंट्रोल नाही झाल्याने...भीषण अपघात झाला......ह्या साऱ्या प्रकारात तो दोषी होता......त्याला पश्चाताप करायचा होता पण त्याच्या आजोबांना दिलेल्या वचनामुळं तो बांधील होता त्याच्या आजोबांनी त्याच्याकडून वचन घेतले होते की तो हा झालेला अपघात विसरून जाईल आणि अपघातात च्या संबंधित जेवढे काही लोक होते त्यांच्या समोर तो कधीच येणार नाही....

बेशुद्ध होण्याच्या आधी त्याने श्रावणीला एक नजर बघितलं होतं.. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली श्रावणी त्याला वारंवार आठवत होती...
जेव्हा त्याला अमेरिकेला शिफ्ट करण्यात आलं होतं तेव्हाच आजोबांनी त्याला सांगितलं होतं की तो कधीच त्या लोकांसमोर येणार नाही पण अमरेंद्रला त्या सगळ्या लोकांची माफी मागायची होती ज्या लोकांनी त्याच्या एका चुकीमुळे आपल्या कुटुंबियांना गमावलं होतं पण त्याला माहिती होतं ते लोक त्याला कधीच माफ नाही करणार........

श्रावणीला तर एका नजरेत बघितल्यावर त्याचं प्रेम तिच्यावर जडलं होतं पण जिच्यावर त्याने प्रेम केलं.... तिचाच तो दोषी होता..... अगदी आयुष्यभरासाठी... तिचे जन्मदाते आई-बाबा त्याने तिच्यापासून हिरावून घेतले होते फक्त एका खेळासाठी... तो तिच्यासमोर कधीच येऊ शकत नव्हता.......

🎭 Series Post

View all