Login

एक कथा अशीही....4

The Story Of Two Souls..Who Were Aparted By Destiny
मागच्या भागात आपण बघितलं की कशाप्रकारे श्रावणीच्या आई-वडिलांचा आणि अमरेंद्र चा एक्सीडेंट झाला आणि त्यात श्रावणीची आई वडील तिला सोडून गेले
श्रावणीच्या आठवणीमध्ये अमरेंद्र त्याचे जीवन जगण्याचा प्रयत्न करत होता पण वारंवार त्याला सारखी श्रावणी ची आठवण येत होती...... त्याला श्रावणीला भेटून सगळं सत्य सांगायचं होतं तिची माफी मागायची होती....... पण माफी मागायची त्याची हिंमत होत नव्हती कारण ती होतं ती त्याला कधीच माफ करणार नाही....... आता सुद्धा तिला अनाथ आश्रमामध्ये बघून त्याला खूप वाईट वाटलं..... तिच्या वाट्याला आलेलं दुःख हे त्याच्याच मुळे आहे हे बघून त्याला राहवलं नाही......

अशातच काही महिने निघून गेले... आणि इतक्या दिवसानंतर त्यांनी श्रावणीला पुन्हा त्या बस मध्ये पाहिलं... दुर्दैवाने त्या सुद्धा बसचा एक्सीडेंट झाला पण या वेळेस श्रावणीला वाचवायला अमरेंद्र धावून आला त्याने तातडीने तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि ती व्यवस्थित आहे ही बघ हे बघून तो तिथून निघाला...... जाताना त्याने तिच्या आई-वडिलांना फोन केला आणि तिच्या एक्सीडेंट विषयी सगळी कल्पना दिली.... आता तिच्या आई-वडिलांचे म्हणणार तर ते कोण हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांनाच पडला असेल कारण श्रावणी तर अनाथ आश्रमामध्ये राहत होती..... तर काही दिवसांपूर्वी अनाथ आश्रमामध्ये काही लोक आले होते तिथे एका कुटुंबाने श्रावणीला बघितलं त्यांच्या मुलीच्या वयाची होती खरंतर त्या दांपत्याने त्यांची मुलगी एका अपघातामध्ये गमावली होती... त्या दाम्पत्यांनी ठरवलं की ते श्रावणीला म्हणून वाढवतील त्यांच्या घरी घेऊन जातील आणि तिचा त्यांची मुलगी म्हणून स्वीकार करतील पण यासाठी त्यांनी श्रावणीला सगळ्यात आधी विचारलं.... श्रावणीला सुद्धा तिच्या आई-वडिलांची उणीव भासत होती. म्हणून तिने विचार केला जर तिला आई-वडिलांचे प्रेम मिळणार असेल तर जायला काही हरकत नाही आणि अशाप्रकारे तिला आई-वडील मिळाले आणि ती त्या दांपत्यांची मुलगी म्हणून त्यांच्या घरी राहू लागली........
आता एखाद्या सावलीप्रमाणे अमरेंद्र श्रावणीच्या पाठी उभा होता...तिच्या सुखा दुखात नकळतपणे तिला साथ देत होता.... हळूहळू श्रावणीला पण जाणीव होत होती की कोणीतरी आहे जो सारखं तिला साथ देत आहे पण तू कधीच तिच्यासमोर येत नाही.....

आता सुद्धा बसमध्ये ती त्या अनोळखी व्यक्तीचाच विचार करत होती की कोण होता तो ज्याने तिला अपघातातून वाचवलं होतं....... आणि बस मध्ये अमरेंद्र सुद्धा तिच्या पाठी होता...

पुढच्या भागात आपण बघूया अमरेंद्र आणि श्रावणी ची भेट...

🎭 Series Post

View all