Login

एक कथा अशीही........5

Story Of Two Souls....Who Were Aparted By Destiny
नेहमीप्रमाणे श्रावणी आपल्या कोचिंग क्लासेस ला जायला निघाली होती आज तर अमरेंद्र ने ठरवलं होतं की तो श्रावणीला भेटून सगळं काही खरं सांगणार होता आणि तिची माफी मागणार होता...
श्रावणी कोचिंग क्लास सेंटरला पोहोचली आणि तोच तिला समोर एक दृश्य दिसला एक तरुण एका वृद्ध व्यक्तीला रस्ता क्रॉस करून देण्यासाठी मदत करत होता तिला त्या तरुणाला कुठेतरी बघितल्या सारखं वाटलं मनातल्या मनात विचार करत सेंटरमध्ये कधी पोहोचली हे तिला कळलच नाही.....

सेंटरमध्ये पोहोचतात तिच्या दिवसाची सुरुवात झाली आणि तिने काही क्लासेस घेतले... क्लासेस संपवून ती तिच्या शिक्षकांच्या रूममध्ये बसलेली होती तोच तिच्या क्लासचे काही मुलं तिला बोलवायला आले... कुणीतरी व्यक्ती तिला भेटायला आलेल होतं...

मुलांकडून निरोप मिळतात ती आलेल्या व्यक्तीला भेटायला क्लासरूम मध्ये निघाली... क्लासरूम मध्ये पोचल्यावर तिला कळलं की हा तोच तरुण आहेत ज्याला तिने सकाळी एका वृद्ध माणसाला मदत करताना बघितलं होतं...

हा तरुण म्हणजे अमरेंद्र होता... श्रावणी जशी क्लासरूम मध्ये आली तशी अमरेंद्र ने तिला स्वतःची ओळख करून दिली.. श्रावणीने त्याला मृदू स्वरात विचारलं.. की त्याचं तिच्याकडे काय काम आहे आणि हे सुद्धा विचारायला ते विसरली नाही की ते आधी भेटले आहेत का.....

आधी त्याने तिची माफी मागितली पण तिला कळतच नव्हतं की हा अनोखी तरुण आपली माफी का मागत आहे... मग अमरेंद्र ने तिला सगळी घडलेली घटना सांगितली... तेव्हा श्रावणीचे डोळे रागाने लालबुंद झाले.... तिला अमरेंद्र वर खूप राग संताप येत होता आणि तिला तिच्या आई-बाबांची खूप आठवण येत होती...... अमरेंद्र ने श्रावणीला माफी मागताना हे सुद्धा सांगितलं की त्याचं तिच्यावर किती प्रेम आहे.......... श्रावणी खूप रागात होती.. तिला कळतच नव्हतं की आता काय करावं...... ती जोरजोराने रडायला लागली.... आणि रडण्यातच तिने कोचिंग सेंटर सोडलं आणि ती बसमध्ये जाऊन बसली..... अमरेंद्र तिची वारंवार माफी मागत होता..... तिला काहीही करून आता घरी पोहोचायचं होतं..... अमरेंद्र ला सांगितलं की यापुढे तिच्यासमोर कधीच येऊ नकोस..... तिला त्याचं तोंडही बघायचं नव्हतं.....

अशातच श्रावणी रडतच घरी पोहोचली.... अमरेंद्र एका ठिकाणी तसाच थांबू नका विचार करत ती कशाप्रकारे त्याला श्रावणीची माफी मिळेल.....

🎭 Series Post

View all