Login

एक मैत्री अशीही भाग २ अंतिम

True friendship

मागच्या भागात आपण पाहिले की नताशा कॉलेजच्या आयुष्यात वाहवत चालली होती.. तिची मैत्रीण आशा तिला समजावत होती पण ती ऐकून घेत न्हवती ...पाहू पुढे..


नातशाला खूप राग येऊ लागला आशाचा,तिला वाटत होते की आशा तिच्यावर जाळायला लागली आहे,पण असे मुळीच न्हवते,स्नेहा वाईट मुलगी होती..आशाला कळून येत होतं की ती फक्त आणि फक्त नताशाचा  वापर करून घेत आहे..नताशा स्नेहाच्या गोड बोलण्यावर भाळली...

असेच दिवस जात जाते,स्नेहा आता मुद्दामुन आशा विषयी नताशाला  भडकवत होती.. त्यामुळे नताशाने तर अगदी बोलणे सुद्धा टाकले..आशाला  वाईट वाटत होते, चांगली मैत्रीण गमावल्याच दुःख होत होते.. कितीही समजावलं तरी ती ऐकत न्हवती.. शेवटी आशा आता एकटी राहू लागली. आणि नताशा त्या ग्रुपमध्ये जिथे फक्त एकमेकांची खिल्ली उडवली जाई, पार्टी ,पिकनिक हेच.....त्यामुळे नताशाचे अभ्यासाकडे खूप दुर्लक्ष झाले...

जसजशी परीक्षा जवळ येऊ लागली, तसतसे नताशाला भीती वाटू लागली.. तिचा काहीच अभ्यास झाला न्हवता. एन्जॉय करायच्या नादात अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं तिने.कशीबशी तिने परीक्षा तर दिली.. पण तिला माहीत होतं की आता काय होणार आहे..आता ती स्नेहा आणि ग्रुप पासून लांब राहू लागली..एवढ्या दिवस स्नेहा स्वतःचा खर्च नताशाकडून भागवत होती, पण आता नताशाकडून काहीच फायदा होत नाही हे कळल्यावर स्नेहाने तिच्याशी बोलणं अचानक बंद केलं....

नताशा तिला फोन करायची तरी स्नेहा फोन उचलत न्हवती....नताशाला वाईट वाटलं,पश्चाताप झाला.. अश्या मुलीशी मैत्री केल्याचा जी फक्त स्वार्था साठी बोलत होती...

परिक्षेचा निकाल लागला.. व्हायचे ते झाले ,नताशा नापास झाली...बाकीचे सर्व तिचे फ्रेंड पास झाले.. अगदी ती स्नेहा सुद्धा....नताशा हुशार असूनसुद्धा नापास झाली...कॉलेजमध्ये गेल्यावर  तिने स्नेहाला पाहिले ,ती लगेच स्नेहाकडे गेली..पण स्नेहाने हिला न बघितल्यासारखे केले आणि  तिच्या ग्रुपमध्ये निघून गेली.......हे आशाने पाहिले...... आशाला नताशाची कीव आली.......


आशा स्वतहुन नताशाकडे गेली.... आणि बोलली .." नताशा,मी स्नेहाला  आधीच ओळखलं होतं ,ती तुझ्या पैश्याचा वापर करत होती,आणि तू तिच्याशी खऱ्या मनाने मैत्री केली..आपली एवढ्या वर्षाची मैत्री तू त्या मुलींसाठी तोडलीस..... बघितल तिने काय केले .आता साधं ती तुला ओळख सुद्धा नाही दाखवत.......

नताशा: हो ग आशा,खरंच मी खूप मोठी चूक केली,अश्या मुलीशी मैत्री करून जी फक्त स्वार्थ साधत होती....तिच्यासाठी मी तुझ्याशी मैत्री तोडली ,मला माफ कर आशा....

आशा: तू माफी काय मागते आहेस...तू मैत्री तोडली मी नाही.आणि हो पुढे कोणाशीही मैत्री करताना सावध राहा... कारण काहींना स्वतःचा फायदा करायचा असेल तर जवळ येतात आणि मित्र बनून राहतात आणि काम झालं की लांब निघून जातात.....म्हणून कोणाशीही मैत्री करताना ह्यापुढे डोकं वापरून मैत्री कर........
बरं चल हा फॉर्म भर..

नताशा:कसला आहे फॉर्म

आशा: अगं,पुन्हा परीक्षेला बसावे लागेल तुला..म्हणून फॉर्म घेऊन ठेवला आहे,आणि आता मी तुला मदत करणार परीक्षेसाठी..आणि एन्जॉयमेंट केली ती केली आता अभ्यासाकडे लक्ष दे......काय.?

नताशा: हो ग,आता अभ्यासाकडेच लक्ष देणार आणि ह्यापुढे कोणत्याही गोष्टीत वाहवत नाही जाणार......

आशा: thats like good girl......


अशी होती आशा ,नताशाची छान मैत्रीण जिने नताशाचा साथ सोडला नाही....नताशाच्या कठीण काळात सुदधा साथ सोडला नाही..मुळात तिची मैत्री ही स्वार्थासाठी न्हवती.. निरपेक्ष मैत्री होती..स्नेहाने केलेली मैत्री ही स्वार्थासाठी होती म्हणून ती तिला सोडून गेली....

ज्या नात्यात स्वार्थ असतो,ते नात जास्त काळ टिकत नाही..मग ते नातं कोणतेही असो.. बरोबर ना...

अशी होती गोड मैत्री.... आशा आणि नताशाची जी शेवटपर्यंत दोघींनी निभावली...

कशी वाटली मैत्री नक्की प्रतिक्रिया द्या.....

अश्विनी पाखरे ओगले...
लेख आवडल्यास लाईक, शेअर आणि कंमेंट नक्की द्या..तुमच्या प्रतिक्रिया खूप अनमोल आहे ..

0

🎭 Series Post

View all