Login

एक नदी सारखी मी शरयू

माझ्या आयुष्याचा प्रवाह..

आत्मचरित्र फेरी सांगितली गेली तेव्हाच विचार चालू झाले होते. काय लिहायचं आणि कसे जमेल. पण असो काही तरी स्वतः बद्दल आणि काही माझ्या आवडी बद्दल लिहायला काहीच हरकत नाहीय.
        मी शरयू. मूळची मुंबईची जन्म, लहानपण, शिक्षण, सगळे मुंबईत. तस बालपण तर खूप सुंदर गेलं म्हणजे एकदम दृष्ट लागण्यासारख. मी घरात भावंडांमध्ये मोठी, वडिलांकडून सुद्धा आणि आईकडून सुद्धा त्यामुळे लाड तर खूप झाले. लहापणापासूनच वाचनाची आवड खूप होती. लिहायला, वाचायला आवडायचं. शाळेत सुद्धा अभ्यासात हुशार होते म्हणून सगळे ओळखायचे. सगळे खूप छान चालू होत. पण त्यातच अचानक आई आणि लहान भावाचा अपघात झाला. अपघातात दोघंही गेले. आईच्या जाण्याने घरची घडीच बिघडून गेली. एका बाईच घरात असणं घराला किती घरपण देऊन जातं आणि आईची उणीव काय असते हे खूप कमी वयात कळलं. त्याच दिवशी मी मोठी झाले. खरंतर हे सगळे मला लिहायचं नव्हत पण ह्या नंतरच आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. जबाबदारी अंगावर आली. आई गेली तेव्हा सहावीत होते. तसे घरात सगळेच होते. आजी आजोबा, वडील पण त्या दिवसानंतर सगळेच बदललं होत. शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर काही तरी करायचं म्हणून बाहेर पडले. 
लिखाणा बद्दल शाळेत असताना बक्षीस मिळत होती. पण शाळा सोडल्या नंतर कधी लिखाण केलं नाही. नंतर शिक्षणात सुद्धा रस उरला नाही म्हणून फोटोग्राफी केलं.त्याला जोड म्हणून डेकोरेशन  सुद्धा करते.लॉकडाऊन पासून पुन्हा लिहायला सुरुवात केली. पहिली कथा अर्थात आईवर लिहली होती. त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला म्हणून LGBTQ वर कथा लिहायला चालू केलं. अर्थात ईरा वर कदाचित ह्या विषयावर माझी पहिली कथा होती. ती सुद्धा छान चालली. पण काही कारणास्तव ती कथा अजून अपूर्ण च आहे. ईराच्या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये वाचकप्रिय लेखक म्हणून नाव मिळवल. बस असाच शरयू चा प्रवाह चालू आहे आणि तुमच्या सोबतीने चालू राहील. पूर्ण आयुष्य लिहू शकत नाहीय. लिहण्याची हिम्मत सुद्धा होत नाहीय. हातात बळ प्राप्त होत नाहीय. त्यामुळे जेवढं स्वतः बद्दल लिहू शकले तेवढं लिहल.