चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
लघुकथा फेरी ( संघ कामिनी )
लघुकथा फेरी ( संघ कामिनी )
शीर्षक : एक नातं फुलताना
कुसुमताई बरेच दिवस बाहेर दिसल्या नाहीत म्हणून आदितीने त्यांच्या घरी त्यांना भेटायला जायचे ठरवलेले. त्या त्यांच्या कुटुंबियांसह ती राहत होती त्याच मजल्यावर राहत होत्या.
आदितीने त्यांच्या फ्लॅटची बेल वाजवली, थोड्या वेळाने त्यांच्या मुलाने दार उघडले. सुहास त्याचे नाव.
सुहास बोलला, "या ना ताई घरात."
"अरे काकी बरेच दिवस दिसल्या नाहीत, म्हणून मी त्यांची चौकशी करायला आलेय." आदिती बोलली.
"आई चार दिवस झाले आजारी आहे. तिला टायफॉइड झाला आहे." सुहासने सांगितले.
कुसुमताईंनी आतून आवाज दिला तसे आदिती त्यांना बघायला त्यांच्या बेडरूममध्ये गेली.
कुसुमताई पलंगावर आराम करत होत्या. आदितीने त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्या अशक्त झाल्या होत्या आणि तोंडाची चव गेली होती.
"आईने सकाळपासून काही खाल्ले नाहीये." सुहास म्हणाला.
"अरे तू मला एवढे दिवस का सांगितले नाहीस? काकी, आता मी तुमच्यासाठी काहीतरी खायला बनवून आणते."
असे म्हणत आदितीने घरी येऊन गरमागरम मऊ खिचडी बनवली आणि त्यांच्यासाठी घेऊन गेली.
असे म्हणत आदितीने घरी येऊन गरमागरम मऊ खिचडी बनवली आणि त्यांच्यासाठी घेऊन गेली.
कुसुमताई नको नको म्हणत असताना तिने त्यांना उठवून बसवले आणि खिचडी खाऊ घातली.
सुहास म्हणाला, "ताई, तुमच्या हातून आईने आज चांगले खाल्ले. नाहीतर चार दिवस तिला जेवणच गेले नाही."
"असं करून कसं चालेल? गोळ्यांचा कोर्स पूर्ण व्हायला हवा, तरच तुम्हाला बरे वाटेल. आता संध्याकाळीही मी तुमच्यासाठी खाऊ बनवून आणते." म्हणत तिने त्यांना औषधे दिली.
"आता तुम्ही आराम करा. मी संध्याकाळी येईन." असे सांगून ती निघून गेली. जाताना सुहासला काही मदत लागली तर सांग असं बोलून गेली.
कुसुमताईंना सुहास हा एकच मुलगा. ते दोघेच राहत होते. सुहास बॅंकेत नोकरीला होता.
संध्याकाळी आदिती कुसुमताईंसाठी वरण, भात आणि सुहाससाठी चपाती, भाजी घेऊन गेली.
"अहो ताई एवढी तसदी कशाला घ्यायची. मी आता जेवण ऑर्डर करतच होतो." सुहास बोलला.
"अरे तुम्ही मला परकी समजता का? आजारपणात घरचेच जेवण चांगले असते. मला काही त्रास पडत नाही आणि आमच्या दोघांचे जेवण बनवताना दोन चपात्या जास्त बनवल्या एवढंच."
सुहास गेले आठ दिवस बाहेरचे खाऊन कंटाळला होता. त्यालाही आदितीने आणलेले जेवण जेवून बरे वाटले. तिने कुसुमताईंना वरणभात खाऊ घातला, त्यांना औषधे दिली आणि ती जायला निघाली.
तेव्हा कुसुमताई बोलल्या,
"उद्या काही जेवण देऊ नकोस. मला आता बरे वाटत आहे तर मी हळूहळू बनवेन सगळे."
"उद्या काही जेवण देऊ नकोस. मला आता बरे वाटत आहे तर मी हळूहळू बनवेन सगळे."
"ते काही नाही... चांगलं बरं वाटेपर्यंत सकाळ, संध्याकाळ मी तुम्हाला जेवण देत जाईन." आदिती म्हणाली.
आदितीने पुढील चार-पाच दिवस कुसुमताईंना जेवण दिले, त्यांची काळजी घेतली. कुसुमताईंना आता बरे वाटू लागले होते.
आदितीने पुढील चार-पाच दिवस कुसुमताईंना जेवण दिले, त्यांची काळजी घेतली. कुसुमताईंना आता बरे वाटू लागले होते.
"आदिती, मी आता बरी झाले आहे. आता मी बनवत जाईन स्वयंपाक. एवढे दिवस माझी काळजी तू घेतली. अगं, सख्खेही कोणी अशी काळजी घेणार नाही अशी काळजी तू घेतलीस."
"अहो काकी, दोन महिन्यांपूर्वी मी इथे लग्न होऊन राहायला आले तेव्हा इथे कोणीच ओळखीचे नव्हते. सगळ्यांची दारे बंद असायची; पण त्यावेळी तुम्ही माझ्याशी आपलेपणाने बोललात, अधूनमधून भेटत राहिलात, विचारपूस करत राहिलात. मी खेड्यातून शहरात पहिल्यांदा राहायला आले तर तुम्ही मला धीर दिला. काय लागले तर हाक मार म्हणालात. त्याच आपलेपणाने मीही सगळे आनंदाने केले."
कुसुमताई बोलल्या, "या नात्याला काय नाव द्यावं बाई?"
"मायलेकीचं नातं! काकी, तुम्ही बोलला होतात ना एकदा, मला मुलगी नाही. मग आजपासून मी तुमची मुलगी."
यावर कुसुमताईंनी तिला घट्ट मिठी मारली आणि आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली.
दोन-तीन महिन्यांनी एक दिवस आदितीला जोरात चक्कर आली आणि उलट्याही झाल्या. आदितीचा नवरा आनंद घाबरून गेला आणि त्याने लगेच कुसुमताईंना बोलवून आणले.
दोन-तीन महिन्यांनी एक दिवस आदितीला जोरात चक्कर आली आणि उलट्याही झाल्या. आदितीचा नवरा आनंद घाबरून गेला आणि त्याने लगेच कुसुमताईंना बोलवून आणले.
एकंदरीत परिस्थिती त्यांच्या लक्षात आली आणि त्या बोलल्या,
"गुड न्यूज आहे असं वाटत आहे मला. तुमचे दोघांचे अभिनंदन! तुम्ही आईबाबा होणार आता."
"गुड न्यूज आहे असं वाटत आहे मला. तुमचे दोघांचे अभिनंदन! तुम्ही आईबाबा होणार आता."
दोघांनाही एकदम शॉक बसला. त्यांना मूल एवढ्या लवकर नको होते.
"आनंदाची बातमी आहे आणि तुम्ही असे तोंड पाडून का बसलात?" कुसुमताई म्हणाल्या.
"काकी, एवढ्या लवकर आम्हाला मूल नको आहे."
"काकी, एवढ्या लवकर आम्हाला मूल नको आहे."
कुसुमताईंनी दोघांची समजूत काढली आणि त्यांना वेळेत मूल झालेले चांगले हे काही उदाहरणे देऊन पटवून दिले. दोघेही मग जरा रिलॅक्स झाले. कुसुमताईंनी त्यांना सल्ला दिला की पहिले दवाखान्यात जाऊन खात्री करा. दोघेही दवाखान्यात जाऊन खात्री करून आले.
कुसुमताईंनी आदितीला धीर दिला,
"काही काळजी करू नकोस. मी आहे ना, मग निवांत रहा."
"काही काळजी करू नकोस. मी आहे ना, मग निवांत रहा."
आदितीने तिच्या आईला आणि सासू-सासऱ्यांना फोन करून ही आनंदाची बातमी कळवली तसा त्यांनाही खूप आनंद झाला होता.
आदितीला सुरुवातीचे तीन महिने उलट्यांचा खूप त्रास झाला तेव्हा कुसुमताईंनी तिची खूप काळजी घेतलेली. तिला काय खावंसं वाटतं ते बनवून खायलाही घातलं.
आदितीला सुरुवातीचे तीन महिने उलट्यांचा खूप त्रास झाला तेव्हा कुसुमताईंनी तिची खूप काळजी घेतलेली. तिला काय खावंसं वाटतं ते बनवून खायलाही घातलं.
"किती करता माझ्यासाठी..." आदिती बोलली.
यावर त्वरित कुसुमताई म्हणाल्या, "आईच्या मायेने तू माझ्या आजारपणात खूप केलंस, मला लेकीसारखा जीव लावलास. मग आता मी माझ्या लेकीसाठी थोडेफार करतेय, त्यात मला आनंद वाटतो."
एक दिवस आदितीची आई आदितीला पाहायला आली आणि या दोघींचं नातं बघून निश्चिंत मनाने परत गेली.
मायलेकीचं हे जोडलेलं नातं हळूहळू फुलत होतं. नातं सख्खं असो वा जोडलेलं, नात्याची ओढ आणि आपलेपणा दोन्हीकडेही असेल तर नातं हळूहळू फुलत बहरत जातं.
समाप्त
© सौ. सुप्रिया जाधव
२५/९/२०२५
मायलेकीचं हे जोडलेलं नातं हळूहळू फुलत होतं. नातं सख्खं असो वा जोडलेलं, नात्याची ओढ आणि आपलेपणा दोन्हीकडेही असेल तर नातं हळूहळू फुलत बहरत जातं.
समाप्त
© सौ. सुप्रिया जाधव
२५/९/२०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा