Login

एक पत्र असेही

True Love Never Dies

आकाश आणि आदिती यांचे एकमेकांवर खूप मनापासून प्रेम होते, त्यांच्या लग्नाला बघता बघता आज एक महिना पूर्ण झाला होता, आकाश भारतीय सैन्यात कार्यरत होता आणि आदिती सैन्यातील लहान मुलांच्या असलेल्या  शाळेत शिक्षिका होती.

आकाश आणि आदीतीची पहिली भेट शाळेतच झाली होती, कारण संगीता आकाशची लहान बहीणेचे मिस्टर सुद्धा त्याच्या सोबतच्या एका बॅच मध्ये होते, त्यांना आज तिला घ्यायला जायला जमणार नव्हते,आणि छोट्या रियाला आणायला आज आकाश गेला होता, तिथे आदिती आणि आकाशची विचित्र भेट झाली, तिला पाहून आकाश पूर्ण भारावून गेला, लांब सरळ केस, नीट नेसलेली साडी, बोलके डोळे, चेहऱ्यावर वेगळेच तेज, आणि बोलण्यात आत्मीयता, त्याने रियाला आपण घ्यायला आलो आहोत हे सांगितले,पण शाळेतील नियम होते अनोळखी व्यक्ती सोबत कसे पाठवावे, आकाश अदितीला खूप समजावत होता मी रियाचा मामा आहे पण आदिती एक जवाबदार शिक्षिका होती, नियमांचे पालन करणारी,बराच वेळ समजावून सुद्धा तिने रियाला नाही सोडले, न राहून शेवटी त्याने बहिणीला म्हणजे संगीताला फोन केला आणि अदितीला बोलण्यासाठी दिला, खात्री पटल्यावर तिने रियाला आकाश कडे सोपवले, आकाश जाताना सारखे मागे वळून अदितीला पाहत होता.????
अशी होती त्यांची एक वेगळी भेट, मग काय आकाश जेव्हा संधी मिळेल तेव्हा रियाला आणायला जाऊ लागला, हळूहळू बोलणे वाढू लागले, ओळख झाली, फोन नंबर एकमेकांना दिले, आता तासनतास बोलणे, बाहेर भेटणे होऊ लागले. अस म्हणातात ना जेव्हा आपल्या नशिबात योग्य व्यक्ती येणे असते तेव्हाच आपले नशीब बदलते,  असेच आकाश चे झाले, एक दिवस त्याने तिला कॉफ़ी साठी बोलावे, आदिती रेड कलरच्या टॉप आणि जीन्स मध्ये आली होती, तिला असे बघून आकाश भान हरवून गेला, आदीतीने त्याला स्वप्नातून जाग केले, आकाश ये आकाश कुठे हरवलास............... असे म्हणून जोरात हातावर चिमटा काढला, आकाश कळवळा, आणि  पटकन भानावर आला, त्याने मग तिला सगळ्यांच्या देखत थोडे फिल्मी अंदाजाने लग्नासाठी मागणी घातली, तिने क्षणभर त्याला पाहिले आणि जरा लाजून हो म्हंटले.
आकाश स्वतःच्या नशिबावर खूप खुश झाला आणि सोबत त्याने अदितीच्या हातात एक लेटर ठेवले, म्हणाला बघ माझं नशीब किती छान आहे तू माझ्या आयुष्यात आलीस आणि मला प्रमोशन मिळाले ते ही लडाखला.......माझी खूप इच्छा होती तिथे जाण्याची, तिथे जाऊन जॉईन करायचे आहे पण कधी ते अजून सांगितले नाही, ते सुद्धा लवकरच कळेल, हे ऐकून आदिती खुश झाली पण तिच्या मनात एक अनामिक भीती पण दाटली.

तिने ही भीती आकाश समोर जाहीर नाही केली, आकाशच्या आनंदावर तिचे दुःख दाखवायचे नव्हते,काही दिवसातच दोघांनी मोजक्याच लोकांत साध्या पद्धतीने लग्न केले, तिचे घरचे आणि आकाशची बहीण,तिचा नवरा काही मोजके मित्र.....???????? झाले सगळे दोघांच्या मनासारखे....आदिती आकाशची झाली.

आकाशला जणू हे एक स्वप्न वाटत होते, पण हे खरे आहे आदीतीने त्याला पुन्हा तसाच चिमटा काढला, आकाश पुन्हा कळवळला, त्याने अलगद तिला हातावर उचलले आणि टेसेवर घेऊन आला आणि तिचे डोळे बंद केले, तिचे डोळे बंद होते, मग त्याने तिला जवळ घेतले  व डोळे उघडायला सांगितले, तिच्या हातात त्याने दिलेला नवा मोबाइल व एक डायमंड रिंग होती, ती हे सगळं बघून भावूक झाली, तिच्या डोळ्यात आनंदाअश्रू आले ही रात्र दोघांसाठी अविसमर्णीय होती..........????????

असेच दिवस सरत होते तिला पाहता पाहता मातृत्वाची चाहूल लागली, तिने हे आकाशला पण अनोख्या आणि रोमँटिक पद्धतीने सांगितले, तिने त्याला घाईत फोन करून घरी बोलावले, मग दरवाजा उघडताच त्याला एक लहान खेळण्यातील डॉल दिसली आणि बाजूला तशीच सेम दुसरी डॉल पण खेळण्यातील लहान मुलाची दिसला, त्याला क्षणभर काही कळलेच नाही, बर त्या दोघांच्या समोर एक पत्र होत त्यात लिहिलं होते बाबा हे तुमच्या साठी, तो हे वाचून आनंदित झाला आणि मग त्याने अदितीला आपल्या जवळ घेतले व तिला म्हणाला ही अनमोल भेट त्याला देण्यासाठी तो आयुष्यभर तिचा ऋणी राहील☺️☺️.......
आदिती थोडी भावूक झाली, त्याने तिला मिठीत घेतले.

एक दिवस आकाश घरी आला कसल्या तरी घाईत आणि अदितीला म्हणाला अग माझं प्रमोशनचे ते पत्र कुठेय????? तिने त्याला विचारले का रे काय झाल????
तस आकाश तिला म्हणाला कदाचित त्याला दोन महिन्यांनी जावे लागले लडाखला.......

असेच दिवस जात होते तिला पाचवा महिना पण लागला, आकाश ने तिला सांगितले मला उद्याच जावे लागेल, माझें सामान भरशील का ग? तिने त्याला होकारार्थी मान हलवली आणि त्याला मदत करू लागली, तिला खरतर भरून आले होते पण आकाशला रडून बाय नाही तर हसत बाय करायचे होते, झाल सगळे व्यवस्थित समान भरून काही राहिले तर नाही ना?? असा विचार तो करत होता , त्याने अस अदितीला पण विचारले अग मी काही विसरलो तर नाही ना? आदती म्हणाली मी आणि आपले बाळ???????? हे बोलताना ती रडू लागली, त्याने तिला समजावले अग आपण मनाने जवळ आहोत, शरीराने लांब असलो तरी, हो ना!!!! चल आता हस बघू अस बाय करशील का मला????

अखेर तो दिवस सुद्धा उजाडला ज्या क्षणी तो त्याच्या लाडक्या अदितीला एकटे सोडून जाणार होता, ती थोडी उदास होती,पण तिला जाणीव होती देशसेवा पहिली आणि मग मी, पाहिले देश प्रेम मग आमचे प्रेम????????
आकाश जायला निघाला त्याने तिला गच्च मिठीत घेतले आणि म्हणाला मी लवकरच आपल्याला बाळाला आणि तुला बघायला येईल..........बाय आदती असे म्हणून तो निघाला, आदिती ने त्याला पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप दिला, तो गेल्यावर किती तरी वेळ त्याच्या पाठमोऱ्या आकृती कडे पाहत ती दारातच उभी होती, फोनची घंटी वाजली आणि ती भानावर आली, तो फोन होता आकाशच्या बहिणीचा, तिने आदितीची विचारपूस करायला फोन केला होता, खूप काळजी घे ग राणी......काही लागले तर कळव, अधून मधून मी येत जाईन तुला बघायला, आकाश मला वॉर्निंग देऊन गेलाय, माझ्या आदीतीकडे नीट लक्ष दे ग ताई????????..........

एक दिवस आदिती घरात काही कामांत गुंग होती, तिला कसलीतरी तंद्री लागली होती, मग अचानक फोन वाजला आणि तिची तंद्री भंगली, तो फोन होता आकाशच्या     सैन्यातील त्याच्या सहकारी अधिकारी यांचा त्यांनी आकाश युद्धात मरण पावला, त्याला वीरमरण आले अशी बातमी अदितीला फोन वर सांगितले, ती पूर्णपणे कोसळली तिला वाटेले सुद्धा नव्हते असे काही होईल म्हणून. तिला रडू थांबत नव्हते,ही बातमी संगीताला कळली तिला सुद्धा तिचे दुःख अनावर झाले, ती भानावर आली मग तिने आदितीला सांभाळले, कारण तिचे अश्रू थांबत नव्हते, त्यात ती प्रेग्नेंट होती, जास्त त्रास करून घेणे तिच्या आणि बाळाच्या तब्येतीला हानिकारक होते, त्याच्या सैनिक मित्राने अदितीला सांगितले सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चालू असलेल्या चीन विरुद्ध भारत घडामोडया. आणि लडाख सीमेवर अचानक चीन कडून चालू झालेल्या हमल्यात आकाशाला व त्याच्या काही साथीदारानां वीरगती मिळाली होती????????????????????

आकाशचा देह तिरंग्यात गुंडाळून तिच्या हवाली केला,ती त्याची बहीण या सगळ्यांनी जड अंतःकरणाने त्याला निरोप दिला, सैन्यातील इतर अधिकाऱ्यांनी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.... ????????, एका सैनिकाने त्यांना आकाश चे काही कपडे व वस्तू असलेला एक बॉक्स आदीतीच्या हातात दिला, तिने तो जड अंतःकरणाने घेतला व घरी आली, आपल्या लव्ह स्टोरी चा असा अंत तिने विचार पण नाही केला होता, चार दिवसांचा सुखाचा संसार माझा असा मोडेल वाटले नव्हते????????????????

आकाशचा तो बॉक्स तिने उघडून पहिला, प्रत्येक वस्तू तिला त्याची आठवण करून देत होत्या, त्या प्रत्येक वस्तूमध्ये तिला त्याची जाणीव होत होती, तिला त्यात एक पत्र सापडले, त्यात लिहिले होते,

माझी प्रिय आदू,
माझ्या कपाटात शेवटच्या कप्प्यात एक छोटा बॉक्स आहे तो मी तुला तुझ्या वाढदिवसाला देणार होतो, म्हंटल मी जवळ नसेन त्या वेळी तुला फ़ोन वर हे सरप्राईज देईन,त्या बॉक्स मध्ये माझ्या आवडीची लाल साडी, डायमंड ची रिंग व मंगळसूत्र जस तुला आवडत नाजूक साजूक, अगदी तुझ्या सारखे, आदू मी आज शरीराने लांब असलो, किंवा आज जरी इथे नसलो तरी तुझ्या सोबत तुझ्या हसण्यात, तुझ्या नजरेत आणि कायम तुझ्या मनात असेन, मी इथून परत जरी नाही आलो तरी तू मात्र असेच प्रेमाने भरलेले आयुष्य जगायचे, आपल्या बाळाला नीट सांभाळायचे आणि तू कायम माझी पत्नी म्हणून असेच सजलेले, मंगळसुत्र माझ्या नावाने घालायचे, आपले प्रेम कधी हरवून द्यायचे नाही, आपले प्रेम,आपल्या गोड आठवणी अश्याच जपून ठेव, मला जरी वीरमरण आले तरी तू एक विरपत्नी म्हणजे माझी आदिती म्हणून या समाजात ताठ मानेने जगायचं, आपल्या बाळाला सुद्धा सैन्यात भरती करायचे, देशसेवेसाठी त्याला आत्मबळ आणि शिक्षण द्यायचे, आपल्याला बाळाला त्या साऱ्या आठवणी म्हणजे त्याच्या बाबाच्या गोड गोष्टी सांग, आणि त्याला सांग तुझा बाबा पण तुझ्यावर खूप प्रेम करतो अशी माझी शेवटची इच्छा आहे.

तुझाच आकाश☺️☺️

पत्र वाचून आदिती खूप खूप रडू लागली, तिने मनात म्हंटले आकाश तुला सारे ठाऊक होते तरी ती पोस्टिंग नाकारली नाहीस, मला तुझा खूप अभिमान आहे. देश सेवा हे तुझे कर्तव्य तू चोख पार पाडले????????????????????

आदिती आज ही आकाशचे ते पत्र व  त्याच्या आठवणीत मनात साठवून त्याच्या शेवटच्या इच्छेनुसार आयुष्य जगत आहे????????????????, आजही त्याने दिलेले ते अखेरचे ते पत्र जीवापाड जपून ठेवले आहे अदितीने????????????????????????
आज अदितीला एक गोड मुलगा झाला आहे, तिने स्वतःला आणि आकाशला दिलेले वचन आजही पाळत आहे????????????????????
आजही अश्या कितीतरी विरपत्नी आपले आयुष्य असेच जगत असतील, आपले सौभाग्य देश सेवेत अर्पण करून, इथे साधं आपले पेन हरवले तरी आपण कांगावा करतो, पण त्या विरपत्नींचे काय????  आहे ना हा विचार करण्यास भाग पाडणारा प्रश्न??

@श्रावणी देशपांडे

लेख आवडल्यास मत जरूर कळवा व अभिप्राय द्या????

0