एक संसार असाही भाग..12
“आई ss!” प्रणव ने हाक मारली. मुलाचा आवाज कानावर पडताच दायमंती ताई धन्य धन्य झाल्या.
पदर तोंडाला लावून तो आवाज ऐकण्यात दंग झालेली आपली आई गप्प असल्याचं बघून प्रणवच पुढे बोलू लागला.
“आई.. बरी आहेस ना गं?”
“होय प्रणू…मी बरी आहे. तू कसा आहेस राजा?” मायलेकाची चालली विचारपूस वसंत राव दुरून ऐकत होते. आपल्यालाही आपल्या मुलाने हक्काने विचारावं अस त्यांना वाटून गेलं.
“आई, बाबा कसे आहेत? त्याची तब्बेत ठीक आहे ना? मध्यंतरी बाबा आजारी होते अस दामू कडून कळलं मला. पण त्यांचा माझ्यावरचा राग अजून गेला नाही म्हणून मला बोलताही येत नाही गं.” प्रणव मनापासून बोलत होता. लेकराला आपल्या मनातलं सगळं कसं कळत असावं? आता तर मनातल्या मनात बोललो होतो मी अन् पुढच्याच क्षणी तेच आपल्या लेकरांच्या ओठांवर यावं यासारखा दुसरा योगायोग तो काय असेल?
“होय बाळा आजारी होते बाबा…बीपी सतत वाढत असतो. तेंव्हाही तेच झाले. दाखवून घेतल आहे आपल्या नेहमीच्या डॉक्टरांना. अजून एक गोष्ट माझ्या पासून का लपवली आहेस तू?”
“कुठली ग..?”
“ बाबाच्या तब्बेतीची एवढीच काळजी आहे…त्यांचा हॉस्पिटलचां खर्च आम्हाला न सांगता तू पे करतोस पण आई बापाला भेटायला आणि त्यांच्याशी बोलायला तुझं मन धजत नाही का रे?? ” एक आई आपल्या लेकराला जाब विचारत होती. लेक दूर असूनही इतकी काळजी घेतो तर मग समोर येऊन भेटू का शकत नाही.?
“आई तुला कसं सांगू? बाबांवर माझा राग अजिबात नव्हता ग् ना तुम्हा कोणावर…राग फक्त आत्यावर होता. तिचं सतत अदितीशी लग्न कर म्हणून पाठी लागणं मला कधीच आवडलं नाही. मान्य आहे अदितीला मी आवडत होतो. पण मलाही मन होतं ना…माझ्याही काही आवडी होत्याच ना? मलाही मुक्त श्वास घ्यायचा होता गं…आई जर मी अदितीशी लग्नाला होकार दिला असता तर काहीच उपयोग झाला नसता. अदिती माझ्या सोबत कधीच चांगलं वागली नसती. फक्त मी हवा होतो. माझ्या आईवडिलांच्या शब्दाचा तिला काहीच किंमत नव्हती. तुला सांगायचं विसरलो एकदा तू मला आपल्या बागेतील फणस घेऊन आत्या कडे पाठवलं होतं आठवतं तुला??”
“हो प्रणू …”
“त्या दिवशी मी आत्या आणि अदितीचे बोलणे ऐकले.”प्रणव त्या दिवशीचा प्रसंग आठवत म्हणाला.
“काय म्हणत होत्या दोघी?” आता दयमंती ताईंना देखील ऐकायचं होतं. दुरून वसंतरावही कान देऊन ऐकत होते. कदाचित आपल्या बहिणीने आमच्या बाप लेकाच्या गोड नात्यात विष कालवले हे एव्हाना त्यांना कळून चुकलं होतं. पण ते त्यांनी दयमंतीताईना सांगितलं नव्हतं. उगीच आधीच गैरसमज झाल्यामुळे एवढी मोठी ठिणगी पडली होती त्यात पुन्हा तेल ओतून भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. कदाचित पुत्र प्रेमाने रोज अश्रू ढाळणाऱ्या दयमंती ताईंना पुन्हा त्रास देणं त्यांना योग्य वाटलं नाही. भलेही त्यांना समजलं तरी त्या आता गप्प बसणार नव्हत्या.
मध्यंतरी दोनतीन वर्षांपूर्वी वसंतरावांनी अदितीचे लग्न एका आमदार मित्राच्या मुलाशी लाऊन दिलं होतं.. घर,माणसं सारं काही चांगलं होतं.पण आईकडून जन्मत:च मिळालेली दृष्ट बुध्दी तिला सुखात ठेवणार होती का? जशी आई तशी लेक अशी एक म्हण आहे ती तंतोतंत अगदी या मायलेकीना शोभत होती. अदितीच्या उद्धवट वागण्याने तिच्या सासरची मंडळी वैतागली होती. सतत वसंतरावांच्या कानावर तक्रारी येत होत्या. घरात रोज वाद विवाद सुरूच होते. त्यामुळे अदितीच्या नवऱ्याने घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती.
मध्यंतरी दोनतीन वर्षांपूर्वी वसंतरावांनी अदितीचे लग्न एका आमदार मित्राच्या मुलाशी लाऊन दिलं होतं.. घर,माणसं सारं काही चांगलं होतं.पण आईकडून जन्मत:च मिळालेली दृष्ट बुध्दी तिला सुखात ठेवणार होती का? जशी आई तशी लेक अशी एक म्हण आहे ती तंतोतंत अगदी या मायलेकीना शोभत होती. अदितीच्या उद्धवट वागण्याने तिच्या सासरची मंडळी वैतागली होती. सतत वसंतरावांच्या कानावर तक्रारी येत होत्या. घरात रोज वाद विवाद सुरूच होते. त्यामुळे अदितीच्या नवऱ्याने घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती.
“आत्या म्हणत होती.. अदिती तू घरकाम शिकून घे”
“नाही हा मॉम मला नाही या घरकामात इंटरेस्ट.” अदिती
“उद्या तुझं प्रणवशी लग्न झाल्यानंतर तुलाच सगळे घर सांभाळायचे आहे. तेंव्हा आताच शिकून घे..” आत्या
“नाही हा मॉम.. मला नाही या कामात गुंतायचे.”अदिती
“उद्या लग्न झाल्यावर स्वयंपाक तरी यायला हवा ना? कसा करणार आहेस?” आत्या
“मी का करेल…त्या म्हातारीला लावेल ना स्वयंपाक करायला.” अदिती
“एक मिनिट.. कोण म्हातारी?”आत्या
“ प्रणवची मॉम…” अदिती डोळा मारून हसायला लागली. तिच्या हसण्यात आत्याही झाली.
“काय ss!” दयामंती ताई ओरडल्या.
“हो,आई अदितीला फक्त माझी गरज होती. ना तिला कामाची आवड होती. ना समजून घेण्यात इंटरेस्ट होता. जर मी तिच्याशी लग्न केलं असतं तर तू आई असूनही मोलकरीण म्हणून कामाला जुपले असतेस…जशी तुझी त्यांना किंमत नव्हती तशीच बाबांचीही किंमत नव्हती तिला.”
“बाप रे.. हे तर खूपच भयानक होतं. घरात येऊन महाराणी सारखा थाट हवा होता की काय तिला.?”
“असाच…”
लांब उभे राहुन बोलणे ऐकणारे वसंतराव इतके रागात होते की…थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या दयमंती ताईही त्यांना पाहून घाबरल्या.
“दायमंतीss त्याला सांग तुझी फॅमिली घेऊन तुझ्या घरी ये ह्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे खुले आहेत..!”
क्रमशः….