“व्वाव…”अमन खुश होत म्हणाले.
अमनना आवडतात म्हणून दयमंती ताईं बेसनाचे लाडू करत होत्या. दामूच्या सासूबाईंना आवडतात म्हणून रव्याचे लाडू आणि सासरे आणि दिराला आवडतात म्हणून चकल्या या सगळ्यांच्या आवडीचा घाट घातला होता. लेकीच्या सासरच्या लोकांच्या आवडी निवडी जोपासणाऱ्या या एकमेव सासूबाई असतील.
“ जावईबापू एक बोलू का?” वसंत राव हळू आवाजात बोलले.
“हो बोला ना बाबा..”
“ माझ्या मित्राच्या भावाची मुलगी आहे. अगदी तुमच्या भावाच्या वयाचीच आहे. तीही इंजिनियर आहे . मला वाटतं तुमच्या भावासाठी तुम्ही मुलगी शोधत असाल तर हे स्थळ बघायला हरकत नसावी.”
“ सांगतो घरी.. आणि आधी अविरचं काय म्हणणं आहे हे बघावं लागेल. नाव काय मुलीचं?”
“ अवनी अरविंद देशपांडे”
“छान आहे नाव…घरी बोलून बघतो.”
“ तुम्ही नका मीच बोलतो उद्या. तसही विश्वासरावांशी बोलणार होतोच. तुम्हालाही माहित असावं म्हणून विषय काढला. दामू म्हणत होती की अविर दादाला अजून दोन वर्ष लग्न करायचं नाहीय. म्हणूनच हा विषय कधी तोंडातून बाहेर पडला नाही. पण आज सकाळीच माझ्या मित्राने स्थळ बघायला सुचवलं. अन् मग वाटून गेलं. मुलगी चांगली आहे तर विश्वासरावांशी बोलून बघू.”
“चालेल बाबा बोलून घ्या तुम्ही…तसेही पप्पा मला याबाबतीत बोलले होते. कारण चार दिवसापूर्वी कंपनी कडून मला नागपूरची पोस्टिंग मिळाली आहे. त्यामुळे मला आता तिकडे दामूला घेऊन जायचा विचार होता. पण सध्या घरातले वातावरण आजारपणाने बिघडून गेलं असल्याने तूर्तास या विषयावर मी दमिनीशी बोलणार नाही. ”
“ किती वर्षासाठी नागपूरला पोस्टिंग आहे?”
“आठ किंवा दहा वर्ष असू शकते…कारण तिथल्या बँचला माझ्यासारख्या अधिकाऱ्याची गरज आहे.”
“ आणि माझ्या जावयाचा मला अभिमान आहे…पण हे तुम्ही दामूला कधी सांगणार अहात?”
(अमन जरी एका कंपनीमधे काम करत असले तरी ते लेफ्टनंट कर्नल अधिकारी आहेत. ही गोष्ट अजून कोणालाच माहीत नाही. जी फक्त तीनच लोकांना माहीत आहे. एक वसंत राव दुसरे विश्वासराव आणि तिसरं अमन यांचा मित्र अमन रावांना कंपनी आठ आठ दिवस बाहेर पाठवते असा मी उल्लेख केला होता ते यासाठीच.)
“अजून तरी विचार केला नाहीय…कंपनीच्या कामासाठी म्हणून मी माझी डुटी सांभाळतो आहे. पण त्या वेडीला हे माहीत नाहीय की प्राणप्रिय नवरा एक आर्मी ऑफिसर आहे. तिच्या मनात भीती निर्माण होईल अस नाही वागायचं मला. केंव्हा समजायचं तेंव्हा तिला समजू देत. बाबा तिला हे समजलं तर ती मला जॉब साठी बाहेर जाऊच देणार नाही. कारण आमच्या सारख्या ऑफिसरना जीवाची पर्वा नसते. कधी कधी शहीद सुद्धा व्हावं लागतं. ..”
“ जावईबापू …!” अमन पुढे काही बोलणार तोच वसंतरावानी अमनरावांच्या तोंडावर हात ठेवला.
“ देश सेवा करणाऱ्या प्रत्येक सैनिकाला कधी ना कधी भारत भूमीच्या रक्षणासाठी बलिदान द्यावच लागतं बाबा. जेंव्हा आम्ही देश सेवेची शपथ घेतो तेंव्हा आमच्यासाठी घरदार आम्हाला विसरावं लागतं. ”
“ खरं आहे…प्रत्येक सैनिकांसाठी फक्त आणि फक्त देश महत्वाचा. त्यांचं जेवढं घरादारावर प्रेम असतं त्यापेक्षा कैक पटीने आपल्या देशावर आणि आपल्या वर्दीवर प्रेम असतं… ”
“हो, बाबा”
“ अमनराव .. एक बोलू?”
“अहो बाबा विरताय काय बोलून टाका मनात जे असेल ते..”
“मला नाही माहित तुम्हाला माझे म्हणणे पटेल की नाही. पण मला वाटतं आता घरी पाळणा हलू दया. तुमच्या सततच्या मिशन आणि फिरस्थी मुळे दामू एकटी असते. तिला तुमच्या दूर असण्याचा विरह सहन करावा लागतो. बाळाच्या येण्याने तो विरह थोड्या प्रमाणात का असेना कमी व्हावा. असं मला मनापासून वाटतं.” वसंत रावांनी आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली.
“तुमचं म्हणणं बरोबर आहे बाबा.. मलाही असं मनापासून वाटतं. पण दामूला अजून थोडा वेळ हवाय. त्यामुळेच आम्ही अजून वर्षभर थांबायचं ठरवलं आहे.”
“ तरीही…” वसंत राव पुढे बोलणार तोच दयमंती ताईंनी हाक मारली.
“बाबा मी आजच या विषयावर दामुशी बोलतो.. नका टेन्शन घेऊ. सध्या महिनाभर मला सुट्टी मिळेल तेंव्हा तिला घेऊन बाहेर ठरवलं आहे. तेंव्हा दोघेही निर्णय घेऊ.”
“ठीक आहे.. माझ्या मुलीच्या सुखात माझं सुख आहे. तुम्ही असे दूर निदान बाळाच्या बाळ क्रिडेने ती तुमच्यापासून दूर राहिली तरी आनंदात राहील. बस्स तिला इतक्यात तुमच्या वर्दी विषयी काहीही बोलू नका.”
“हो बाबा…”
बोलत बोलत दोघेही जेवायला आत निघून गेले.रात्रीची जेवणे आटोपली. वसंत रावांना काही लिखित काम असल्याने ते आपल्या रूम मधे निघून गेले. दामिनी किचन अवरत होती. आणि अमन तिची वाट बघून पुरता वैतागून गेला होता. आपली बायको कधी येते आणि कधी तिला मिठीत घेऊन इतक्या दिवसांचा विरह दूर करतोय अस त्याला होऊन गेलं होतं. पण ही बया अजूनही रूम मध्ये येण्याची चींन्हे दिसेनात. त्यामुळे वैतागून तो अंगणातील लॉन वर आला. त्याने कॉल लाऊन फोन कानाला लावला.
“ काय म्हणतात प्रेम दिवाने…बायकोला भेटून कसं वाटलं?” पलीकडून विचारणा झाली.
“ इथे साधी बायको समोर येईना…आणि म्हणे भेटून कसं वाटलं?” अमन चिडून बोलला.
“ अरे यार धीर धर येईल ती…कामात असेल. कसंय न सब्र का फल मिठा होता है! ”
“ मी इथे येऊन.. आठ तास निघून गेले.. अजून बायको मिठीत सोड साधी समोर यायला मागेना..” अमन आता खरच चिडला होता.
“धीर धर येईल ती”
“तुझं काय बायकोच्या मिठीत पहुडला असशील.. लेका मला त्रास द्यायची एक संधी सोडत नाही तुम्ही दोघेही..”
“ आहों…उशीर झालाय चला झोपायला. ” दामूचां आवाज कानावर पडला. तसा फोनवर बोलणारा अमन मनातल्या मनात उड्या मारू लागला.
“ जा बाबा जा…आली बघ तुझी राणी.”
“हो,, हो बाय” अमन बोलला.
“अरे…ऐक..” तोवर पलीकडून फोन बंद झाला होता.
फोनवर बोलणारी व्यक्ती कोण असेल पाहू पुढच्या भागात.
क्रमशः…