एक संसार असाही भाग १९
“मी समोर असतानाही ती बेधडक अमनकडे बघायची.”
“बाप रे..” गौरी आश्चर्यचकित झाली होती.
“ एकदा तर मॅडमनी कहरच केला.”
“काय झालं?”
“ आमच्या वर्गाचे तास चालू होते.. आणि एक मुलगा अमनला बोलवायला आला. अमनला काही कळले नाही तो मात्र मला हा का बोलवतो आहे या अविर्तभावात माझ्याकडे पाहत होता. मग मीच त्याला बघ जा म्हणून बाहेर पाठवले. पण अमन काही जागचा हलला नाही. तास सुटल्यानंतर जाऊ म्हणून मीही शिकवणुकीकडे लक्ष देऊ लागलो.. अमन माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.. हे मोठ्या आवाजातले बोल कानावर पडले अन् सर्वजण आवाजाच्या दिशेने पाहू लागलो. तर समोर माझी लाडकी बहिण उभी होती. आणि तिच्याकडे सर्वजण आ वासून पहात होते. अमनला तर जोराचा ठसका लागला. अन् तो या धक्क्यातून सावरतो न सावरतो तोच आमचं शेंडेफळ आमच्यासमोर गुलाबाचे फुल घेऊन उभे होते..”
“मग काय झालं?”
“अमन मी तुझ्यावर खूप प्रेम करतेय…माझ्या प्रेमाचा स्वीकार करशील का?? ”
दामिनीला त्याच क्षणी चार कानाखाली देण्याचा निर्धार करून मी उठलो. अन् माझा हात मी उगारणार तोच अमनने माझा हात पकडुन डोळ्यांनीच शांत बसायला सांगितल. त्यावेळी अमनचाही मला राग आला.कारण तिच्या चुकीची शिक्षा देण्याऐवजी तो मला शिक्षा देण्यापासून अडवत होता. त्याच रागात मी त्याचा हात झिडकारला आणि माझी बॅग घेऊन मी वर्गातून बाहेर पडलो.
“मग …?” गौरी कुतूहलाने म्हणाली.
“मग…मी जाऊन गार्डन मधे बसलो. काही वेळात अमनही तिथे आला. माझा राग बघून माझ्या खांद्यावर हात ठेऊन बसत तो म्हणाला… प्रणव मला तर वाटत होतं माझ्यासारख्या मुलाच्या पाठीमागे एकही मुलगी फिरकणार नाही. पण आज माझ्यापुढे आकाश ठेगण आहे दोस्ता…प्रत्यक्षात माझ्या जिवलग मित्राच्या बहिणीने मला प्रपोज केलं आहे. आज ना मी खूप खूप खुश आहे…”
“मला नाही वाटत की हे सगळ तुम्ही गप्प ऐकून घेत असाल.. कारण आपल्या लाडक्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न समोर असताना कोणता भाऊ आपल्या मित्राची मस्करी सहन करेल?”
“बरोबर आहे गौरी.. त्या क्षणी मला माझ्या मित्राचाच राग येत होता. पण बीचाऱ्याची काहीही चूक नव्हती. कारण दामिनी एवढ्या मोठ्या चालू वर्गात आपल्याच भावासमोर एखाद्याला सहज प्रपोज करणे शक्य नव्हते.. त्यात हे जर आई बाबांना समजलं तर तिची अवस्था शब्दात सांगणे कठीण.”
भाग छोटा आहे…कथेला वाचकांनी छान छान कॉमेंट करून लिखाणासाठी मला प्रोत्साहित करा.