Login

एक संसार असाही भाग २१

संसार म्हणजे खेळ नव्हे..
एक संसार असाही भाग २१

“अमनला आर्मी मधे जायचं आहे हे ऐकून अमनच्या आईने अमनला घरातून बाहेर काढलं. त्यावेळी त्या खूप आजारी पडल्या. आणि याच कारणाने त्याने आपल्या स्वप्नास दूर ठेवून कधीही हा विषय आपल्या आईजवळ काढला नाही.”

“अरे बाप रे.. आता कधीतरी समजेलच ना?”

“ खुद्द अमन दामिनी आणि आईला एकदमच सांगणार आहे. कारण त्याची अजून दोन महिन्यांनी कॅप्टन पदोन्नती देण्यात येणार आहे. आणि त्या वेळी आपणही तिथे उपस्थित असणार आहोत.”

“खरचं!” गौरी आनंदाने म्हणाली.

“ हो…मलाही आता घरची खूप ओढ लागली आहे गौरी. आई बाबाना भेटण्यासाठी मी खूप आतुर झालोय.”

“आपण नक्की जाऊ.. मला तर माझ्या सासरी कायमच राहायचं आहे..”

“काय ss!”

“हो मग..”

“ आणि मी एकटा इथ राहू का या आपल्या घरात ?”

“ आपण हे घर मॉम डॅडना देऊन कायमच भारतात जाऊ ”

“नक्की ना..?” अजूनही प्रणवचां विश्वास बसत नव्हता की आपली बायको भारतात कायमची राहायला तयार होईल.

“ हो.. मी खूप खूष आहे माझ्या सासरी राहायला.”

“ पण विसरू नको त्या सासरची भक्कम भिंत असलेली तुझी सासू म्हणजेच माझी आई स्वभावाने कडक आहे ते…”

“अस फक्त तुम्हाला वाटतं.. मला तर माझ्या सासूची खूप सेवा करायची आहे.. त्यांच्याकडून खूप लाड करून घ्यायचे आहेत..”

तुझा प्रत्येक शब्द आणि स्वप्न मी पूर्ण करेल राणी पण माझ्या आत्याची आणि तिच्या मुलीची आपल्या संसाराला आपल्या सुखी घराला दृष्ट लागू नये बस.” प्रणव मनातच म्हणाला.

“अहो…पहाटेचे चार वाजलेत आता पहाट होईल तुम्ही झोपून घ्या दोन तास तरी..”

प्रणव आणि गौरी दोघेही जॉब करत होते. तर नकुल आपल्या शाळेला जायचा घरी त्याला सांभाळायला मेड होत्या. त्यामुळे त्या दोघांना नकुलची अजिबात काळजी करायची गरज नव्हती.

“ हो ग…तूही झोप ” प्रणव ने गौरीच्या कपाळाला किस केलं अन् तो तिला मिठीत घेऊन निद्राधीन झाला.


इकडे मात्र वेगळाच सीन सुरू होता.. रुसलेल्या बायकोला मनविण्याची मनाची तयारी करत असलेल्या अमनच्या कानावर एक गोड हाक आली. अन् त्याने लगेच मागे वळून पाहिलं.

“अहो.. उशीर झालाय झोपून घ्या.”

दिवसभर बायकोला कसं मंनवायचे याच विचारात त्याच्या परमप्रिय मित्रांनी ढीगभर दिलेले सल्ले दामिनीच्या गोड हाकेने जवळ जवळ धुडकावून लावले. म्हणतात ना संवादात मायेचा ओलावा असला की कितीही रागावलेले असू देत शेवटी प्रेमाचां विजय होतोच तसच आजही अमन आणि दामिनीच्या प्रेमाचा विजय झाला होता.

“दामिनी…कुठेतरी तुला समजून घ्यायला मी कमी पडलो. माफ कर मला.” अमन हात जोडत म्हणाला.

“आहों…हे काय करताय? खरंतर चूक तुमची नाही माझीच होती. मी सर्वांना समजून घ्यायला हव होतं. सिद्धूच्या भेटीतून आपल्यात खुप गैरसमज झाला. सत्य ना मी तुम्हाला सांगितलं ना तुम्ही मला विचारलं
सिद्धू माझ्या मामाचा मुलगा आहे. त्याला तुम्हाला भेटायचं असूनही काही कारणाने तो भेटू शकला नाही त्याच्यावतीने मी तुमची माफी मागते. दुसरी गोष्ट तुम्ही मला सिद्धूच्या मिठीत पाहिलं होतं. आमचे नाते माहित नसल्यामुळे तुमचा गैरसमज होणं योग्य होतं. कुठला नवरा आपल्या बायकोला दुसऱ्याच्या मिठीत बघून गप्प बसेल??” दामिनी आज मोठ्या मनाने आपल्या चुकीचा
पाढा वाचून दाखवत होती.डोळ्यात अश्रू जमा होत होते. आपल्यामुळे आपल्या नवऱ्याला त्रास सहन करावा लागला म्हणून ती स्वतः ला गिल्टी समजत होती.

“ दामू…मला तुझा अजिबात राग आला नाही राणी. मान्य आहे आपल्यात गैरसमज झाला आणि तो आता दूरही झाला. त्यामुळे तू काळजी करू नकोस स्वतः ला त्रास करून घेऊ नकोस..”

“आहों…पण” ती पुढे काही बोलणार तोच अमनने तिच्या मानेत हात घालून तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. विरहाच्या आगीत होरपळणारे दोन जीव आज प्रेमात आखंड बुडाले होते…!