एक संसार असाही भाग २२
इतक्या दिवसांच्या विरहाच्या आगीत होरपळून निघालेले ते दोन जीव प्रेमाच्या शांत सागरात आखंड बुडाले होते. प्रेमाच्या वर्षावात दोघेही जगाला जणू विसरून गेले होते.
“ दयमंती ss”
“बोला..”
“ अग ,आज तू अती केलं अस वाटत नाही का तुला?”
“म्हणजे? मी काय अती केलं?” वसंत रावांचे बोलणे समजले नसल्याने कपाळावर आठ्या आणून दयमंती ताईंनी विचारलं.
“ अग ,आज तू जावईबापू आल्यावर आपल्या लेकीला त्यांच्या सोबत थोडा वेळ ठेवायला पाहिजे होतेस…पण तुझ्या फराळाचा घाट काही आवरता अवरेना. जावई बापू बायकोला भेटण्यासाठी किती आतुरले होते. अन् तू लेकीला सतत ओरडत होतीस. तेही कधी नव्हे ते. मला आजिबात तुझ्याकडुन अशी अपेक्षा नव्हती.” वसंत राव मनापासून बोलले.
“ झालं तुमचं बोलून?” वसंत रावांनी बैलासारखी मान हलवली.
“ स्वतः आपल्या लेकीने घालून ठेवलेला गोंधळ पाहता मला तिची अजिबात काळजी वाटतं नाही. दुसरी गोष्ट.. साध्या एवढ्याशा कारणासाठी कोणी एका चांगल्या नवऱ्याला सोडून माहेरी येत नाहीत. जो पराक्रम तुमच्या लाडक्या लेकीने केला. तिसरी गोष्ट जावई बापू येणार ते मला माहित नव्हतं. आपले आपल्या घराण्याचे रीतिरिवाज आहेत. जे की माझ्या सासूने मला शिकवले तेच मी आजही पाळत आले. मुलीला रिकाम्या हाताने पाठवायचे नाही म्हणून हा सगळ्या फराळाचा घाट घातला यात माझी चुकी नाही. चौथी गोष्ट.. नवीन लग्न झाले म्हणून काय झाले. दोघेही संस्कारी आहेत. शिकलेले आहेत. आपल्या संसारातील गोड क्षण चार भिंतीच्या आडच असावे…ते जगाला दाखवू नये. त्यामुळे नवरा बायकोचं प्रेम कितीही पवित्र असले तरी चार भिंतीच्या आडच त्या प्रेमाला भरती यावी. समोर माणसं असताना मिठीत जाणं शोभत नाही. अस नाही की मला त्यांचं वागणे आवडले नाही. तरीही आपण एका गावात राहतो. कोणाची नजर कशी असेल सांगता येत नाही दिवसभर गावातील बायांची घरी ये जा असते.. कोणाच्या तरी तोंडून हे गावभर व्हायला नको हाच माझा मुख्य उद्देश होता. मी विसरले नाही आपलेही लव्ह मॅरेज आहे ते. पाचवी गोष्ट, एवढा सगळा फराळ मला एकटीला जमला नसता म्हणून मी माझ्या लेकीला हाताशी धरून फराळ बनवायला सुरुवात केली. यात तिला मी मुद्दामहून कामाला लावलं नव्हतं. आतापासून तिलाही रीतिरिवाजांची जान असायला हवी. आणि एक आई म्हणून मला ते योग्य वाटतं.” दयमंती ताईंच्या बोलण्यावर वसंत रावांना काय बोलावं कळेना. कारण ते जे सांगत होत्या ते अगदी विचारपूर्वक आणि बरोबरच होतं.
“अग, तरीही..” वसंत रावांचे बोलणे तोडत दयमंती ताई पुढे बोलू लागल्या.
“तुम्हाला असं वाटतं का? की मी जाणून बुजुन हे करत होते?
“ हो तर…कारण तू वागतच होतीस असे. काय वाटलं असेल जावईबापूना?
“ त्यांना काय वाटलं यापेक्षा आपण जे वागलो ते योग्य वाटते मला. कारण आपल्या मुलांना आपण संस्कारी बनवले आहे. त्या संस्कारांचा त्यांना विसर पडू नये असं मला मनापासून वाटतं. जावईबापू सूज्ञ आहेत. शिवाय तेही संस्कारी आहेत. त्यामुळे तुम्ही उगीच मनाला लावून घेऊ नका.” दयमती ताई आपल्या डोक्यावरचा चस्मा काढत बोलल्या.
“ तू तुझ्या जागी बरोबर आहेस.पण तरीही..” वसंतराव पुढे बोलणार तोच दयमती ताईंनी हाताने थांबण्याची खून केली. आणि वसंत रावांना झोपायला खुणावले. दिवसभराच्या दगदगिने बिचाऱ्या खूप थकल्या होत्या. आताच कुठे कामातून फ्री झाल्या होत्या. कोणत्याही क्षणी त्यांना झोप हवी होती. कारण कामाच्या अती ताणामुळे नेहमी त्यांचे पाय सुजत असत. घरातील सर्व कामासाठी त्यांनी बाई ठेवली होती. दोघांचा स्वयंपाक फक्त त्या स्वतः करत. बाकी नोकर चाकर होतेच.
असच पंधरा वीस मिनिटे गेली पण वसंतराव मात्र कसल्यातरी विचारात गढून गेलेले.
“मुलीचा आणि जावयाचा विचार करून झाला असेल तर निवांत झोपा.” दयमंती बोलल्या.
“तू..तुला कसं माहित की मी त्या दोघांचा विचार करत आहे.?”
“बायको आहे मी तुमची…”
“हो तेही खरच तू माझी बायको आहेस म्हणून मी आयुष्यात नशीबवान आहे…पण दयमंती त्या दोघांचे भांडण मिटले असेल का ग? की अजूनही तू तू मी मी सुरूच असेल? मला खूप काळजी वाटत आहे. माझी दामू थोडी हट्टी आहे.. अमननी तिला मनापासून समजून घ्यावं बस्स!”
“एवढीच तुम्हाला तुमच्या लेकीची काळजी आहे तर जाऊन पहात का नाही अहात?”
“आलोच..!” वसंतराव एका क्षणात उठून बाहेर जाऊ लागले.
“थांबा…तुम्ही तुमच्या लेकीची काळजी करू नका. ती तेवढी सुद्य आहे ,हुशार आहे. त्यामुळे त्या दोघांना विचार करू द्या तुम्ही झोपा.”
“अग पण…अजून ते वाद घालत बसले असतील तर? एक बाप म्हणून दोघांतील वाद संपवावा अस मला वाटत मी आलोच..” वसंतराव उठून दरवाजाजवळ गेलेही होते तोच दयमंती ताईंचा मोठा आवाज रुंमभर घुमला.
“ त्या दोघांना समजवायला जात अहात की त्यांचा रोमान्स बिघडवायला??”
क्रमशः…
माझ्या वाचका मित्र मैत्रिणीची सर्वप्रथम माफी मागते…भाग वेळेवर येत नव्हते.कारण माझ्या कादंबरी आणि कथासंग्रह या दोन पुस्तकांचां प्रकाशन सोहळा याच महिन्यात होणार होता आणि म्हणूनच मी ही कथा थांबवली होती. पण काही अपरिहार्य कारणामुळे प्रकाशन पुढच्या महिन्यात पुढे ढकलावे लागत आहे. भाग वेळेवर येत नसल्याने नाराज असलेल्या सर्वांची मी मनापासून माफी मागते..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा