Login

एक स्त्री म्हणून जगताना...2

स्त्री जन्माविषयी
मागील भागात आपण बघितले,
की सुधीर आणि सुशीला चे लग्न झाले. यथावकाश त्यांना एक कन्यारत्न प्राप्त झाले, मुलाची सुप्त आशा मनात ठेवलेल्या सुधीरला हे सत्य पचवणे अवघड झाले होते.तो अगदी वेड्यासारखा वागू लागला व त्या चिमुकलीच्या जीवावर च उठला.........

आता पुढे,


सगळ्यांनी कसतरी त्याला अडवल आणि जीवघेण्या प्रसंगातून तात्पुरती सुटका झाली.
ही गोष्ट आई-वडिलांकरवी सुधीरच्या बहिणीला समजले. तिला खूप वाईट वाटल.एक मोठी बहीण या नात्याने ती सुधीरला समजावायला गेली परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
त्याला फक्त मुलगा हवा इतकंच कळत होतं . बहिणीने समजावल्याचा सुधीरवर काहीच परिणाम झाला नाही. उलट तो तिलाच बोलू लागला, दूषणे देऊ लागला.
त्यावेळेला तिला घरात रोजची परिस्थिती कशी असेल ,आला दिवस आई-वडील आणि बिचारी वहिनी कसा काढत असेल हे कळून चुकले.

शेवटी तिने एक निर्णय घेतला व तो वहिनिला बोलून दाखवला.

तिने सांगितलं वहिनी मी जरी हीची आत्या असले तरी मी हिला तुझ्यापेक्षाही जास्त जीव लावण्याचा प्रयत्न करेन. तुला माहितीच आहे की परमेश्वराने माझी कुस कधी उजवलीच नाही.आम्ही उभयता बाळाची फार आतुरतेने वाट बघत होतो पण तो आनंदी प्रसंग परमेश्वराने कधी माझ्या झोळीत टाकलाच नाही. याच उत्तर शोधायला गेल तर जाणवत कदाचित आजच्या या दिवसासाठीच. इतकी वर्ष प्रयत्न केल्यानंतरही बाळ होत नाही म्हणून आम्ही आशा सोडून दिली होती आणि अशातच सुधीरचे भाऊजी अपघातात वारले. मला माझे एकटेपण खूप खायला उठले.

वहिनी, मला कळत नाही मी कशासाठी आणि कोणासाठी जगते आहे.

आज तुमच्या दुर्दैवाने आणि माझ्या सुदैवाने मला आयुष्य जगण्यासाठी आशेचा एक किरण दिसत आहे,तो म्हणजे आपली छकुली. वहिनी रोजचे घरात नसते वाद विवाद करण्यापेक्षा आणि त्या एका माणसामुळे घरातील इतर तीन जणांना त्रास करून घेण्यापेक्षा, जर तू परवानगी देशील तर छकुलीला मी माझ्याबरोबर घेऊन जाऊ इच्छिते.

मी तिचा अगदी मायेने सांभाळ करीन .मी वचन देते मी तिला कधीच कुठलीच कमी भासू देणार नाही. सुशीला ची नणंद असं बोलल्यावर तिला आभाळ फाटल्यासारखा वाटल. अगदी टाहो फोडून रडावसं वाटलं पण घशातून आवाज निघत नव्हता, कारण तिला रोज होणारा त्रास सहनही होत नव्हता आणि तिच्या काळजाच्या तुकड्याला दूरही करू वाटत नव्हतं.आता काय करावं असा मोठा पेच प्रसंग तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला, परंतु तिची सासू एक कैवारी म्हणून तिच्या समोर उभे राहिलि. तिच्या सासू ने तिची समजूत घातली की या रोजच्या मरण येताना भोगण्यापेक्षा आणि तुझ्याबरोबरच त्या चिमुकल्या तान्हुलीचेही हाल पाडण्यापेक्षा तिला जाऊ दे ताईकडे. माझी ताई खरंच अगदी मायेने सांभाळेल तीला

तुला कधीच जाणवणार नाही की तू तुझा काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या स्वाधीन केला आहे.तत्वतः सांगायचं झालं तर तुझी आता या परिस्थितीतून सुटका होऊ शकत नाही,कारण तुलाही माहित आहे. तुझ्या माहेरी तुला कोणीच आसरा देणार नाही आणि इथे सुधीर तुला सुखाचे दोन घास खाऊ देत नाही .
तुझे हाल उघड्या डोळ्यांनी पहावत नाही ग पोरी !!!!

जाऊ दे तिला ताईकडे. इथे राहून तिचा जीव जाण्यापेक्षा तिथे ति निदान जिवंत तरी राहील. शेवटी काळजावर दगड ठेवून सुशीला त्या चिमुकल्या पोरीला नणंदेला देण्यास तयार झाली......
0

🎭 Series Post

View all