नमस्कार मैत्रिणींनो मी एक नवोदित लेखिका आहे.या व्यासपीठावर हा माझा पहिलाच लेख आहे समीक्षात्मक टिपण्यांचे स्वागत राहील, जेणेकरून मला माझ्या लिखाणात सुधारणा करता येईल.
चला तर सुरुवात करूया आजच्या कथेला ,
आताच महिला दिन होऊन गेला.......तर आजची कथा आहे....
एक स्त्री म्हणून जगताना.......3
काय दोष होता त्या बिचारीचा??
की नकळत्या वयात ती आई बाबाच्या प्रेमाला पारखी झाली.
आता तिला तिच्या आत्याने नेलं. तिच्या आत्याकडे तिचं नामकरण केलं गेलं.तिला नाव दिलं स्मिता.
आत्या तिला खूप जीव लावत असे.अगदी ती कुठे धडपडू नये म्हणून तिच्या मागे पुढे ,मागे पुढे डोळ्यात तेल घालून तिच्यावर लक्ष ठेवत असे. तिचे बोबडे बोल आणि छम छम वाजणारे पैंजण जणू स्वर्गाचिच अनुभूती आत्याला देत असत.आता आत्याच्या जगण्यालाही एक दिशा मिळाली होती.आत्या तिच्यासाठी नव्या उमेदीने उठून उभी राहिली होती.नवऱ्याच्या जाण्याच दुःख थोडं मागे सारून स्मिताच्या भविष्यासाठी तजवीज करू पाहत होती.
आत्या तिला खूप जीव लावत असे.अगदी ती कुठे धडपडू नये म्हणून तिच्या मागे पुढे ,मागे पुढे डोळ्यात तेल घालून तिच्यावर लक्ष ठेवत असे. तिचे बोबडे बोल आणि छम छम वाजणारे पैंजण जणू स्वर्गाचिच अनुभूती आत्याला देत असत.आता आत्याच्या जगण्यालाही एक दिशा मिळाली होती.आत्या तिच्यासाठी नव्या उमेदीने उठून उभी राहिली होती.नवऱ्याच्या जाण्याच दुःख थोडं मागे सारून स्मिताच्या भविष्यासाठी तजवीज करू पाहत होती.
आत्याचा शिवणकामाचा अनुभव पाठीशी होता ,तोच तिने पुढे वापरायचा ठरवला.शिवण , टिपण करून वेळ प्रसंगी एखाद्या घरचे स्वयंपाकाचे काम करून,कधी वेळ पडली तर कोणाचे मसाले कांडून,कोणाची वाळवण करून असं करत करत आत्या स्मिताला वाढवू लागली.
स्मिता देखील जणू आपली आईच आहे असं प्रेम आत्याला लावू लागली.स्मिता आत्याची खूप काळजी घेत असे, जसजशी तिला समज येऊ लागली तस तशी ती आत्या वरचा कामाचा भार हलका करू लागली.घरकामात ,बाहेरील कामात तिला जमेल तशी मदत करू लागली.आत्यानेही तिला लिहिण्या, वाचण्यापुरतं का होईना,शिकवलं.
शाळेत पाठवल आणि अशाप्रकारे एका नकोशा कळीच हळूहळू सुगंधी फुलात रूपांतर होऊ लागलं .तिचं वय वाढत होतं तसं आत्याच्या मनात कालवाकालव होत होती. समाज चांगला नाही, मी स्वतःच असं विधवेच जगणं जगते.लोक माझ्याकडे एक संधी म्हणून पाहतात,मी प्रतिकार करते पण या लहानशा पोरीने काय कराव.
तिचा सांभाळ करायला मी भक्कम असले तरी एक सक्षम हात पाठीवर असावा लागतो ,तो माझ्याकडे नाही .
तिचा सांभाळ करायला मी भक्कम असले तरी एक सक्षम हात पाठीवर असावा लागतो ,तो माझ्याकडे नाही .
मला लवकरच या पोरीचं लग्न केलं पाहिजे. लवकरात लवकर हिला सासरी सुखात नांदताना मला पाहायचं आहे हाच ध्यास आत्या उराशी घेऊन बसली.आत्याला दिवस-रात्र तिच्या लग्नाचे स्वप्न पडू लागले.तस आत्याने दोन चार ठिकाणी सांगूनही ठेवल.
स्मिता होतीच इतकी सुंदर की फक्त तोंडातून शब्द काढण्याचा अवकाश होता. तिच्यासाठी बरीच स्थळ सांगून येऊ लागली.
आत्याने विचार केला उद्याला असं नको व्हायला कि ती तुमची स्वतःची मुलगी नव्हती म्हणून तुम्ही फार काही व्यवस्थित पाहिलं नाही .एक शब्द तिच्या आई-वडिलांना सांगायला हवा.हा विचार आत्याच्या मनात डोकावू लागला ,पण दुसरं मन म्हणत होतं की जरी तो माझा सख्खा भाऊ असला तरी आज सतरा वर्षाची पोर झाली अजूनही त्याने एकदाही तिची चौकशी केली नाही .
खरंच त्याच बापाचं काळीज आहे का ?
खरंच त्याला काही सांगून विचारून उपयोग आहे का ?
पण शेवटी मनापुढे भीती जिंकली आणि कोणी नाव ठेवू नये म्हणून का होईना आत्याने भावाच्या कानावर टाकण्याच ठरवलं. दुसऱ्याच दिवशी सकाळी सहाच्या एसटीने आत्या गावी गेली.
तिने भाऊ , वहिनी आई-बाबांना बसवून सांगितलं की स्मिता आता सतरा वर्षाची झाली आहे.आता तिच्या लग्नाचं बघायला हवं.माझंही शरीर आता साथ देईनास झालं आहे आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटना बघून माझ्या जीवाचं पाणी पाणी होतं. त्यापेक्षा असं वाटतं की पोर दिल्या घरी तरी सुखी राहील. एक चांगलं माहितीतल स्थळ आलं होतं.सरकारी नोकरी,घरदार ,सगळं काही छान आहे पण मला वाटलं की काही ठरवण्याआधी एकदा तुमच्या कानावर घालाव म्हणून मी आज तुम्हाला भेटायला आले. आज कधी नव्हे तर तिचा बाप माया पाजळायला लागला ,
म्हणे माझ्या पोरीच्या लग्नाचा हक्क तुला कोणी दिला ??
मला न विचारता तू लग्न ठरवायला निघालीच कशी ???
खरंतर बहिणीला हसावं की रडावं तेच समजेना. इतक्या वर्षात पोरीकडे फिरूनही न पाहणारा बाप, आज तिच्यावर हक्क सांगत होता आणि सांभाळ करणाऱ्या बहिणीला म्हणत होता,
की तुला तिच्या लग्नाचा हक्क दिलाच कोणी??
पण शेवटी बहिणीचं काळीज हो ते...तिलाही वाटलं की आता लग्नासारखी मुलगी झाली, त्याला त्याची चूक उमजली असेल, म्हणून तिनेही मागेपुढे विचार न करता त्याला सांगितलं.
तू स्थळ बघ ,तू म्हणशील तिथेच आपण मुलगी देऊ.
झालं !!!
सुधीरला तर हेच हवं होतं. त्याने लगेच पुढच्या दोन दिवसात घरात निर्णय दिला, की मी एक स्थळ बघितल आहे. मुलगा तालुक्याच्या गावी कामाला आहे,घरदार आहे ,सगळं चांगल आहे.मला माझी मुलगी तिथेच द्यायची आहे .
सगळ्यांनीही जास्त वादविवाद न करता, त्याच्या हो ला हो करायच ठरवलं आणि शेवटी एकदाच लग्न ठरलं. लग्न ठरलं खरं पण नवी नवलाई काही वाटेचना .नवऱ्या मुलाला ना नवरीशी भेटण्याची ओढ होती ,ना बोलण्याची.
कस होईल स्मिताच लग्न??????
काय असेल तीच भविष्य??????
काय असेल तीच भविष्य??????
पाहूया पुढील भागात....
क्रमशः
क्रमशः
लेखिका.किर्ती अरुण पाटील
(Kirtibhushan)
(Kirtibhushan)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा