Login

एक स्त्री म्हणून जगताना...5

स्त्री जन्माविषयी
ती लेकरांसाठीच ती हाडाची काड करत होती, रक्ताचे पाणी करत होती, मेहनत करत होती, अशाच एका रणरणत्या दुपारी ती घरी आली. थोडा वेळ ओसरीवर बसली.तेवढ्यात समोर पोलिसांचा ताफा दिसला. पोलिसांना बघताच तिच्या पोटात गोळाच आला. तरी हिंमत करून तिने त्यांना विचारलं की काय झालं.पोलिसांनी तिच्या नवऱ्याबद्दल विचारलं, की तो कुठे आहे घरात आहे का ?तिने नाही अस सांगितल. त्यांनी घराची झडती घेतली, त्यांना काहीच सापडला नाही. ते चिडले ,तिथून निघाले, पण जाता जाता एक गोष्ट सांगून गेले की तिच्या नवऱ्याने खून केला आहे. हो !!! बरोबर वाचताय तुम्ही !!! खूनच...... ती उभ्या जागीच स्तब्ध झाली.तिच्या तर डोळ्यातले अश्रूच थांबले .तिला कळेच ना काय झालं ??त्याच्याकडून फार अपेक्षा नसल्या ,तरी तो एक दिवस असा दिवस दाखवेल, असा विचारही तिने केला नव्हता. मुलं रडवेली झाली होती .पोलिसांना बघून घाबरून गेली होती .तिला त्यांच्या रडण्याचा आवाज आला आणि तिला परिस्थितीची जाणीव झाली.ती पुन्हा एकदा पदर खोचून उभी राहिली तिच्या मुलांसाठी. नंतर तिला आजूबाजूच्यांकडूनच समजल ,की त्याने दारूच्या नशेत पैशांच्या वादा मुळे एका मित्राचा खून केला.तिला माहित होतं रडत बसून उपयोग नाही. ती जगत राहिली, रडत राहिली ,तिच्या मुलांसाठी तिने ते सार केलं जे एका बापाने सुद्धा आपल्या मुलांसाठी केल नसत. तिच्या परीने ती उत्तम सगळं सांभाळत होती. पण शेवटी समाजच तो. तिच्या एकटी असणे,असण्यावर बोट ठेवू लागला, तिला एक गरजू नव्हे तर संधी म्हणून पाहू लागला. तिचा छळ करू लागला. ती खूप धडाडी ची होती सार सहन करत राहिली व मुलांना घडवत राहिली आणि आज तिला जाणवलं ज्या जागी काही वर्षांपूर्वी ती होती ,त्या जागी आज तिची मुलगी आहे. हो!!!! तिची मुलगी लग्नाच्या वयात आली, तेव्हा विचार मनात आला की माझ्या पोरीचं भविष्य माझ्यासारखं तर नसेल ना?? पण साऱ्या दुःखद आठवणी झटकून तिने विनवले तिच्या दिराला आणि इतर काही जणांना देखील ,की तिच्यासाठी स्थळ बघा. तिचं लग्न करायचं आहे. यथावकाश एक सुंदर असं स्थळ सांगून आलं. मुलगा पुण्याला नोकरीला आहे, घर, शेतीवाडी, गाडी सगळ आहे. मुलगा निर्व्यसनी आहे आणि मुख्य म्हणजे समंजस आणि सालास आहे .सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि लग्न ठरलं .सगळी खरेदी झाली, हौसमौज झाली, साक्षगंध झाला, हळद लागली आज लग्नाचा दिवस.स्मिता आज अशीच शांत बसलेली असताना आताच्या क्षणी तिला नवऱ्याची कमतरता सगळ्यात जास्त भासू लागली, कारण नवरा असूनही तो तिच्यासाठी नसल्यासारखाच होता. तिने आजपर्यंतची सगळी आव्हाने एकटीनेच पेलली होती.तिला मातृत्व देण्यास तो एक निमित्त मात्र होता, पण त्याने बाप म्हणून कधी लेकराला हातातही घेतलं नव्हतं.तिच्या डोळ्यासमोर सगळा भूतकाळ धावू लागला. तिला आठवल,जन्म होताच ती कशी नकोशी होती.का तिचा सांभाळ तिच्या आत्याला करावा लागला. आत्याकडे राहत असताना एक बिन बापाची पोर, घरात कोणीच पुरुष नाही ,म्हणून समाजाच्या कोणत्या नजरांचा तिला सामना करावा लागला.कस कसायच्या काळजाच्या बापाने तिला एका नीच माणसाला विकल.कसा तिने तरीही संसाराचा डोलारा सांभाळाला.कस तिने लेकरांना मोठ केलं .कसं तिने लेकराला घडवलं, पण आज एक खंत तिच्या मनात होती. ती म्हणजे ती सवाष्ण असूनही तिच्या एकुलता एक लेकीच कन्यादान करू शकत नव्हती, कारण आपली समाज व्यवस्था अशी आहे की ती एकल पालकत्व अजूनही स्वीकारत नाही. जरी तिने जन्मापासून आई व बाप दोघांची जबाबदारी पार पाडली ,तरी आज तिच्याच लेकीचे कन्यादान ती करू शकली नाही कारण तिच्या स्त्रीत्वाला पूर्णत्व देणारा तो तर तुरुंगात जन्मठेप भोगत होता.जरी ती आयुष्यभर एकटी सगळ्यांशी लढली.....तरी आजच्या विधीला फक्त तिला मातृत्व देऊन साऱ्या जबाबदारीपासून नामानिराळा राहणारा पण बापच लेबल मिळवणारा 'तो ' गरजेचा होता..झालं त्याक्षणी तिच्या काळजात एक अस्फुट कळ उमटली.डोळे बंद झाले, गरम पाण्याचे दोन थेंब अलगद तिच्या गालावर आले आणि निघाली ती अनंताच्या प्रवासाला... सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून ,सगळे हाल, दुःख, सायास भोगून,आपल्या पुढच्या प्रवासाला निघाली , हो बरोबरच वाचताय तुम्ही याच क्षणी तिचा जीवनप्रवास थांबला.....मांडवात एकच कल्लोळ माजला नवरी मुलीची आई हार्ट अटॅक ने गेली......सगळ्या वेदना तिच्या काळजात साठवून गेली...
सगळ्यांकडून उत्तराची देखील अपेक्षा आहे.....आपण स्त्री सक्षमीकरण ,स्वावलंबनाच्या गप्पा मारतो.....पण खर सांगायचं झालं तर हे वार एक विशिष्ट मर्यादेपर्यंत सिमित आहे.......शेवटी आपल्यातील काही स्त्रीया जे भोग भोगतायत ते आजतागायत भोगतायत......यात कोण चूक आणि कोण बरोबर हा प्रश्न अनुत्तरीत च राहतोय........


समाप्त

लेखिका. किर्ती अरुण पाटील

(Kirtibhushan)
0

🎭 Series Post

View all