Login

एक तू एक मी

I Like To Read....


एक तू एक मी.
भाग पहिला


(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.)

   संध्याकाळचे साडेसात वाजले होते.गणपती मंदिरात आरती चालू होती. लोक तल्लीन झाले होते. मंदिराच्या आत खूप गर्दी होती. दरवाज्याला चिकटून एक तरुण मुलगी हात जोडून उभी होती.
अश्विनी कदम. सावळा रंग, घारे डोळे, मध्यम बांधा, कमरेपर्यंत लांब वेणी ,नेहमी हसतमुख चेहरा .वय २२,बी.कॉम. पूर्ण झाल्यावर,एक वर्षाचा कम्प्युटर डिप्लोमा केला. एका प्रायवेट कंपनीत अकाउंट असिस्टंट म्हणून नोकरीवर रुजू झाली. मानसी आणि माधवची मोठी मुलगी. एक लहान भाऊ अथर्व.अस छोटसं चौकोनी कुटुंब.

आई सकाळी जोशी काकूं कडे पोळ्या करायला जात असे. तर बाबा एका कपड्यांच्या दुकानात सेल्समन ची नोकरी करतात . आणि अथर्व बी. ए. च्या शेवटच्या वर्षाला शिकत आहे.
अश्विनी नोकरीला लागून नुकतच एक वर्ष पूर्ण झालं होतं. ती दर संकष्टी चतुर्थीला तिच्या लाडक्या बाप्पाला भेटायला येत असते. आजपण आली होती.
पण, आज मंदिरात इतकी गर्दी बघून ती बाहेरच उभी राहून आरतीचा आनंद घेत होती.
" आज उशीर होईल बहुदा घरी जायला,हरकत नाही कित्ती दिवसांनी आरती ऐकायला मिळाली"अश्विनी मनातच म्हणली.
मंदिरातील गर्दी हळूहळू कमी व्हायला लागली. आरती झाली होती. अश्विनने हात जोडून मनोभावे गणपतीला वंदन केले. पिशवीतील दुर्वा फुले वाहिली.आणि बाहेर आली.बाहेर बसलेल्या बाईला मिठाईचा बॉक्स देऊन घराच्या दिशेने निघाली.
________
"अश्वि, अग काय हे, साढे आठ वाजले ,किती उशीर रोज सात वाजता येतेस.एक फोन नाही करता येत का? निदान मेसेज तरी करायचा,कुठे होतीस"? आईने प्रश्नांची मालिका सुरू केली.
"अगं, हो किती प्रश्न विचारतेस तिला आत तर येऊ दे किती घाम आलाय बघ ,म्हणत अथर्वने पाण्याचा ग्लास अश्विनीच्या हातात दिला "ताई आधी पाणी पी, घे."
हो, भरभर आल्यामुळे तिला तहान लागली होती.
तिने पटकन पाणी पिले.
बंधुप्रेम उफाळून आलयं, म्हणत आई किचनमध्ये गेली.
आई ,जरा बाहेर येना ग." अश्विनीने आईला हाक मारली.
"काय ग बोल," आई दरवाज्यातून बोलली.
अगं, मंदिरात गेले होते,आरती सुरू होती.म्हणून उशीर झाला. अश्विनी
"ऑफीस सहा वाजता सुटत. आरती सातला सुरू होते.
मंदिर घरापासून फक्त पंधरा मिनटाच्या अंतरावर आहे. मग मधल्या वेळेत कुठे होतीस." आईने तिरक्या नजरेने तिच्याकडे पाहिले.
"वॉव, आई तू तर सी आय डी मध्ये जायला पाहिजे", राहुल मध्येच हसत बोलला.
"तू गप्प बस. प्रत्येक वयात आलेल्या मुलीची आई ही
सी आय डी च असते.त्यात जर ती ऑफासला जात असेल तर,लक्ष ठेवावच लागत. अश्वि , माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. काही प्रॉब्लेम आहे का? कुठे गेली होतीस सांग बरं".
"नाही ग, आई काहीच प्रॉब्लेम नाहीये, तू का एव्हढा विचार करतेस. शान्त हो, आधी आणि इथे माझ्या बाजूला बस".
"बसून काय करू, मला किचन आवरायचंय. तिथूनच बोल मी इथूनच ऐकते". आई
"नाही, तू इकडे ये".अश्विनी
"बरं, बोला". आई
तेव्हढयात बाबा आले."अरे वा कसली मिटिंग चालू आहे .
मला पण घ्या की तुमच्यात".बाबा
\"बाबा, बरं झालं तुम्ही आलात,गुड हे तर खूपच छान".
"छान, काय लवकर बोल".आई
"ओके, ठीक आहे.आई तू इथे बस. बाबा तुम्हीही बाजूला बसा. आई डोळे बंद कर. आणि हात पुढे कर".
बरं, म्हणत आईने हात पुढे केले.
आश्विनीने आईच्या हातात एक पिशवी ठेवली."आई,आता डोळे उघड आणि बघ सरप्राईज फॉर यु."


क्रमशः
----- मधुरा महेश.

अश्विनी ने काय आणलं असेल?
पुढच्या भागात वाचा. कथा कशी वाटली, ते नक्की सांगा.
Thank u ira