Login

एका हाताने टाळी वाजत नाही

Jalad Lekhan Eka Hatane Tali Vajat Nahi
एका हाताने टाळी वाजत नाही भाग - १

​"अगं वनिता, किती ते सुनेचे लाड! आता नवीन आहे; पण थोड्या दिवसांनी तुझ्या ह्या लाडानं त ती तुझ्या डोक्यावर कधी बसेल याचा तुला पत्ताही लागणार नाही!"

​"हो, मान्य आहे. एकुलता एक लेक आहे. एकुलती एक सून आहे; पण काय आहे ना, सून काय आणि लेक काय, तिथंही थोडे अंतर ठेव!"
​"शेवटी आई ती आईच आणि सासू ती सासूच, बाई! किती जीव लावा, काही उपयोग होत नाही. माझा स्वानुभव आहे गं!"
​वनिताची ताई चार दिवस वनिताकडे राहायला आली होती. वनिताचे आणि तिच्या सुनेचे बॉन्डिंग पाहून तिला कुठेतरी खटकत होते; म्हणून ती वनिताचे कान भरण्याचा प्रयत्न करत होती.

​वनिता तशी साधीभोळी, पण नवीन जमान्याप्रमाणे चालणारी. तिचं सासू-सुनेचं चांगलं मेतकूट जमलेलं होतं, त्यामुळे सगळे मस्त होते.

​वनिताची सून सायली नोकरी करायची. घरात तिला सगळे माहेरी जसे हाक मारायचे, तसेच इकडेही 'सायू' म्हणूनच हाक मारायचे.

​तर ही सायू ऑफिसला जाताना जमेल तेवढे घरातील थोडीफार कामे आवरणे, म्हणजे सासुबाईंना कामात हातभार लावण्याचा प्रयत्न करायची.
​पण वनिता तिला म्हणायची, "सायू, एवढी दगदग नको करूस. माझं रूटीन नको बदलून टाकू. मी घरीच असते. बाबांचा आणि शशांकचा डबा बनवते. त्यात तुझ्या दोन पोळ्या आणि थोडी भाजी जास्तीची करायला मला जड नाही. नको टेंशन घेऊ.

मुख्य म्हणजे हे सासर आहे हेच मुळी समजू नकोस. नवानवलाईचे दिवस एन्जॉय कर. काळजी करू नकोस. मी शशांकबरोबर तुझी पण आईच आहे बरं का, सासू नाही! 'सासू म्हणजे सारख्या सूचना' हे पहिले मनातून काढून टाक बरं का!"

​'आई' म्हणून तेव्हाच सायूनं वनिताला मिठी मारली आणि म्हणाली, "अहो आईंची वनिता ए आई झाली!"

​सायू माहेरी गेली, तरी सासरचे कौतुक करताना थकायची नाही. "शशांकचे बाबा हे आणतात, आई हे करतात. बाबा मला गाडीवर घेऊन जातात, मला स्टेशनपर्यंत सोडतात. सारखे 'सायू, सायू' करतात. आई पण तशाच."
​शशांक तर तिला म्हणायचा, "कित्येकदा एकटा होतो, तेव्हाच बरा होतो. आई-बाबांचे प्रेम माझ्या एकट्यालाच मिळत होते. ही वाटेकरी आली नाही, सगळे लाड हिच्याच वाट्याला गेले."
​सायू म्हणून शशांकला 'जळका बिब्बा' म्हणूनच चिडवायची.

वनिता पण सायूची बडबड, तिचं घरातलं बागडणं बघून तिच्यात आपल्या लेकीचं रूपडं बघायची. 'सायूला हे आवडतं, सायूला ते आवडतं.' बाजारात गेले तरी सायूसाठी खास खरेदी व्हायची. सायू पण 'कित्ती छान' म्हणून ती स्विकारायची.

​सायू पण दोन्हीही आईंसाठी म्हणजे तिच्या आईसाठी आणि शशांकच्या आईसाठी सारख्याच गोष्टी खरेदी करायची आणि दोघींच्याही समोर ठेवायची, 'ज्याला जो रंग आवडतो तो घ्या' म्हणायची. म्हणून तिथं लपाछपवी नव्हती. सासर-माहेरचे पण छान गुळपीठ होते.

​या वातावरणाचा वनिताच्या ताईवर का बरं परिणाम व्हायचा, पाहूया पुढील भागात...
​क्रमशः
0

🎭 Series Post

View all