Login

एका दयाची गोष्ट

एक दयाची गोष्ट
एका दयाची गोष्ट

रप रप कपडे आपटत होती ती ,तिला काही कळेना हे दोघे नवरा बायको आहेत की भांडणाचे मशीन आहेत ,सारखे नुसते भांडत भांडत रहातात ,भांडत असताना सोबत tv बघतात ,जेवण सोबत करतात ,त्याच्या ताटातले संपले हे त्याला कळत नाही पण ह्या भांडणाऱ्या बायकोला कळते...त्याला ठसका लागताच तो उठून पाणी घेत नाही पण ती मात्र लगेच त्याच्या तोंडालाच ग्लास लावते...परत राग काढल्या सारखे पाठीत थपाटे टाकते...तो ही लगेच तिला म्हणतो बास झालं राग काढून..जीव घेशील का ,आता ही नवी पद्धत काढली का मन सोक्त मारायची...

काय चालू असते देव जाणे ह्या मराठी लोकांचे ,त्यात उठले सुटले की भांडणात माझे नाव का घेतात सारखे मध्ये मध्ये ,ह्यांना एकदाच सांगून ठेवणार आहे ,खबरदार माझे जर विनाकारण नाव घेतले तर ..आता पुन्हा माझे नाव तर घेऊ द्या बघतेच..!!!

"अरे तुला ठसका लागला तेव्हा मी पाणी देते.."

"तुला तुझी सोय करता येत नाही का पाण्याची ,मी कुठे तुझे पाणी अडवले...मी तर बॉटल तुलाच सोपवतो ,तुला दया येते तशी मला दया येत नाही.."

"मला दया येते पण तुला दया का येत नाही.."

"माझी दया आटली आहे ,म्हणून दया येत नाही."

"तु दयेला पात्रच नाहीस माझ्या.."

"गेली तुझी दया खड्ड्यात.."

"तुला दया कशी असते दाखवते तेच चूक करते.."

'तुझी दया गेली उडत.." तो

" तुझ्या सारख्याला दया ची सावली ही पडू देऊ वाटत नाही.." ती

"तुझी दया येईल हे कधी होऊ देणार नाही " तो

"तुझी आणि दयेची गाठ भेटच होंत नाही ,होणार नाही..असा बिन दयाचा रहाशील आयुष्यभर.."

तुला आता दया ह्या शब्दावरून कोणतेच वाक्य सुचत नव्हते त्याला आठवत ही नव्हते ,तहान लागली होती बोलून बोलून ,गळा ही सुकला होता...बायको म्हणजे दयावान पण दया आणि आपला छत्तीस चा आकडा म्हणून ती गळ्यात पडली नाही..

"दया कधीच गळ्यात पडली नाही ,माझा आणि तिचा शप्पथ कुठेच संबंध आला नाही..येणार ही नाही..तू आणि ती तुझी दया काय गोंधळ घालायचा ते घाला ,मी अजिबात भाग घेणार नाही..."

"दया अशी फुकट येत नसते ,तिला ही किंमत मोजते...दया असेल तर लोक विचारतात तुम्हाला ,तुम्ही दया करून पहा...दया लावून पहा...देयेचा अनुभव येता जाता घेत जा..किती छान अनुभूती असते दया हे कळेल.."

तितक्यात त्यांच्या समोर त्यांची कामवाली येऊन उभी राहते ,कमरेवर हात असतात आणि डोळे रागाने मोठे झालेले असतात...

'हे काय है भैया दया दया ,तुम्ही भांडा पण माझ्या नावाने का भांडतात..दयाच का पाहिजे तुम्हाला.. मी इथे आता कामच करणार नाही ..मला तर तुमचे बोलणे ऐकून पागल झाल्या सारखे वाटते..माझ्या वर दया करा माझे पैसे द्या आणि सोडा ह्या भांडणातून..माझे इतके वय झाले पण इतक्या वेळेस माझ्या आईने ही माझे नाव घेतले नसेल हो.."

आता दया काम सोडून गेली ,बाहेर पडताच तिला श्रद्धा भेटली तिने तिची कहाणी श्रद्धाला सांगितली तर श्रद्धा ही म्हणाली ,हो ते माझ्या बाबतीत ही हेच करत होते.. भांडणात रोज माझे नाव घेत होते..मला तर नको नको झाले होते माझेच नाव ऐकून आणि मी मग काम सोडले..

दोघी काम सोडून गेल्यानंतर त्यांच्या घरी आता नवीन मावशी आली होती ,तिचे नाव माया होते..

त्यांनी ठरवले जर माया चांगले काम करणारी नसेल तर पुढच्या भांडणात तिचे नाव घ्यायचे
©®अनुराधा आंधळे पालवे
0