एकमेकांना समजून घेवू भाग 1
©️®️शिल्पा सुतार
विषय त्या वळणावर
बर्याच गोष्टी घडतात. सगळं सांभाळून पुढे जायचं.
बर्याच गोष्टी घडतात. सगळं सांभाळून पुढे जायचं.
******
मध्यमवर्गीय वस्तीत दोन बेडरूमचा बंगला होता. आजुबाजुला छान झाडी होती. वस्ती जुनी होती. राजेश रावांनी त्या काळी इन्व्हेस्टमेंट करून घर बांधल होतं. आता ते रिटायर झाले होते. मुलगा सूने सोबत तिथेच रहात होते. आमच घर आहे. यांनी वेळेवर गुंतवणूक केली. त्या गोष्टीचा सरला ताईंना खूप अभिमान होता. तस त्या वारंवार बोलून दाखवत होत्या. एक मुलगा एक मुलगी अस सुखी कुटुंब होत. दोघ मुलांचे लग्न झाले होते. मुलगी जवळ रहायला होती.
हॉल मधे एक फोटो फ्रेम दिमाखात लावलेली होती. सरला ताई, दिनेश राव खुर्चीत बसले होते. एका बाजूला आरती, सचिन त्यांचा मुलगा सोनू. दुसर्या बाजूला नणंद प्रीती तिचा नवरा सुहास होते. वरवर सुखी दिसणार्या कुटुंबात खूप वाद होते. म्हणजे सरला ताई, आरती यांच अजिबात पटत नव्हतं.
दुपारच जेवण झालं. आरती रूम मधे झोपली होती. सरला ताई आवाज देत होत्या.
"चार वाजले चहा मिळेल का?"
" थोड उशिराने आवरलं. थोड्या वेळाने करते. " आरती म्हणाली. सोनु दुपारी शाळेतून येत होता. तो अजून झोपलेला होता. तेवढाच तिला आराम होत होता. नंतर त्याचा होमवर्क घ्यायचा. तो खेळायला गेला की रात्रीचा स्वयंपाक बरेच कामे होते. सोनु पाच वर्षाचा होता.
सरला ताई खूप बडबड करत होत्या. या घरात एक कप चहा वेळेवर मिळेल तर शप्पथ. आरती काही ऐकत नाही. आमची सासू समोर बोलायची हिम्मत नव्हती. एक ना धड अस आहे. तिला काहीही येत नाही. सगळे काम रडत कडत करते. सांगणार कोणाला आपले दात आपले ओठ. चहा झाला असता तर बर वाटल असत. "
" पुरे सरला जरा गप्प हो. बोलण्यावर जरा कंट्रोल ठेवत जा. अर्धा तासाने चहा घेतला तर काय फरक पडतो. आपण लवकर जेवलो. आरती सोनूच आवरून जेवते. त्याचा अभ्यास असतो. एवढ वाटत तर स्वतः एक कप चहा करून घे. " राजेश राव म्हणाले.
"हो का मला मूल नव्हते का? तेव्हा तुम्हाला चारचे सव्वा चार झालेले चालत नव्हते. सगळया गोष्टी वेळेवर व्हायला हव्या होत्या. आता काय झालं? एवढ वाटत तर तुम्ही मला चहा करून द्या ." सरला ताई बडबड करत होत्या.
" काही म्हटलं की माझ्या गळ्यात गम्मत येते." राजेश राव पुस्तक वाचत होते.
आरती आली. तिने दोन कप चहा टेबलवर ठेवला. ती गेली.
" आरती... आरती इकडे ये. ही कोणती पद्धत आहे चहा द्यायची? चहा करून जसे उपकार केले. "सरला ताई ओरडल्या.
" तयार चहाचा कप तरी स्वतः च्या हाताने घ्या. तेवढे तरी कष्ट त्या शरीराला द्या. " ती कडवट पणे म्हणाली.
"आम्ही घेतो बेटा." बाबा मध्यस्थ करत म्हणाले.
" पाहीलं का कशी बोलते. सचिनला फोन लावा हिचे नखरे त्याला समजू दे. " सरला ताईंनी मुलाला हाताशी धरायचं ठरवलं.
" लावा फोन. त्यांना ही समजू द्या घरात काय होत ते. " त्यांची आई किती गुणी आहे. ते तरी समजेल. आरती मनात म्हणाली.
" आरती बेटा जा तू आत. सरला शांत हो. " राजेश राव म्हणाले.
दोन तीन दिवसा आड घरात हेच वातावरण झालं होत. आरती, सरला ताई नुसत्या भांडत होत्या. समजूतदार पणा नावाला नव्हता. आरती काम करून कंटाळली होती. सरला ताईंच्या अपेक्षा संपत नव्हत्या. ती माणूस आहे यंत्र नाही त्या समजून घेत नव्हत्या. मी नाही का केल. असच सुरू असायचं.
घाईत सरला ताईंनी सचिनला फोन लावला. " त्या नेहमी प्रमाणे गाऱ्हाणे सांगत होत्या."
"काय आहे आई? जरा शांत रहा. मला ऑफिस मधे फोन करायचा नाही सांगून ठेवतो. आरती कुठे आहे?" सचिन चिडला होता.
त्याने सगळा राग तिच्यावर काढला. "काय कटकट आहे आरती. मी मीटिंग मधून उठलो. तुम्हाला दोघींना समजत नाही का? दिवस रात्र का भांडतात. आईच सोड तुला समजून घेता येत नाही का?"
" तुम्ही मलाच बोला. आईंना का सोडा त्याच भांडण काढतात. तुम्हाला आवडत नसेल तर मी माहेरी जाते." आरती ही चिडली होती.
"काहीही कर. मला शांत पणे काम करू दे." त्याने रागाने फोन ठेवला.
" झालं आई तुमच समाधान. तुम्ही यांना फोन का लावला? तुमच्या मुळे हे मला बोलले. मी इथे रहाणार नाही. " आरती बोलली.
ती बडबड करत बॅग भरत होती. आता खूप झालं. घर आहे का चेष्टा? असे लोक कुठे बघितले नाही. विचित्र. ह्या तश्या त्यांचा मुलगा तसा. असा काय नवरा भेटला समजत नाही. बाकीच्या ठिकाणी बघा नवरा नुसता बायकोच्या पुढे पुढे करतो. तिला कुठे ठेवू कुठे नको करतो. इथे तर अजिबात शांती नाही. कटकट नुसती. आईकडे बर वाटेल. मी तिकडेच बरी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा