Login

एकमेकांना समजून घेवू भाग 2

एकमेकांना समजून घेवू. जगणं सुसह्य करू
एकमेकांना समजून घेवू भाग 2

©️®️शिल्पा सुतार

सचिन सात वाजता घरी आला. आरतीची तयारी झाली होती. सोनू झोपून उठला होता. ती त्याची तयारी करत होती. तिने सचिनला बघितल. तोंड वाकड केल. त्याने रागरंग बघितल. बापरे काही खर नाही.
"काय झालं आई, बाबा?"

"तिला विचार. आम्हाला काही झाल नाही." सरला ताई म्हणाल्या.

तो आत आला." आरती चहा ठेव. " त्याने बोलून बघितलं.

" तुम्ही करून घ्या. तुमच्या घरच्या लोकांना ही द्या. त्यावरून आज गोंधळ घातला ना."

" काय झालं मी तुला पाणी आणू का. शांत हो. " सचिन म्हणाला.

"तुम्ही आता का हळू आवाजात बोलताय. दुपार सारखं माझ्यावर ओरडा ना. तुम्हाला माहिती नाही का काय झालं? तुमच्या आईने तुम्हाला फोन केला होता ना. त्यावरून तुम्ही मला नेहमी प्रमाणे बोलले. आठवल का? मी सोपी सापडते सगळ्यांना छळ करायला. " आरती चिडून बोलत होती.

"मी छान चहा करतो. आपण चहा घेत बोलू. तू चिवडा आण. "

" मला काही नको. मी इथे अजून एकही दिवस राहू शकत नाही. चहा पाणी सोडा. मी निघते आहे. तुमच्यासाठी थांबली होती. तुम्ही माझ्या सोबत येता का? " तिने विचारल.

" तू कुठे जाणार नाही. मी पण येणार नाही. "

" मी ऐकणार नाही. मी निघते. मला थोडी शांती हवी आहे. ती या घरात मिळणार नाही. तुमच्याकडे मी खूप अपेक्षेने बघत होती. पण तुम्हाला तर तुमच्या घरच्या लोकांच्या सेवेतून अजिबात वेळ नाही. तुम्ही आज ही मला न निवडता तुमच्या घरच्यांना निवडलं. छान. तुम्ही लोकं सगळे आरामात राहा. मी जाते. "आरती म्हणाली.

" याला काय अर्थ आहे आरती. घर आहे तर छोट्या मोठ्या गोष्टी होतीलच. प्रत्येक गोष्टीतनं मी जाते केलं तर कसं होईल? सोनूचा तरी विचार कर. तुला कोणी मारलं का? कधी खूप त्रास दिला का? "सचिनने विचारल.

" रोजच बोलतात. जीणं नकोस केल आहे. मानसिक त्रास किती आहे. हा सगळ्यात भयानक त्रास असतो. जो मी इतक्या वर्षापासून सहन करते आहे. इतके वर्षे तुम्हाला ही गोष्ट मी सांगितली का? घरचे कसे वागत आहे. स्वतः सहन केलं. पण आता सहन होत नाही. मी अजून इथे राहिली तर वेडी होईल. उगीच सोनू वर माझा राग निघतो आहे. मला स्वतःला सुद्धा थोडी आरामाची गरज आहे. नाहीतर मला वेड लागेल. "आरती मोठ्याने बोलत होती.

" अस करता का आरती शांत. हो आपण बाहेरून जेवण मागवू. जा आराम कर. " सचिन म्हणाला.

" मी आईकडे जाते मला बदल हवा. आता परत तेव्हा येईल जेव्हा तुमच्या आई या घरी नसतील. "

" काहीही बोलतेस का? मी काही म्हणत नाही म्हणून अस बोलू नकोस आरती. "सचिनचा थोडा आवाज वाढला.

" तुमच कस सगळं आरामात होत. बायको निमुटपणे काम करते. आई, बाबा खुश आहेत. एवढ तुमच्यासाठी पुरे झालं. माझा विचार करायची गरज नाही. मला त्रास झाला तरी ठीक. अस आहे ना? " आरती रागाने म्हणाली.

तीच माहेर जवळ होत तिथून पंधरा वीस मिनिटावर. ती रिक्षा बूक करत होती.

" अश्या धमक्या खूप बघितल्या. जाते तर जावू दे. येईल दोन दिवसात. " सरला ताई आत येत म्हणाल्या.

" आई तू गप्प बस. मी ठीक करतो ना. "सचिन ओरडला.

"बघितल माझी किती किम्मत आहे इकडे. मी या घरासाठी काय नाही केलं . माझी प्रत्येक गोष्ट. प्रत्येक सवय बदलली. नोकरी सुद्धा सोडून दिली. घरी येणाऱ्या जाणाऱ्यांचा प्रत्येकाचं केलं. आई-बाबांना वेळेवर दवाखान्यात नाही न्या. त्यांना चार वेळा जेवायला द्या. पण याच्या बदल्यात मला काय मिळालं? मी फक्त इथे कामवाली बनवून राहिली आहे. जिला कुठल्याच गोष्टीत आपला मत द्यायचा अधिकार नाही. ना मला कोणी काही विचारत आणि तुम्ही सुद्धा माझ्यासमोर वेगळं वागतात आणि घरच्या समोर वेगळे वागतात. माझी बाजू घेत नाही."

" तुझ काय म्हणणं आहे आरती? आज सांग. "सचिन म्हणाला.

" काही नाही. नेहमी प्रमाणे माझ्यासाठी काही करू नका. मी एकटी लढते. त्यापेक्षा मी इथून जाते. "आरती म्हणाली.

" काय अस चिडचिड? "

" मग काय करू? तुम्ही कधी माझी बाजू घेतली आहे का? माझ्यासाठी घराच्या पद्धती बदलल्या आहेत? सगळ्या गोष्टी वेळेवर व्हायलाच पाहिजे. मी कंटाळली आहे. "

" प्रत्येक सुनेचे ते कर्तव्य आहे. " सरला ताई म्हणाल्या.

" तुम्ही केल का ते कर्तव्य? तुमची वेळ आली होती तेव्हा स्वतःच्या सासू-सासर्‍यांना सांभाळत नाही. दीर नणंदेला अजून विचारत नाही. तुम्हाला फक्त माहेरचा ओढा आणि मी मात्र सगळ्यांचं करायचं. मला शिकवू नका. मला सगळं माहिती आहे. पण आता या गोष्टीत पडायचं नाही. नाहीतर तुमची पूर्ण हिस्टरी मी बाहेर काढेन. "आरती मोठ्याने म्हणाली.

" आरती बेटा... " राजेश राव आत आले.

" जावू द्या हो. तुला जायच तर नीघ माहेरी. हे आमच घर आहे. यांनी पूर्वी इन्व्हेस्टमेंट केली होती. अशी ही ती काही काम करत नाही. काहीही सांगितलं की तोंड वाकडं असत. प्रीतीही आली की तिला आवडत नाही. "सरला ताई म्हणाल्या.

" रोज आलं तर कोणाला आवडेल. मानाने याव ना. त्या नेहमी इथे असतात. जेवून जातात. वहिनी चिवडा करून दे. लाडू दे. मी दमत नाही का? "

" भलती सुगरण आहे जशी. भाज्या कसल्या पांचट करते अजून सुद्धा तिखट मीठाचा अंदाज नाही. " सरला ताई म्हणाल्या.

" यापुढे तुम्हाला करायच आहे. तेव्हा पंचपक्वान्न करून खा. तुमच्या मुलीला ही द्या. " आरती म्हणाली.

" आई तू गप्प बस. आरती तुला ही काय झालं? "सचिन म्हणाला.

" मी आधी पासून अस वागायला हव होत. चुकलं. या पहिल्यांदा बोलल्या तेव्हा त्यांना गप्प करायच होत. "

" बघितल कस बोलते. "सरला ताई सचिनला म्हणाल्या.

" ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खातात. एक तर त्या इथे रहितील नाहीतर मी. प्रीती डिलिव्हरी साठी आली होती तेव्हा किती काम पडलं होतं. रोजच बाळाला बघणारे पाहुणे येत होते. थोडं सांगितलं कामवाली बाई लावून द्या तर किती गोंधळ घातला होता. स्वतःही काही करायचं नाही सुनेला मदत करायची नाही. जरा तरी माणुसकीने वागा. "

" कशाला हवी घरात कामवाली फालतू खर्च नुसता." सरला ताई म्हणाल्या.

आज दोघींच खूपच भांडण झालं.

🎭 Series Post

View all