Login

एकमेकांना समजून घेवू भाग 3 अंतिम

एकमेकांना समजून घेवू. जगणं सुसह्य करू
एकमेकांना समजून घेवू भाग 3 अंतिम

©️®️शिल्पा सुतार

सचिनला घरातल्या गोष्टी बरेच दिवस झाले लक्षात येत होत्या. कितीही तरी गोष्टी त्याने बदलण्याचा प्रयत्न केला. पण आई अजिबात ऐकत नव्हती. घरचे पण सरला ताईंना कंटाळले होते.

त्या दोघांना फिरायला जाऊ देत नव्हत्या. मोकळीक मिळत नव्हती. सगळीकडे सगळ्यांनी सोबतच जायचं. हॉटेलमध्ये जायचं असले की या प्रीतीला बोलवून घ्यायच्या. आरतीला अजिबात आराम नव्हता. रोज उठून स्वयंपाकाला नाव ठेवत होत्या. घरच्यांनी काही शिकवले नाही का. वाटेल तस बोलत होत्या. किती सहन करणार.

आरती सोनूला घेवून माहेरी आली. आई, बाबा, भाऊ, वहिनी त्यांना ती सगळं सांगत होती.

"सोड ते. आली तर आरामात रहा. माझ्या मुलीला किती त्रास आहे."

"थोडे दिवसांनी घरी जाव लागेल. मला नाही वाटत आई, बाबा वेगळे राहतील, पण थोडे घाबरतील तरी." आरती म्हणाली.

सचिन किचन मधे खटपट करत होता. त्याने वरण भात केला. त्यांनी जेवण केलं. तो ही किती करेल. दोन तीन दिवस त्याने केलं. आता तो दुर्लक्ष करत होता. घरकामाने सरला ताई दमल्या होत्या. त्यांना कामवाली आवडत नव्हती. म्हणून इतके दिवस ती नव्हती.

आई बाबा आता बाहेरून पदार्थ आणून खात होते. जो जमेल ते काम करत होता. प्रिति अधून मधून येत होती. सरला ताई काम करून थकल्या. प्रिति नुसती बसली होती. स्वयंपाक करायला मदत कर. तर ती कामाला नाही म्हणाली.

" आरती वहिनीला बोलवून घे. घर काम कोण करेल. तुझ म्हातारी पणी कोण करेल. जरा शांत रहात जा आई."

"प्रीती थोड घर आवरून दे." त्या म्हणाल्या.

"माझ बाळ लहान आहे. मी सासरी काम करू माहेरी ही काम करू." तिने नकार दिला.

रविवार होता. सचिनने बाजूंच्या कामवालीला बोलावलं. तिने झाडू फरशी केली. भांडी घासली.

आता सरला ताई काही म्हणाल्या नाही. त्यांना चाललं. त्या किती स्वार्थी आहेत सचिन बघत होता.

"आई तू कस वागते आहे मी बघतो आहे. स्वतः वर आल तर तुला कामवाली चालली. आरती कडून मात्र सगळं काम करून घेतेस. खूपच वाईट वागतेस. बाबा तुम्ही बघा." सचिन चिडला होता.

" आरतीला घेवून ये. कामाला बाई लावून घे. सरला यापुढे घरात मोठ्या आवाजात बोलली तर बघ. प्रितिला सांगून दे बोलावलं तेव्हा यायच." राजेश राव म्हणाले.

आरतीला माहेरी करमत नव्हतं. किती केल तरी स्वतः च्या घरी वेगळं वाटत. तिला तिकडे कशी नणंद आवडत नव्हती इकडे तिच्या वहिनीला ती आवडत नव्हती.

आरती सोनूला आधी सारखा मान प्रेम मिळत नव्हता. वहिनीची चिडचिड सुरू होती .पण सांगणार कोणाला? आई समोर होती म्हणून वहिनी गप्प होती .नाहीतर दोन दिवस तिथे रहाणं कठिण होत.

आरतीला माहेरी येवून बरोबर महिना झाला होता. ती आई सोबत भाजी साठी मार्केट मधे आली. तिच्या शेजारची बाई दिसली. आरती घराबद्दल खूप विचारत होती .कामवाली लावली .असच काहीतरी करून खातात. शेजारची वहिनी म्हणाली.

आरतीला सचिनची खूप आठवण येत होती. त्याला त्रास होत होता. तिला कसतरी वाटलं.

"आरती किती दिवस तिकडे रहाणार घरी ये."

तिला ही खूप वाटत होत. तरी ती काही म्हणाली नाही.

आई, आरती घरी आल्या. घरातून तिच्या वहीनीचा ओरडायचा आवाज येत होता. ती पटकन आत गेली. सोनू अंग चोरून उभा होता. त्याने टीव्हीला बॉल मारला होता म्हणून वहिनी त्याला ओरडत होती. आरती सोनूला आत घेवून गेली.

" आई मला आपल्या घरी जायच बाबा कुठे आहेत?" तो रडत होता.

आरती ही गप्प झाली होती. वहिनीचा राग वाढत होता .

तिने सचिनला फोन केला. "सोनू आठवण काढतो आहे भेटायला या."

संध्याकाळी ते कॉफी शॉप मधे भेटले. सोनु सचिन जवळ बसुन आईस्क्रीम खात होता. तो खूप खुश होता. बाबांना सोडत नव्हता. सचिनने सगळे पदार्थ आरतीच्या आवडीचे ऑर्डर केले होते. त्याच्या डोळ्यात तिच्या बद्दल प्रेम दिसत होत. सचिन तिला बर्‍यापैकी मनवत होता. तिला ही त्याच्या सोबत खूप छान वाटत होत.

"आई आपण बाबां सोबत जावू. मला आपल्या घरी जायचं." सोनू ऐकत नव्हता.

" माझ चूकलं आरती घरी चल." सचिन म्हणाला.

"दोन दिवस सगळे नीट रहातात परत तेच सुरु होईल." आरती म्हणाली.

"घरात बदल होईल. मी आईशी बोललो. आता तिने तेच सुरू केल तर तू म्हणते ते करेन. तेव्हा आपण वेगळ राहू." सचिन म्हणाला.

आरतीने सामान घेतल ती घरी आली. बाबा, सोनू क्रिकेट खेळत होते. आरती स्वयंपाक करत होती. ती पण हक्काच्या घरी येवून खुश होती. सचिन तिच्या मागे मागे होता. सासुबाई काही म्हणाल्या नाहीत पण खुश होत्या.

आता सरला ताई काही लागल तर स्वतः घेत होत्या कारण सचिनने सांगितलं होत आरतीला त्रास झाला तर तिच्या सोबत मी पण हे घर सोडून जाईल. बाबा समजूतदार होते. प्रिति अधून मधून येत होती. आरती तिच्या संसारात खुश होती.

कधी कधी स्वतः साठी थोड कठोर व्हाव लागत. पण अति ताणू नये. पती पत्नी गाडीचे दोन चाक. एकमेकांना समजून घेवू सोबत छान राहीलं पाहिजे. घराच्यांनी अति करू नये. कारण अति तिथे माती.

🎭 Series Post

View all