Login

एकनाथ महाराजांचे भारूड

Every One Wants Each And Every Thing To Be Perfect Buy In Real Life It's Not Possible

एकनाथ महाराज भारुड 

  



     एका सुईवर तीन गाव वसली होती. 


     ती तीन गावं कशी होती? 


     दोन ओसाड रे! एक वसेची ना!


     वसेची ना , वसेची ना


     दोन ओसाड रे ! एक वसेची ना!!



   त्या तीन गावात तीन कुंभार राहत होते.


   ते तीन कुंभार कसे होते?


  दोन आंधळे रे , एक दिसेची ना !!


   दिसेची ना ! दिसेची ना!!


  दोन आंधळे रे, एक दिसेची ना!


   त्या तीन कुंभारांनी तीन मडके बनविले,


     ते तीन मडके कसे होते?


    दोन कच्चे रे , एक भाजेची ना!


   भाजे ची ना ! भाजेची ना !


   दोन कच्चे रे , एक भाजेची ना!


   ती तीन मडकी भाजली की नाही हे             

पाहण्यासाठी , त्या तीन मडक्यात त्या तीन कुंभारांनी तीन ज्वारीचे दाणे टाकले.


   ते तीन ज्वारीचे दाणे कसे होते?


      दोन सडके रे , एक शिजेची ना!


     शिजेची ना ! शिजेची ना!

      दोन सडके रे , एक शिजेची ना!


      ते तीन ज्वारीचे दाणे शिजले की नाही ,

       हे पाहण्यासाठी त्या तीन कुंभारांनी ,

      तीन ब्राम्हण बोलावले.


      ते तीन ब्राम्हण कसे होते?


       दोन लंगडे रे , एक चालेची ना!


       चालेची ना ! चालेची ना !


        दोन लंगडे रे , एक चालेची ना !


        त्या तीन ब्राह्मणांसाठी , तीन पानं    



        वाढण्यात आली, आणि त्या पानांवर , ते 


        तीन ज्वारीचे दाणे वाढले.


       पण ब्राम्हण काही जेवायला सुरुवात करत 


        नव्हते कारण ,


        दोन रुसले रे , एक जेवेची ना !


         जेवे ची ना ! जेवेची ना !


        दोन रुसले रे , एक जेवेची ना !


        ते तीन ब्राम्हण जेवले पाहिजे म्हणून , त्या तीन कुंभारांनी , त्या तीन ब्राम्हणांना तीन रुपये दक्षिणा दिली.


        ते रुपये कसे होते?


    दोन खोटे रे , एक चालेची ना !


     चालेची ना ! चाले ची ना !


     दोन खोटे रे , एक चालेची ना!




जय हिंद 

🎭 Series Post

View all