Login

एकटा मुलगा हवाय-1

लग्नासाठी एकटा मुलगा हवा
"आम्हाला एकटा मुलगा हवाय, आमची मुलगी सासू सासऱ्यांसोबत राहणार नाही"

मेघनाच्या वडिलांनी स्पष्ट सांगितलं तसा मध्यस्थीला राग आला, तो रागारागाने बोलला,

"एकटा मुलगा हवाय तर एखाद्या अनाथ मुलाशी लग्न करायला सांगा तुमच्या मुलीला.."

"हरकत नाही, तसा मुलगा चांगला असेल तर मी लगेच लग्न लावून देईल.."

हे ऐकून मध्यस्थी रागारागाने उठला अन निघून गेला.

मेघना लग्नाच्या वयाची झाली तेव्हा तिच्यासाठी स्थळ बघणं सुरू झालेलं. वडिलांचा आणि तिचा ठाम निर्णय होता की मुलगा एकटा राहणारा असेल तर माझी मुलगी लग्न करेल.

असंच एक स्थळ आलेलं, मुलगा दुसऱ्या शहरात कामाला. आमंत्रण दिलं गेलं,

ते मेघनाला पाहायला आले, गप्पा वगैरे होत होत्या,

त्यांना चहा नाष्टा समोर ठेवला, आईने चहाचा कप उचलला, मुलाने आईकडे पाहिलं..आईने संमती दिली तेव्हा मुलाने कप घेतला...पोहे घेतानाही तेच..सर्व गोष्टींसाठी तो आईकडे बघत असे. शेवटी मुलाच्या आईने सांगितलं,

"लग्न झालं की हा घरी येणार कायमचा आणि तिथेच जॉब बघणार, आता माझ्याकडून काही होत नाही..लग्न झालं की आमच्यासाठी दोघे राहतील आमच्याकडे"

वडिलांना कळून चुकलं की याच्या आई वडिलांना मुलासाठी नाही तर स्वतःसाठी एक सेवेकरी हवी आहे. वडील तिथेच म्हणाले,

"माफ करा या तुम्ही"

ते रागारागाने निघून गेले, मुलाला मेघना खूप आवडली होती पण आई समोर चकार शब्द निघाला नाही. त्याला काही विचारलं की तो आईकडे बघून उत्तर देई. वडील तिथेच काय समजायचं ते समजले.

ज्या मध्यस्थीने हे स्थळ आणलेलं तो पुन्हा आला आणि म्हणाला,
****

🎭 Series Post

View all