एकतर्फी

It's one side love story , indicates one another shade of love.

सदर कथा ही काल्पनिक आहे तिचा कोणाशीही संबंध नाही असल्यास तो केवळ एक योगायोग समजावा.

आजचा दिवस खूप खास होता आज त्याच्यासाठी.

मनातील चाललेल्या काहूर तो आज संपवणार होता,सकाळी  स्वतःला पुन्हा आरशात पाहून टापटीप बनून तो निघाला होता.
एका महिन्यांपूर्वी त्याने तिला पाहिले होते, रेल्वे फलाटावर लोकलची वाट पाहत ती उभी होती.
तोही आपल्या रोजच्या गडबडीत लोकलची वाट पाहत होता, पण आज काही तांत्रिक बिघाडी मुळे लोकल उशिरा धावत होत्या, त्यामुळे ती त्याच्या दृष्टीक्षेपास आली होती,
चुकून एक  कटाक्ष टाकला तिच्यावर
थोडी भांबावलेली कुरळ्या केसांना सावरत तीची नजरही भिरभिर काहीतरी शोधत होती.
 तो तिला बघताच स्तब्ध झाला, बराच वेळ तिला न्याहाळून झाल्यानंतर तोही भानावर आला, आणि आलेल्या लोकलचा मागोवा घेऊ लागला.
ती लोकल पकडून दोघेही आपापल्या ठिकाणी निघून गेले,
पण त्याचे काही कामात मन लागेना, काहीतरी हरवलेल्या आविर्भाव त्याच्या चेहऱ्यावर होता,
रात्री घरी आल्यानंतर निवांत असताना, त्याचे विचार चक्र सुरू होते,  काही केल्या आज तो चेहरा त्याच्या डोळ्यासमोरून जात न्हवता, त्याने टाकलेला तो कटाक्ष आणि तिनेही काही क्षण त्याला दिलेला प्रतिसाद हेच त्याला फक्त आठवत होते, जणू तो क्षण तिथेच थांबला होता. त्याला दिसलेले ते सौंदर्य विलोभनीय होते, ते मंद झुलनारे कुरळे केस, भिरभिरनारी ती नजर, त्याच्या कटाक्ष मुळे डोळ्यातील ती चमक आणि मनातील उत्सुकता आणि सगळ्यात लक्षणीय तिचे स्मितहास्य ,मोत्यासारखे ते चमकणारे दात की डोळ्यातील चमक त्या दातात आली होती, दात ठेवणीतून जरा पुढे होते,पण तेच त्याला जास्त भावलं होत, कोणाच्याही व्यंगाचा उपहास न करता त्याचा आदर करणारा तो.बहुतेक त्याला त्या व्यंगावर मन वसले होते.
आता रोजच तो नित्यनियमाने तो त्याच वेळेला तीच लोकल पकडू लागला तिच्या एका स्मृती साठी तो रोज नवीन काहीतरी खटाटोप करू लागला.कधी ती प्रतिसाद द्यायची तर कधी तो त्याच आठवणी मद्ये रमून जायचा.
रोजच्या ढकलगाडी मद्ये काहीतरी  उद्धिष्ट भेटले होते सगळं दुःख एका बाजूला आणि हा हवा असणारा आनंद एका बाजूला.
लोकलच्या द्वितीय श्रेणी च्या गर्दीत रमणारा 
तो कधी प्रथम श्रेणी च्या डब्यात विसावला हे त्याला कळलेच नाही, तिच्यासाठी प्रथम श्रेणीत प्रवास करणे हे त्याच्यासाठी खूप सुखकारक होते, तिच्या नजरेला नजर भिडवण्याची ती एकमेव संधी असे , आणि तिच्या एक स्मित हास्य साठी त्याचा प्रवास लांबवत होता.
तिच्या मागे मागे जाणे तिच्या ऑफिस पर्यंत जाणे ,हे एक जरी त्याला बुद्धीला पटत न्हवते पण मनाला आवर घालता येत न्हवती.
असे एक महिना चालू होते, त्याला आता खात्री पटली होती की ह्यालाच प्रेम म्हनतात आणि शेवटी त्याने तिला विचरायचे ठरवले होते. आपल्या भावनांना वाट मोकळी करून दयवयचे होते, म्हणून सकाळी लवकर आवरून छान तयारी करून तो निघाला होता.

ती आदल्या रात्री आरश्या समोर स्वतःला निरखून न्याहाळत होती,काय बदल झालाय तिच्यामद्ये, कोणी आपल्याकडे आकर्षित होतेय हिच भावना किती सुखावणारी असते, गेले काही तिच्या बाबतीत जे घडत होते ते अनपेक्षित होते तिच्यासाठी.
लहानपणापासून तिच्या पुढे असलेल्या दातामुळे तिची फार अहवेलना झाली होती
आपल्यात काही व्यंग आहे याच्याच न्यूनगंड तिच्या मनात रुजला होता.कोणी खरच आपल्यावर खर प्रेम करू शकतो, हेच तिला मान्य न्हवते, लोकल मधून रोज डोळ्यात बघण्याचा प्रयत्न करणारा आता पाठलाग करून ऑफिस पर्यंत येऊन पोहचला होता. नक्कीच त्याचा पुरुषी स्वार्थ असणार.असे तिचे ठाम मत झाले.
तरीही तिला ते काही प्रमाणात आवडत होत, त्यामुळेच तिचे सौंदर्य हे आरशात अजूनच खुलून दिसत होते, बाकीच्या साठी काहीही असो, पण प्रत्त्येक जण आरश्यासमोर हा सुंदर असतो.त्या प्रतिबिंबात आपले व्यंग नाही तर गुण पाहत असतो,
पण आपल्या आयुष्यात असे प्रेम वगैरे शक्य नाही, कोणी माझ्यावर का प्रेम करेल? आशा मतावर ठाम होऊन उद्या काय होणार आहे याची पुसट ची कल्पना ही तिला न्हवती.
तिला कसे सांगू ती ऐकून घेईल का? तिचे उत्तर काय असेल याचा विचार करत त्याने आज लोकल पकडली.
नेहमी प्रमाणे तिचा पाठलाग करून त्याने तिचे ऑफस गाठले. हिम्मत एकवटून तिला आवाज दिला, नेहमीपेक्षा नवीन म्हणून तीही थांबली, त्याने तिला सगळे  एका महिन्यात घडलेले त्याला तिच्या बद्दल वाटलेले सगळे तिला सांगितले. 
पण तिने फक्त एक हसरा कटाक्ष 
त्याला पुरेसा होता, त्याला तिच्या हसण्यात आसुरी आनंद दिसत होता, त्याला तिचा स्पष्ट नकार दिसत होता पण मनाला पटत न्हवता.
जड अंतःकरणाने तो तेथून निघाला.कुरूप आणि विद्रुप मधील त्याचे स्वरूप होते, त्याच्या मनाच्या सौंदर्याला कोणी समजून घेत न्हवते.
त्यालाही तडजोड किंवा उपकार नको होते, फक्त प्रेम हवे होते.
शेवटी तिच्या निर्णयाचा त्याला आदर होता.जसा त्याला तिच्या व्यंगाचा होता, त्याला तिच्या दातात चमकायचे होते.
कारण त्याने आयुष्यात कोणतीही गोष्ट मनापासून केली नसेल पण प्रेम मात्र मनापासून केले होते, आणि ते एकतर्फी असल्यामुळे शंभर टक्के होते, जे त्याच्या बाजूने होते आणि नेहमीच राहील, एक गोड आठवण म्हणून. 
त्यांनी केले ते प्रेम खरे होते की नाही माहीत नाही पण एकतर्फी होते .आणि एकतर्फी प्रेमात हिच तर गमंत असते, सगळं कस आपणच ठरवून आपणच मनापासून निस्वार्थी प्रेम करावे त्याने समजून घेतले तर ठीक नाहीतर तोही समजूत पणा आपण आणायचा आणि त्या प्रेमाच्या आठवणीत रमायचे.
एवढ स्वतःला पटवून आज पुन्हा एकदा तो नेहमीची लोकल पकडायला सरसावला.
आणि ती अजूनही द्विधा मनस्थितीत , नाही बोलून चूक केली की बरोबर? 
तिच्यावर कोण प्रेम करणार? अश्या स्वतःलाच पडलेल्या प्रश्नाला बाजूला सारून तिनेही तिची लोकल पकडली.

🎭 Series Post

View all