एकटी ... भाग 1
©️®️शिल्पा सुतार
........
........
रोज प्रमाणे संध्याकाळी राधा काकू फिरायला निघाल्या , ओळखीच्या काकू भेटल्या रस्त्यात, जरा वेळ गप्पा करण्यात गेला, त्या फिरून घरी आल्या,.. " आज जरा उशीर झाला यायला, सगळे वाट बघत असतिल, जेवण व्हायचे आहेत ",.
त्या आत आल्या, घरी हास्य विनोद करत जेवण सुरू होत, त्या नाहीत जेवायला याची साधी कोणी दखल ही घेतली नव्हती, सूनबाई मुलगा त्यांची मूल मस्त जेवत होते.
काकू आत आल्या,.. "अरे थांबले का नाही माझ्यासाठी? ,
कोणी लक्ष दील नाही, त्यांनी स्वतःच्या हाताने वाढून घेतल, तो पर्यंत सगळ्यांच्या जेवण झाले होते, ते आपल्या रूम मध्ये निघून गेले, काकूंनी एकटीने जेवण केल,
नेहमीच होत हे, घरचे व्यवस्थित वागत नव्हते त्यांच्याशी, त्यामुळे राधा काकू सध्या खूप उदास असायच्या , त्या सध्या त्यांच्या दोन नंबरच्या मुलाकडे असायच्या रहायला,
तीन मूल असलेल्या राधा काकूंच आधी खूप चांगल होत, घरात काका तीन मूल, सगळ भरपूर, काका काकूंनी मुलांना खूप शिकवल, काका मोठ्या पोस्ट वर होते, मोठा बंगला होता त्यांच्या, दाग दागिने भरपूर, कसलीच कमी नव्हती घरात, मूल मोठी झाली, लग्न झाले, त्यांनी त्यांचे वेगळे संसार उभे केले, काका काकू एकटे राहिले, तरी ठीक सुरू होत, वयामानाने अचानक एक दिवस काका वारले,
त्यानंतर काकूंची खरी परवड सुरू झाली, कोणीच त्यांना सांभाळायला तयार होईना, सुरुवातीला त्यांच्या बंगल्यात मोठा मुलगा येऊन राहिला लागला , नंतर त्याने घराचा ताबा घेतला, दोन भावांना सांगितले मी कायम आईला सांभाळणार नाही, तुमच्याकडे ही आईला चार चार महिने ठेवा, त्यानुसार काकू आपल समान घेवून कधी इकडे तर कधी तिकडे असतात रहायला,
कोणालाही त्यांच्या विषयी प्रेम नव्हता, उगीच अडगळ झाल्या होत्या त्या, सुना काम करून घ्यायच्या त्यांच्या कडून, बर एक चांगल होत की त्यांनी दागिने आणि कॅश बद्द्ल मुलांना माहिती दिली नव्हती, काकू सगळ सांभाळून होत्या
आज राधा काकू लवकर उठल्या, सगळं आवरलं, देवपूजा केली, देवांना हात जोडले, आता आपली भेट होईल आठ महिन्यांनी तोपर्यंत मुलाला सांभाळ बाबा.
रूम मधून त्या बाहेर आल्या, सुनबाईने चहा केला होता त्यांनी तो घेतला,
सुनबाई आज खुशीत होती, कारण आज राधा काकूंची रवानगी मोठ्या मुलाकडे होणार होती
राधा काकूला तीन मुलं म्हणून चार चार महिने प्रत्येकाकडे राहायचं असं मुलांनीच ठरवलं होतं.
काका वारले तेव्हा घर भाड्याने द्यायचा विचार केला होता काकूंनी, मोठा मुलगा राहायला आला, काकूंना वाटले आधार होईल आपल्याला, आई मी तुला दर महिन्यात घरभाडे देत जाईल, अजूनही एक रुपया ही त्याने दिला नव्हता, ते घर राधा काकूंच्या नावावर होत, ही एक जमेची बाजू होती, बाकीचे दोन वेगळे राहत होते.
"अहो रिक्षा बोलवुन घ्या, आईंना सकाळी सोडून या तिकडे" ,...... सूनबाई
" आता कशाला दुपारून जाऊ आम्ही जेवून निवांत",..... मुलगा बोलला.
"त्याची गरज नाही, लवकर आईंना तिकडे सोडून या, आपल्याला दुपारून बाहेर जायचं आहे",....... सूनबाई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा