........
***********
ट्रेंडिंग कथा- लोका सांगे
"काय गं, गळ्यात मंगळसूत्र नाही..कपाळावर टिकली नाही आणि पायात जोडवी नाही, अशी कशी परवानगी देतेस तू सुनेला?"
मंगलाताई घरी येऊन काडी लावल्याशिवाय रहात नसत. गल्लीतल्या एकूनेक सुनेवर नजर ठेवून तिच्यावर टिप्पणी करण्याचा त्यांना छंदच होता.
गल्लीतील त्यांचं कॉर्नरचं घर होतं, त्यामुळे नोकरी करणाऱ्या सुनांना त्यांच्या घरावरूनच जावं लागे. कित्येकदा या सुनेांनी दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला पण मंगलाताई सुनांची ऑफिसवरून यायची वेळ झाली की बाहेर झोपळ्यावर येऊन बसत आणि एकेकीकडे लक्ष ठेवत.
संध्याकाळ झाली की चक्कर मारायच्या नावाखाली एखाद्या घरात शिरत आणि सुनांकडे बघून त्यांच्या सासवांना भडकवत,
"तुमची सून दिसली होती काल ऑफिसवरून येताना"
"काल तर रविवार होता.."
" बघा, असं विसरायला होतं मला...मी कधी पाहिलं सांगू का??तिने काळी जीन्स आणि जॅकेट घातलं होतं त्या दिवशी.. शोभत नव्हतं हो तिला, आता एका मुलीची आई आहे ती.."
काडी लावून त्या निघून गेल्या आणि इकडे घरात विनाकारण सासू सुनेांनी भांडणं लागली.
या सगळ्या सुना वैतागल्या, एकत्र जमल्या की मंगलाकाकूंना तोंडभरून शिव्या घालत. तरीही हे सत्र सुरूच राहिलं.
मंगलाकाकूंचा एकुलता एक मुलगा बाहेरगावी शिकायला होता. त्याच्या लग्नाचं ठरवायला लागल्यावर त्यांना कळलं की मुलगी आधीच शोधून ठेवलीय. आता नकार देण्याइतपत त्यांची हिम्मत नव्हती.
मुलाचं लग्न झालं. घरात नवीन सुनबाई आली. काही दिवस तरी ती सासरी असणार होती.
एकदा त्यांच्या शेजारी राहणाऱ्या सुनेने..श्वेताने मंगलाकाकूंच्या सुनेला सकाळी बाहेर आलेलं पाहिलं, श्वेता डोळे विस्फारून बघतच राहिली.
"आता वेळ आलीये परतफेड करायची.."
असं म्हणत तिने गल्लीतल्या सगळ्या तिच्या सुना ग्रुपला मेसेज टाकला की संध्याकाळी आपण मंगलाकाकूंकडे जाणार आहोत, हिशेब चुकता करायला..
सगळ्या सुना खूश झाल्या आणि संध्याकाळ होण्याची वाट बघू लागल्या. मनात सगळं साचलं होतं आता ते बाहेर निघणार होतं.. जवळपास सात आठ सुना अचानक मंगलाकाकूंच्या घरी गेल्या, मंगलाकाकूंनी दार उघडलं..इतक्या सगळ्या बायकांना बघून त्यांना दरदरून घाम फुटला..त्यांना दारातूनच बाहेर कटवावं म्हणून त्यांनी निष्फळ प्रयत्न केले..पण सुना न जुमानता आत घुसल्या.
श्वेता म्हणाली,
"काय मग काकू, आता खुश ना? सुनबाई आली..आता आरामच आराम.."
पूर्ण कथा लिंकवर
https://irablogging.com/blog/loka-sange-b_44525
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा