काय फरक पडतो

Ekti
काय फरक पडतो

ती दिसताच समोर तो म्हणाला
"तू इथे ,एकटीच ?"

ती, "हो जरा हॉटेलिंग करायला येत असते मी नेहमीच ,ते ही एकटीच "

तो,"एकटीच ,पण कोणाला तरी आणायचे ना सोबत.."

ती, "कोणी कधीच आले नाही,मग सवय पडली एकटीने येण्याची "

तो,"ही जागा स्त्रियांसाठी safe नाही म्हणून म्हंटले मी..त्यात तुझे हे असे कपडे ,त्यात लोकांच्या कश्या कश्या नजरा..तुला कसला फरक पडत नाही का ?? मी थांबतो तुला सोबत म्हणून..मग जरा सुरक्षित वाटेल तुला इथे"

ती हसली आणि त्याला म्हणाली.. "नको काळजी करूस इतकी, मी सक्षम आहे एकटीच..जग तसे ही अनुभवले आहे चांगलेच..जगानेच तर शिकवले मला हे एकटे रहाणे..त्या जगानेच तर कधी सांगितले होते मला..कोणी कश्याला हवंय सतत सोबत तुझ्या, कोणी खात नाही..तेव्हा मला ही जागा safe वाटत नव्हती अरे पण आता वाटते...कोणी खात नाही हेच खरे..आणि कधी काळी काही लोकांना मी साडी नसली की गंगुबाई वाटायचे..सोबत असली की लोक रस्ते बदलायचे, ओळख सांगताना रुजायचे हो,मग मी माझ्यात बदल केला तरी हेच लोक ह्या कपड्यांना कशी नावे ठेवू शकतात कळत नाही."

तो जरा शरमला, लाज वाटली त्याला त्याची..की कधी काळी ती आपल्याला म्हणायची तू ही सोबत चल ,हॉटेलिंगसाठी कारण मला एकटीला भीती वाटते..तू सोबत असला तर safe वाटते...तेव्हा आपणच ओरडलो होतो तिच्यावर..आणि तिला एकटीलाच जायला सांगितले होते...

तो तिचा नवरा आदित्य ज्याने तिला divorce दिला होता, अशी बायको नकोच जिला साधे जगात एकटीने वावरता ही येत नाही, जिला सतत आधाराची गरज वाटते..जग रीत माहीत नाही..लोकांचे मन ठेवण्यासाठी त्यांच्या सोबत dance ही करता येत नाही...तिची लाज वाटायची...खेडूत म्हणून तिला हिनवले कितीदा तरी आपणच आणि आज तिच्यातील बदल पाहिला आणि तो स्तब्ध झाला..

ती, "मला निघायचे आहे ,माझे बॉस माझी वाट बघत आहेत ,त्यांना मी वेळ दिला आहे...मला आज भेटलात पण पुन्हा भेटू ही नका...तुम्ही माझा past आहात हे सांगायची मला आता लाज वाटते.."

तो तिचे हे बोलणे ऐकतच राहिला...ही एकटी आणि सोबत बॉस हिला भीती नाही वाटली ,इतकी कशी बदलू शकते ही खेडूत..

तिच्या चालण्यात एक रुबाब होताच ,तसा एक आत्मविश्वास ही होता...त्याला जाणवले तिने आपल्याला पूर्णपणे दुर्लक्ष केले...आता आपल्या विषयी काही ओढ ही जाणवली नाही...भीती भीती जगणारी ती शालू आता जग जिंकायला निघाली ती ही एकटी ,ना तिला माझी गरज जाणवली आणि आता माझे अस्तित्व..

ती पुन्हा मागे वळून आली तिला त्याला काही सांगायचे होते जणू ," मी एकटी असले तरी काय फरक पडतो..तेव्हा ही पडला नव्हता मग आता का पडावा..मी शिकले तुला जे हवं होतं ते सगळं शिकले मी.."

©®अनुराधा आंधळे पालवे