भाग : ३
दिवस जात होते... रितिका त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. त्याच्या शिवाय तिचा दिवस उजाडत नव्हता की रात्र होत नव्हती. दिवसरात्र ती त्याच्याच नशेत वावरत होती. आपल्या घरी प्रेम प्रकरण समजेल हे कारण देत अल्ताफने तिला स्वतःहून फोन करण्यास मनाई केली होती. तोच तिला फोन करत होता आणि त्याला हव्या त्या ठिकाणी रितिकाला बोलावून तिच्या डेबिट कार्डवर आपल्या जीवाची मौज करत होता. रितिकाला प्रत्येक क्षणी त्याची आठवण यायची परंतु तिला फोन करायची परवानगी नसल्याने तिची खूप कुचंबणा होत होती. तिचे मन तीळतीळ तुटत होते, परंतु त्याच्यावरील प्रेमाने ती सगळे सहन करत होती. पण एके दिवशी तिची सहनशीलता संपली आणि तिने त्याला फोन लावला.... बेल वाजत होती.... परंतु त्याने फोन उचलला नाही. तिने पुनः पुनः त्याला फोन केला परंतु त्याने नंतरही तिचा फोन घेतला नाही.
दुसऱ्या दिवशी अल्ताफने तिला गार्डन मध्ये बोलावून घेतले. यावेळी मात्र तिने त्याला फोन करण्याची परवानगी मागितली... तिच्या बोलण्याने त्याच्या डोळ्यात क्षणभर अंगार फुलाला... परंतु दुसऱ्याच क्षणी त्याने तिला जवळ घेतले आणि प्रेमाने समजावू लागला.
"रितिका तुम्हें मैं चाहीये? या मुझे फोन करना है? अगर जिद करोगी तो मैं आजसे नही मीलुंगा. बोलो क्या करना हैं"
त्याच्या इमोशनल बोलण्याने तिच्या अंगाला घाम फुटाला, अल्ताफ भेटणार नाही या नुसत्या कल्पनेने तिचा श्वास कोंडला. तिने पटकन त्याचा हात पकडत त्याची माफी मागितली. परंतु तिचा भयंकर कोंडमारा होत होता.
बघता बघता त्यांच्या नात्याला पाच महिने झाले, परंतु या पाच महिन्यात अल्ताफने तिला स्वतःहून कधीच आपल्या जवळ येऊ दिले नाही. रितिका त्याच्या स्पर्शाला व्याकुळ झाली होती.. तिच्या शरीराचे उत्सव तिला जाळत होते. अल्ताफ सगळे जाणून होता परंतु त्याच्या मनाचा थांग लावणे तिच्या बुद्धी पलीकडचे होते.
याच दरम्यान रितिकाची आई दोन दिवसांसाठी तिच्या बहिणीकडे गेली. आई जाताच तिने अल्ताफला घर बघायच्या बहाण्याने घरी बोलावून घेतले. आज मिळालेल्या एकांतात रितिकाला राहवत नव्हते... तापलेल्या रितिकाने अल्ताफला मिठी मारून त्याच्या छतीवर आपले डोके ठेवले.. त्याच्या स्पर्शाने ती बेभान झाली. तिला आज त्याच्यात पूर्णतः वितळायचे होते. ती आणखीन जवळीक करू लागताच अल्ताफने तिला आपल्या पासून दूर केले आणि भावुक होऊन बोलू लागला.
"रितिका जान! मी तुझ्यावर निर्मळ प्रेम करू पाहतोय आणि तू शारीरिक सुखाच्या मागे धावते आहेस. आपले शारीरिक मिलन तेव्हा होईल जेव्हा मी माझे एमबीए चे शिक्षण पूर्ण करून चांगला कामाला लागेल आणि तुझ्या बरोबर निकाह करेन. मी तुझ्या भावना समजू शकतो मेरी जान, तुला धीर धरावा लागेल... जर तुला धीर धरवत नसेल आणि फक्त सेक्स हवा आहे तर हे घे माझे शरीर"
असे म्हणत अल्ताफने अंगावरचे संपूर्ण कपडे काढले आणि तिच्या समोर नग्नावस्थेत उभा राहिला.
"आओ मेरी जान आओ! लो मेरे जिस्मपर एक भी कपडा नहीं है... आओ आगे बढ़ो... मेरे इस गरम जिस्मको चाहे जैसे इस्तेमाल करो. लो लो देख क्या रही हो?. लेकीन एक शर्त है इस शारीरिक संबंध के बाद अपना कोई संबंध ना रिश्ता रहेगा, बोलो मंजूर हैं?"
त्याच्या अव्हानात्मक अणि अनावृत देखण्या शरीराकडे पाहून आतून जळणाऱ्या रितिकाने आपले डोळे मिटून घेत घेतले. तिच्या डोळ्यांमधून अश्रूंची धार लागली. मजबूर झालेली रितिका त्याच्याकडे याचना करू लागली.
"अल्ताफ मुझे ऐसा मत तडपाओ, मुझे आप और आपका प्यार दोनों भी चाहीये"
तडफडणाऱ्या रीतिकाला पाहून अल्ताफच्या हिरव्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली आणि ओठांच्या कोपऱ्यात एक गूढ हास्य उमटले. त्याने पुनः आपल्या अनावृत शरीराला तिच्या सर्वांगावर अधांतरी फिरवित आपले ओठ तिच्या ओठांच्या अगदी जवळ नेले. तिच्या डोळ्यात आशा जागली, आपला अल्ताफ आपले म्हणणे मान्य करेल... परंतु दुसऱ्याच क्षणी अल्ताफ तिच्या पासून दूर उभा राहिला आणि भावुक होत म्हणाला.
"मेरी जान बस थोडा इंतजार करो, मैं पुरा के पुरा आपका हो जाउंगा, लेकीन अभी सिर्फ एक ही चुनना होगा, मैं या मेरा जिस्म"
त्याचे ते शब्द तिच्या कानात तप्त रसासारखे गेले... रितिकाने तडफडत आपले डोळे मिटले आणि दोन्ही हातात तोंड लपवून अश्रू गाळत तेथेच खाली बसली. तिला तडफडताना पाहून अल्ताफला असुरी आनंद होत होता. प्रेमात आंधळ्या रितिकाला त्याचा खरा चेहेरा आणि त्याची चाल समजलेली नव्हती. तिची पारध झालेली होती. रडणाऱ्या रितिका कडे पाहत त्याने पुन्हा एकदा तिला विचारले.
"बोलो मेरी रितिका जान! मेरे जिस्म से अपने जिस्म की आग बुझाती हो या मैं कपडे पेहेन लू?"... रडणाऱ्या रितिकाने मानेनेच नाही नाही म्हणत आपला चेहेरा लपवून घेतला आणि छद्मी अल्ताफ आपले कपडे घालू लागला.
दिवस चालले होते... रितिकाच्या मनाचा प्रचंड कोंडमारा होत होता. अल्ताफ कडून ना लग्नाचे आश्वासन मिळत होते ना शरीरसुख. आपल्या संबंधाची वाच्यता कोणाही कडे करायची नाही असा दम त्याने तिला देऊन ठेवलेला होता. तसेच प्रेमळ धमकीही दिली होती की जर त्याला संशय आला की तिने दुसऱ्या पुरुषाकडे पाहिले किंवा मैत्री ठेवली तर त्याच क्षणी तो तिला सोडून जाईल आणि पुन्हा कधीच भेटणार नाही.
अल्ताफच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगने आपले दुःख कुणाला सांगायची आणि बोलायची हिम्मत पण तिच्यात उरली नाही. ती पूर्ती अंकित झाली होती. या विचारांनी तिला रात्र रात्र झोप येईनाशी झाली, तिच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ लागला. डोळ्यांखाली काळी वर्तुळे, झोप पुरेशी न झाल्याने कामावर परिणाम होऊ लागला, बॉस कडून दोन मेमो मिळाले. अल्ताफच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या खर्चामुळे आणि त्याच्या एम.बी.ए. फीच्या हफ्त्यांमुळे तिला महिन्याचा पगारही कमी पडू लागला. असे असतानाही त्याने एमबीएच्या अभ्यासासाठी तिने जमवलेल्या पुंजी मधून नवीन लॅपटॉप घेऊन देण्याचा हट्ट पुरवून घेतला. रितिकाचे आयुष्य आणि अकाउंट्स शून्यावर आले होते.
अल्ताफच्या प्रेमळ अटीमुळे तिने आपल्या सगळ्या मैत्रिणींना केंव्हाच तोडले होते. परंतु रवीना तशी चिवट ती अजूनही फोन करून तिची खुशाली विचारात होती. रवीना आणि रितिका एकाच बीपीओ मध्ये प्रशिक्षक होत्या. परंतु लग्न झाल्यावर रवीना सेन्ट्रल लाईनला शिफ्ट झाली होती. रवीनाला नेहमीच रितिकाची काळजी वाटायची की या मुलीचे कसे होणार.
एके दिवशी राविनाला मालाडला काम निघाले आणि तिने संध्याकाळी रितिकाचे घर गाठले. तिचा काळवंडून गेलेला चेहेरा आणि खोल गेलेले डोळे पाहून रवीनाच्या काळजाचा ठोका चुकला. बेडरूम मध्ये कॉफी पिता पिता तिने रितिकाला प्रेमाने सगळे विचारून घेतले. मनात अनेक महिन्यांपासून साचलेले दुःख तिने बोलून दाखवले. राविनाला धक्काच बसला... तिने शांतपणे अल्ताफ प्रकरण पहिल्या पासून ऐकून घेतले आणि अल्ताफचा फोटो पाहण्याचा हट्ट केला. अल्ताफने याच्यावरही बंदी घातलेली होतीच, परंतु रवीनाने हट्टच केल्यामुळे रितिकाला त्याचा फोटो दाखवावा लागला. त्याचा फोटो पाहून रविना उडालीच. कारण अल्ताफ एक प्रोफेशनल चिटर होता. भोळ्या सामान्य दिसणाऱ्या, कुरूप दिसणाऱ्या, वयस्कर आणि दिव्यांग स्त्रियांना हेरून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात फासून त्यांचे आर्थिक शोषण करणारा त्यांचा मोठा ग्रुप होता. रविनाच्या दूरच्या नात्यातील दिव्यांग तरुणीला पण अशाच प्रकारे फसवून तिचे आर्थिक शोषण केले होते.
हा ग्रुप मुंबईत चांगलाच सक्रिय होता. त्यातील सगळेच तरुण देखणे, अस्खलित इंग्रजी बोलणारे आणि काही उच्च शिक्षित होते. जर एखादे सावज आपल्या जाळ्यातून सुटू पाहू लागले तर प्रसंगी हा ग्रुप त्या स्त्रीला ब्लॅकमेल करत आपल्या धाकात ठेवण्याचा प्रयत्न करत होता. त्यातूनही कुणी स्त्री बधली नाही तर तिला मारहाण करून आपल्या बंधनात ठेवून त्यांचे आर्थिक शोषण करत होता. आपल्या रितिकाचे काय होणार या विचारांनी राविनाचे हृदय कापू लागले होते, दिसायला साधारण, शरीराने लठ्ठ, घरी एकटी म्हातारी आई आणि कसलेच बॅकिंग नसलेली रितिका अल्ताफसाठी अतिशय सॉफ्ट टार्गेट होती.
रवीनाने तिला अल्ताफ आणि त्याच्या ग्रुपच्या सगळ्या कारनाम्याची कल्पना दिली. परंतु तिने रवीनाच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवला नाही. कारण अल्ताफने अगोदरच तिचे चांगलेच ब्रेन वॉश केले होते की, मैत्रिणी, मित्र, नातलग त्याच्या विषयी काहीही सांगून त्यांच्या प्रेमात मीठ घालायचा प्रयत्न करतील. रवीनाला कळून चुकले की तिच्या बोलण्याचा अथवा समजावण्याचा रितिकावर काही परिणाम होणार नाही, तेव्हा तिने हळहळत्या मनाने रितिकाचा 'काळजी घे, अगदीच गरज वाटली तर मला फोन कर' असा सल्ला देऊन निरोप घेतला.
क्रमशः
