भाग : ४
दिवसेंदिवस रितिका भोवती अल्ताफच्या प्रेमाचा पाश घट्ट होत चालला, तिची विचार करण्याची आणि स्वतःचे बरे वाईट समजण्याची बुद्धी भ्रष्ट झाली. फसव्या प्रेमाच्या जाळ्यात अडकलेल्या मासोळीला तडफडायला जाळे पण अपुरे पडत होते. अल्ताफचा एके दिवशी फोन जरी नाही आला तर तिच्या अंगाला कापरे भरून घशाला कोरड पडत होती. मनात एक दुखरी कळ सतत सलत असायची. अल्ताफने तिचे अस्तित्व व्यापून टाकले होते. रितिकाचा पगार आल्यावर लगेच संपत होता, कारण तिचे डेबिट कार्ड केव्हाच अल्ताफच्या वॅलेटमध्ये गेले होते. तिला स्वतःला लागणाऱ्या पैशांसाठी अल्ताफकडे हात पसरावा लागत होता. काही दिवस आईने पैसे दिले पण नंतर तिने पैसे देण्यास नकार दिला.
रितिकाच्या होणाऱ्या खाड्यांमुळे पगार कापून येत होता, तिच्या कडून पैशांचा ओघ कमी झालेला पाहून एके दिवशी अल्ताफने एकांतात तिला आपल्या बाहु पाशात घेतले, तिच्यावर चुंबनांचा पाऊस पाडत तिला घायाळ केले. अल्ताफच्या अचानक प्रेमाने रितिका पाणी पाणी झाली. तिला वाटू लागले की आज अल्ताफ आपल्याला निकाह ची खुशखबर देणार आणि आपले मिलन होणार. रितिका उतावळी होऊन अल्ताफच्या प्रेमात लिन होऊ लागली.... सुरवातीचे प्रणयाराधन सुरु झाले.... दोन जिस्म एक होण्याचा प्रसंग जवळ जवळ येऊ लागला... रितिकाला स्वर्ग दोन बोटे उरला होताच की अल्ताफ त्वरेने तिच्या पासून दूर गेला आणि डोक्याला हात लावून गंभीर चेहेरा करून बसला.
स्वर्गातून जमिनीवर आपटलेल्या रितीकाची अवस्था बिकट झाली होती. परंतु अल्ताफला गंभीर झालेले पाहून तिने घाबरत स्वतःला सावरले आणि अल्ताफच्या केसात हात फिरवून त्याला विचारले.
"काय झाले डियर, माझी काही चूक तर नाही ना झाली? तू मला सोडून तर नाही ना जाणार?"
तिच्या अंगाला कापरे भरले होते. अल्ताफने अतिशय गंभीर चेहेरा करत तिच्याकडे मान वळवली आणि तिच्या डोळ्यात डोळे घालत अतिशय दुःखात बोलू लागला.
"जानेमन रितिका !! मुझे भी अब ये दूरिया सही नहीं जाती, बोहोत मन करता है के हम एक हो जाये, लेकीन घर मे बेहेन की शादी तय हो रही है, और अब्बूने बताया के पांच लाख रुपये कम पड रहे है, माँ ने अपने जेवर बेच दिये है, अब मैं क्या करू? कहाँ से लाऊ इतना पैसा, लोन भी नहीं मिलेगा मुझे, मुझे अभी नौकरी भी नहीं हैं"
असे बोलत अल्ताफ भावनावश झाला... त्याने अश्रू गाळत रितिकाला मिठी मारली. अल्ताफच्या मिठीत रितिका विरघळून गेली. अल्ताफ कदाचित याच क्षणाची वाट पाहत होता, त्याने तिचा चेहेरा आपल्या दोन्ही हातात घेतला.. तिच्या डोळ्यात आपले हिरवे डोळे घालून त्याने पुन्हा एकदा तिच्या हृदयाचा थांग घेतला. त्याला कळून चुकले होते की आपली खेळी सफल झालीय. आता हाच क्षण कॅश करण्यासाठी योग्य आहे. त्याने पटकन स्वतःला तिच्यापासून वेगळे केले आणि खोट्या अश्रूंना डोळ्यातून गाळत भावनावश होऊन बोलू लागला.
"प्रिये! मी आपल्या बद्दल घरी सगळे सांगितले आहे, त्यांना आपला रिश्ता मान्य आहे, त्यामुळे ते तुलाही आपल्या घरची सदस्य मानतात हे तुझ्याही घरचे लग्न आहे. आपल्या घरची बहू म्हणून आपल्या दोघांना निकाह मधे बरीच कामे करायची आहे "
अल्ताफच्या इमोशनल अभिनयाचा रितिकावर योग्य तोच परिणाम झाला. तीने ठाम निर्णय घेतला की कोणत्याही परिस्थितीत त्याला पैशाची मदत करायची. अल्ताफच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी ती पटकन पुढे आली आणि त्याचे अश्रू पुसत बोलली.
"हो माझ्या राजा तुझे कर्तव्य ते माझेही आहे, तुला मदत करायला मला खुप आवडेल परंतु माझ्याकडे आता काहीच शिल्लक राहिलेली नाही. आता तूच सांग मी तुला कशी मदत करू?"
रितिकाचे शब्द ऐकून अल्ताफ आपली पुढील खेळी खेळण्यासाठी सरसावला. क्षणात त्याने आपल्या चेहेऱ्यावर निरागस भाव आणले आणि तिच्याकडे केविलवाणे पाहत बोलू लागला.
"मेरी जान! तू जर मला चुकीचे समजत नसशील तर एक मार्ग मला दिसतोय. पण प्लिज मला समजून घे. माझ्या आईने तर तिचे दागिने विकून काही रक्कम जमवलीय, तू तुझ्या आईचे दागिने काही अवधीसाठी गहाण ठेवण्यासाठी मिळवशील का? मी आपल्या प्रेमाच्या शपथेवर सांगतो की त्या कर्जावरील सगळे व्याज मी भरेन. प्लिज मला गलत नको समजू, जितक्या लवकर होईल तितक्या लवकर मी सगळे दागिने सोडवून तुला सुपूर्द करेन, परंतु या क्षणी मला सांभाळून घे"
असे बोलून अल्ताफने अश्रू गाळत रितिकाला आपल्या घट्ट मिठीत घेतले रितिकाने ही त्याला घट्ट मिठी मारत धीर देऊ लागली.
"माझ्या प्रिय राजा तू अजिबात काळजी करू नकोस, मी नक्कीच आपल्या घरातील लग्नासाठी ही मदत करेन, तू आता जास्त त्रास करू नकोस. मी आहे ना तुझ्यासाठी. आजच मी आईचे सगळे दागिने शोधून जमवते आणि तुला आणून देते. आता खुश हो बरे"
रितिकाच्या तोंडून अपेक्षित उत्तर आल्याने खुश झालेल्या अल्ताफने तिच्या ओढणीला आपले डोळे पुसले आणि प्रेमाने रितिकाच्या ओठांचे चुंबन घेऊन बोलला.
"मेरी जान! मला खात्री होती की तू मला समजून घेशील आणि या प्रसंगात साथ देशील. पण एक विनंती आहे की ही गोष्ट कुणाला कळता कामा नये. निकाहचा विषय आहे ना उगाच कुणाची नजर लागेल. चल मी आता घरी जातो, तू माझे मोठे टेन्शन दूर केलेस. लव्ह यु जान"
अल्ताफने जाताना पुन्हा एकदा तिला दागिन्यांचे काम लवकर करण्याची विनंती केली आणि रितिकाने मान डोलावून त्याला आश्वासन दिले. रितिकाने त्याच भारलेल्या अवस्थेत आईचे जेव्हढे भेटतील तेव्हढे दागिने जमा करून दुसऱ्याच दिवशी अल्ताफच्या हवाली करून दिलेले वचन पाळले.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा