Login

सोनियाचा उंबरा...भाग- ३ अंतिम

A woman trapped in a wealthy family battles for happiness and respect amid her husband and in-laws' indifference.
राधा ताईंनी हाक मारताच तिची विचार शृंखला तुटली. जेवण तयार असेल तर वाढून घे त्या बोलल्या. सुमाने भरभर ताटे केली सगळे जेवायला हजर होते,हजर नव्हता तो फक्त तिचा नवरा वैभव. सगळे हास्यविनोद करत जेवत होते. ती मात्र सोन्याचा घास असुनही कसे बसे खात होती. तिचा कंठ दाटून आला होता हल्ली तर रोजच तिचा नवरा वैभव उशीरा घरी येत होता. तो छंदीफंदी झाला होता आणि त्याला काही विचारायची सोय नव्हती. तो सुमा वर हात ही उचलू लागला होता.
दिड वर्ष लग्नाला झाले होते. आता घरात सगळेच सुमाला म्हणू लागले होते.
"पाळणा कधी हलनारहलनार?..आम्हाला आता आजी आजोबा व्हायचे आहे. पहिली चार नातवंड आहेतच पण आम्हाला आता वैभवच्या मुलाचे आजी आजोबा व्हायचे आहे."
आता हे केवळ सुमाच्या हातात थोडेच होते?..पण अशी बोलणी वरचेवर सुमाला ऐकून घ्यावी लागत होती.
सुमा विचार करायची त्यावेळी आईबाबांसाठी,भावंडांची खपाटीला गेलेली पोटं बघून मी वैभवच्या स्थळाला होकार दिला. मला तर शिकून नोकरी करायची होती. घरची परिस्थिती बदलायची होती. पण या लग्नानंतर बाबांचाही भार हलका होईल म्हणून मी नाविलाजाने होकार दिला आणि आयुष्यभरासाठी फसले. आता आईबाबांनीही काही सांगून त्यांना टेंशन द्यायचे नाही त्यांना वाटते त्यांची मुलगी सुखात आहे. सुमाचे डोळे भरून आले होते.

रेडिओवर गाणे लागले होते. चंदनाचे दार माझे सोनियाचा उंबरा. खरचं आहे सोनियाचा उंबरा?..सुमा खिन्नपणे मनात बोलली.

आता रोजच राधाताई तिला बोलू लागल्या होत्या "तुम्ही दोघांनी काही प्लॅनिंग केले आहे का?..
"नाही हो आत्या असे काही नाही" सुमा बोलायची.
"मग मुल का होत नाही कसला अडथळा येतोय?...
आता राधा ताईंची रोज भुणभुण सुरु झाली होती. तुझ्यातच काहीतरी दोष असेल. हे ऐकून ऐकून सुमा दु:खी झाली होती. मधल्या जाऊबाईला तिच्या दु:खाची जाणीव होती म्हणून एक दिवस ती सुमाला तपासणीसाठी दवाखान्यात घेऊन गेली. सगळ्या टेस्ट केल्या. सुमाच्या टेस्ट नॉर्मल आल्या होत्या. ती आई बनण्यास सक्षम होती.पण सांगणार कसे सासुबाईंना, 'तुमच्या मुलाची तपासणी करुन बघा म्हणून.'

दिवसेंदिवस सासुबाई राधाताईंकडून त्रास वाढला होता. ती दडपणाखाली वावरत होती. एक दिवस कंटाळून तिच्या रिपोर्टची फाईल तिने सासुबाईंपुढे ठेवली.
त्यावर त्या तिच्यावरच खवळून बोलल्या,
"तू माझ्या मुलात दोष आहे अस म्हणतेस का?...
वैभवने त्यांचे बोलणे ऐकले आणि संतापून त्याने सुमालाच झोडपून काढले.
परिस्थितीमुळे हतबल झालेली सुमा सहन करण्यापलिकडे काय करणार होती?...
अशा कितीतरी सुमा आहेत जे नशिबात आले ते भोगत बसणाऱ्या, कधी बदलणार हे सगळं?....
समाप्त
0