Login

सोनियाचा उंबरा...भाग - १

A woman trapped in a wealthy family battles for happiness and respect amid her husband and in-laws' indifference.
पोरीने नशीब काढलं,प्रत्येकाच्या ओठी हेच शब्द होते,कारण गरीब घरातील देखण्या सुमाला तालेवार घराणे मिळाले होते, जो तो तिच्या लग्नातील बडेजाव बघून , दिपून गेला होता.भरजरी वस्र, दागदागिने. सुमा दगिन्याने मढून गेली होती. गौरी सारखा तिचा मुखवटा फुलून गेला होता. ती खूप खूश होती. यशवंतराव पाटलांची ती धाकटी सून झाली होती.
लग्न लागले, उंबठ्यावरील माप ओलांडून ती घरात गेली आणि तिच्या सासुबाई राधा ताईंनी तिला घराण्याचे नियम सांगितले. डोक्यावरचा पदर अजिबात खाली पडू द्यायचा नाही आणि गळ्यातील दागिने उतरुन ठेवायचे नाहीत.
नवी नवरी सुमा सासुबाई सांगतील तसे वागत होती. सुरवातीला तिला ही रोज भारी साडी, दागदागिने घालायला आवडत होते पण नंतर मात्र कंटाळा येऊ लागला. रोज सजून धजून नवी नवरीसारख बसायचं तिला आवडेनासे झाले. दोन मोठ्या जावा होत्या त्या मस्त कामधाम न करता आनंदात रहात होत्या. घरातील कामाला नोकर चाकर होते. पण सुमाला नुसतं शोभेच्या बाहुलीसारखे बसून रहायला आवडत नव्हते. तिने हळूहळू किचनचा ताबा मिळवला,तिला कामाची सवय आणि स्वयंपाकाची आवड होती. ती वेगवेगळे पदार्थ बनवून घरातील सर्वांना खाऊ घालू लागली. तिच्यावर घरातील सगळे खूश होते. विशेषतः तिचे सासरे तिचे नेहमी कौतुक करत असत. तिच्या जावा ही सुरवातीला खूश होत्या पण रोज होणारे सुमाचे कौतुक त्यांना आवडेनासे झाले, त्या नाके मुरडू लागल्या. मधली जाऊ म्हणाली जाऊ दे आपल्याला काय रोज नवनवीन चविष्ट पदार्थ खायला मिळत आहेत ना मग बस्स झालं, आपण आपलं जिभेचे चोचले पुरवत मजेत रहायचं. पण सुमाला अपेक्षा होती नवऱ्याकडून कधीतरी त्याने आपण बनविलेल्या स्वयंपाकाचे कौतुक करावे असे तिला वाटत होते पण तिची निराशा होत होती.
दिवस हळूहळू पुढे सरत होते. नव्याचे नऊ दिवस सरले आणि सुमाचा नवरा वैभवने आपले रंग दाखवायला सुरवात केली.
रोज दारु पिणे, गुटखा खाणे अशी व्यसने त्याला होती. एवढी सुंदर बायको पण तो केवळ बेडरुममध्येच तिला सोबत करत होता, रात्री अपरात्री दारु पिऊन झिंगून तो घरी येई, दारुच्या भपकाऱ्याने तिला जीव नकोसा होई पण काय करणार सांगणार तरी कोणाला?...
काय होणार सुमाचे पाहूया पुढील भागात.
क्रमशः
30/४/२०२४