प्रवासाचा शेवट

आयुष्याच्या प्रवासाच एक छोट पण जिवंत चित्र.
आज मंदिरात गेलो होतो तिथे मला एक फार छान गोष्ट दिसली ती म्हणजे उजवीकडे काही लहान मुल खेळत होती आणि डावी कडे बाकड्यावर काही वृद्ध मंडळी बसली होती म्हणून म्हटलं जरा फोटो काढूया.
हाच तो फोटो, खर तर हा फोटो खुप बोलका आहे. उजव्या बाजूला आयुष्याच्या प्रवासाची सुरवात तर डावी कडे आता पर्यंतच्या प्रवासाचा होत आलेला शेवट. तरुण पणी अती उस्ताही, कुतुहलाने सर्व अनुभवण्याची असलेली धडपड, एक ही सेकंद एका जागेवर न बसणारे हिच लहान मुल जेव्हा म्हातारी होतात तेव्हा हळूहळू शरीरातला जोर आणि उस्साहा कमी होत होत हा कधी काळचा तरुण प्रवसी शांततेचा शोध घेत कसा एका बाकड्या वर स्थिरावतो त्याच हे बोलक चित्र.

- माझी डायरी.

Majhi diary माझी डायरी