कधीतरी व्हावी अशी ही संध्याकाळ..
अचानक आलेल्या
भुरुभुरू पावसाच्या सरींसोबत ,
अस्ताला जाणारा सूर्याचा गोळा लाल....
आकाश आणि सागराच्या मिलनावर
डोलत असावी एखादी तरी नाव...
भेटीच्या ओढीने लाटा घेत रहाव्या
किनाऱ्याकडे धाव...
डोलत असावी एखादी तरी नाव...
भेटीच्या ओढीने लाटा घेत रहाव्या
किनाऱ्याकडे धाव...
मग परत जाताना
लाटांनी ही वाळूने
गुदगुल्या कराव्या पायाला...
आणि म्हणावं,
बस थोडा वेळ,
पुन्हा कधी मिळणार आहे असं निवांत बोलायला...
समोरून धावत पळत येणारा
थंडगार वारा असावा..
त्याच्या येण्याने आनंदात
डोळणारा माडांचा पसारा असावा....
थंडगार वारा असावा..
त्याच्या येण्याने आनंदात
डोळणारा माडांचा पसारा असावा....
-❤️सोनाली
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा