प्रत्येकाची राग व्यक्त करण्याची आपापली एक वेगळी पदधत असते.
असे म्हणतात की राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रु आहे.अणि हे खरच आहे कारण रागाच्या भरातच माणुस अशा काही गोष्टी करुन जातो ज्याची आपण कधी कल्पणाही करु शकत नाही.म्हणुनच आत्तापर्यत घडुन गेलेले सर्व संत महात्मा हेच सांगुन गेले आहे की ज्याला रागावर नियंत्रण मिळविता आले त्याला पुर्ण जग जिंकता आले.म्हणुन म्हटले जाते की ज्याने स्वतावर विजय मिळविला त्याने सर्व जगावर विजय मिळविला.
पण आपण काही संत महात्मा नाही आपण एक सर्वसामान्य माणुस आहे.ज्याला राग हा येतोच फरक फक्त एवढाच आहे की काही लोक तो राग मनात दाबुन ठेवतात.किंवा गिळुन घेतात तर काही लोक तो राग व्यक्त करुन मोकळे होतात.अणि त्यातही प्रत्येकाची राग व्यक्त करण्याची एक आपापली वेगळी पदधत असते.
आपण प्रत्येक जण राग व्यक्त करण्यासाठी वेगवेगळया माध्यमांचा,साधनांचा वापर करत असतो.अणि हे मी माझे स्वताचेच उदाहरण देऊन सांगतो कारण मी स्वता माझा राग,भावना,विचार व्यक्त करण्यासाठी काही विशिष्ट माध्यमांचा वापर करत असतो.जसे की मी जेव्हा मला राग आला किंवा मी दुखी असलो तसेच आनंदी असलो तर मी लगेच त्या क्षणाविषयी माझ्या मनात जे काही येते ते मी लिहुन टाकतो.अणि लिहिणे हे माझे व्यक्त होण्याचे खुप आवडते माध्यम आहे.अणि माझ्या मनात जे काही आले ते मी डोळे झाकुन लिहुन टाकतो.अणि असे केल्यानंतर मला खुप आनंद भेटतो खुप हलके वाटते.मला अजिबात माहीत नाही की किती लोकांना माझे लेख मनापासुन आवडतात किंवा ते रोज आवडीने वाचतात.पण मी हे नक्कीच ठामपणे सांगु शकतो की माझे लेख वाचणारा विचारप्रवृत्त,भावुक झाल्याशिवाय राहणार नाही.
असो मी माझ्या लेखाच्या मुख्य विषयाकडे वळतो.अशाप्रकारे मी माझ्या भावना,विचार,राग,आनंद इत्यादी व्यक्त करण्यासाठी लेखन हया माध्यमाचा वापर करत असतो.मी माझा आनंद,राग,प्रेम,तिरस्कार इत्यादी सर्व काही भावभावना लेखनाच्या माध्यमातुन व्यक्त करत असतो.म्हणजेच लेखन हे माझे स्वताला व्यक्त करण्याचे एक माझे आवडते माध्यम आहे.अणि लिहुन व्यक्त होणे ही माझी स्वताची व्यक्त होण्याची एक वेगळी पदधत आहे.
अणि ज्याप्रमाणे मी माझ्या भावना,विचार व्यक्त करण्यासाठी लेखन हया पदधतीचा वापर करतो.तशीच प्रत्येकाची आपापली राग व्यक्त होण्याची एक वेगवेगळी पदधत असते.जसे की कोणी राग आल्यावर उशीला बुक्क्या मारते.म्हणजेच ज्या व्यक्तीचा राग आला आहे ती व्यक्ती म्हणजे ती उशीच आहे असे समजुन काही जण उशीला बुक्क्या मारतात जेणेकरुन त्यांचा रागही शांत होतो.अणि त्यांना त्यांचा रागही व्यक्त करता येतो.
त्याचबरोबर काही जण राग आल्यावर समोरच्या व्यक्तीला रागाच्या भरात मनात येईल ते समोरासमोर बोलुन मोकळे होतात.अणि मग त्यांचा राग शांत होतो.त्यांना हलकेहलके वाटते.मनावरील एक ओझे उतरल्यासारखे त्यांना वाटते.कारण बहुतेक जणांना राग मनात दाबुन ठेवता येत नाही.किंवा त्यांना ते आवडत नाही.म्हणुन ते त्यांचा राग समोरच्या व्यक्तीला समक्ष बोलुन किंवा त्याच्या समोर न जाता आपला राग ते त्या व्यक्तीपर्यत वेगवेगळया माध्यमांच्या आधारे पोहचववुन तो व्यक्त करतात.जसे की काही जण एखादया व्यक्तीचा त्यांना राग आल्यावर ते आपल्या व्हाँटस अँप,फेसबुक,टविटर,इन्स्टा हया प्रसारमाध्यमांवर स्टेटस टाकुन आपला राग व्यक्त करतात.आपला पुर्ण संताप ते त्या स्टेटसदवारे व्यक्त करतात कधी लिहुन तर कधी व्हिडिओ टाकुन त्या माध्यमातुन ते आपला राग व्यक्त करत असतात.
तसेच कोणी राग आल्यावर खुप मोठया आवाजात गाणे ऐकते.कोणी रागाच्या भरात वाईट व्यसन करते अणि ते व्यसन करुन ती व्यक्ती आपला राग शांत करते तसेच व्यक्त करते.म्हणुन जे लोक दारुच्या नशेत सदैव धुर्त असतात अणि नैराश्य आल्यावर वैताग आल्यावर राग आल्यावर दारू पितात ते दारुला दुख विसरण्याचे औषध संबोधतात.कारण त्या नशेत ते आपला सर्व राग अंदाधुंदपणे व्यक्त करुन मोकळे होतात.कधी ज्याचा आपल्याला राग आला आहे त्याला दारुच्या नशेत शिवीगाळ करुन तर कधी त्याला मारहाण करुन ते आपला राग व्यक्त करतात.
एवढेच काय तर काही जण राग आल्यावर ज्या व्यक्तीविषयी आपल्या मनात राग आला आहे तो व्यक्त करण्यासाठी त्या व्यक्तीला फेसबुक,व्हाँटस अँप,इन्स्टा,टविटर हया सारख्या सामाजिक प्रसारमाध्यमांवर ब्लाँक करुन टाकतात.काँलिंगवर ब्लाँक करुन टाकतात.त्याच्याशी संपर्कच तोडुन टाकतात.आपल्या मोबाईल मधुन त्या व्यक्तीचा नंबरसुदधा डिलीट करुन टाकतात.जेणे करुन असे केल्याने त्यांचा रागही शांत होतो अणि तो त्यांना त्यादवारे व्यक्त करुन मोकळेही होता येते.
अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांच्या आधारे आपण सांगु शकतो की प्रत्येक जण आपला राग हा वेगवेगळया पदधतीने व्यक्त करत असतो.पण राग हा प्रत्येक जण व्यक्त करतो हे नक्कीच.
अशा प्रकारे प्रत्येकाची राग व्यक्त करण्याची आपापली एक वेगळी पदधत असते.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा