Login

वर्तुळ..

A Short Poem
वर्तुळ..


* वर्तुळ*

केंद्रबिंदू हरवलाय
समजुतदारपणाचा...
अन् चौकटी निर्माण झाल्या
निरर्थक गैरसमजाच्या...
कोणाच प्रेम त्रिकोणी
तर कोणाच दु:खं चौकोनी...
मैत्री आणि हास्य
आपण गमावून बसतोय
कायमचं...
या साऱ्यात हरवत
चाललयं वर्तुळ हे
माणुसकीचं....
खरचं आयुष्य हे वर्तुळासारख
परिपूर्ण आहे का...??

_ हर्षदा नंदकुमार पिंपळे