Login

प्रेमातली अपेक्षा आणि विश्वास

नेहा त्याच्या आयुष्यात आली कॉलेजच्या दिवसांत. स्मार्ट, आधुनिक, कायम मोबाईलमध्ये रमलेली. सुरुवातीचे दिवस सुंदर होते. सकाळचे गुड मॉर्निंग मेसेज, रात्री उशिरापर्यंतचे कॉल, आणि भेटीतले ते नकळत हातात हात. रोहनला वाटायचं, आयुष्यभराची साथ मिळाली आहे.
प्रेमातली अपेक्षा आणि विश्वास.....सुनिल पुणेTM

अपेक्षा आणि विश्वास
कधीही चुकीचे नसतातच, फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण अपेक्षा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा. रोहनला हे वाक्य आयुष्यात उशिरा समजलं, पण ते समजण्याआधी त्याने मनापासून प्रेम केलं होतं. रोहन साधा होता, पगार मर्यादित, स्वप्नं मोठी आणि मन प्रामाणिक. नेहा त्याच्या आयुष्यात आली कॉलेजच्या दिवसांत. स्मार्ट, आधुनिक, कायम मोबाईलमध्ये रमलेली. सुरुवातीचे दिवस सुंदर होते. सकाळचे गुड मॉर्निंग मेसेज, रात्री उशिरापर्यंतचे कॉल, आणि भेटीतले ते नकळत हातात हात, गालावर किस तर घट्ट मिठीत. हेच रोहनला वाटायचं की आयुष्यभराची साथ मिळाली आहे.
एक दिवस नेहाचा फोन आला, “रोहन, आज माझा मोबाईल रिचार्ज संपलाय, करून देशील का?” रोहनने क्षणाचाही विचार केला नाही, आणि रीचार्ज केला कारण तो समजायचा प्रेमात असताना हिशोब नसतो व हेच त्याचं तत्त्व होतं. मग अशा छोट्या गोष्टी वाढत गेल्या. कधी पैशांची अडचण, कधी मैत्रिणींना पार्टी, कधी कुठे जायचं असलं की “तुझी कार आहे ना ?” रोहन प्रत्येक वेळी देत राहिला. त्याला वाटायचं, हे देणं म्हणजेच प्रेम आहे. पण तो देत असताना एक गोष्ट हळूहळू जाणवत होती नेहा कधीच त्याच्या थकलेल्या चेहऱ्याकडे पाहत नव्हती, त्याच्या अडचणी विचारत नव्हती, त्याच्या स्वप्नांबद्दल बोलत नव्हती. तिच्या प्रत्येक अपेक्षेत ‘ती’ होती, पण कुठेही ‘तो’ नव्हता.
एक दिवस रोहनने धीर करून विचारलं, “नेहा, मी तुझ्यासाठी काय आहे?” नेहा हसली, अगदी सहज, आणि म्हणाली, “अरे तू खूप चांगला आहेस ना… एवढं पुरेसं नाही का?” त्या शब्दांत प्रेम नव्हतं, फक्त सोय होती. त्या हसण्यात जिव्हाळा नव्हता, फक्त सवय होती. रोहन शांत झाला, पण त्याचं मन अस्वस्थ होतं.
काही दिवसांनी रोहनचं आयुष्य थोडं अडचणीत आलं. त्याने नेहाला सांगितलं, “सध्या माझ्याकडे पैसे नाहीत… आणि कारही विकली आहे.” त्या दिवसानंतर नेहाचे फोन कमी झाले. मेसेज उशिरा येऊ लागले. आधीचं आपुलकीचं बोलणं थंड झालं. आणि एक दिवस, रोहनने तिला दुसऱ्याच कुणाच्या आलिशान कारमधून उतरताना पाहिलं. त्या क्षणी त्याचं मन तुटलं, डोळे भरून आले, पण त्याचा आत्मसन्मान जागा झाला.
त्याला कळलं, खरं प्रेम कधीच मोबाईल रिचार्ज, पैसे किंवा कार विचारत नाही. खरं प्रेम विचारतं, “तू ठीक आहेस ना?” खरं प्रेम अडचणीत सोबत उभं राहतं, वापर करून निघून जात नाही. नेहाने प्रेम केलं नव्हतं, तिने फक्त गरज भागवली होती. आणि रोहनने एक गोष्ट स्वतःशी पक्की केली आता अपेक्षा करायच्या, पण योग्य माणसाकडून, आणि विश्वास ठेवायचा, पण जो निभावू शकेल त्याच्यावरच. कारण प्रेमात फसवणूक झाली तरी चालेल, पण स्वतःची किंमत गमावणं सर्वात मोठं नुकसान असतं........
सुनिल पुणेTM 9359850065
0