फेसबुक फ्रेंड
लेखिका - ©® स्वाती बालूरकर,सखी
"ही का मेसेज टाकत नाहीय? कशी काय विसरली मला? काय झालंय हिला?" शुभंकर स्वतः शीच चिडचिड करून बोलत होता.
आजही तो फेसबुक मेसेंजर वर तिच्या मेसेजची वाट पाहत होता. थोड्या थोड्या वेळानंतर फेसबुक उघडायचा आणि काहीतरी स्क्रोल करायचा , पुन्हा चेक करायचा. पण का कुणास ठाऊक पदरी निराशाच पडली होती.
गेल्या तीन दिवसांपासून तिचा एकही मेसेज आला नाही, असं यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. याशिवाय दुसरा कुठलाच संपर्क बिंदू दोघांत नव्हता. काय झालं असेल? कसा कॉन्टॅक्ट करू तिला?
आता त्याला चिंता वाटायला लागली.
सगळं ठीक आहे ना , या काळजीत तो पडला ,कारण सवय लागली होती.
तिच्या गुड मॉर्निंग मेसेज शिवाय त्याचा दिवस सुरू होत नव्हता आणि तिच्या गुड नाईट शिवाय त्याचा दिवस संपायचा नाही.
तिच्या गुड मॉर्निंग मेसेज शिवाय त्याचा दिवस सुरू होत नव्हता आणि तिच्या गुड नाईट शिवाय त्याचा दिवस संपायचा नाही.
त्याला सतत ती सोबत आहे असं वाटायचं इतकं जास्त, म्हणजे दिवसभर त्यांच चॅटिंग चालत असायचं .
ही वर्चुअल फ्रेंडशिप होती पण ती अशी वेगळीच होती, सोबत नसतानाही एकत्र असल्याचा भास होता. त्यामुळेच तिचा मेसेज न येणं जणू त्याच्यासाठी चिंतेचा विषय होता.
दीड वर्षांपूर्वी त्यांची फेसबुक वर मैत्री झाली होती. मेसेंजर वर संवाद वाढत गेल्यामुळे मैत्री झाली होती. मग दोघांनाही ते आवडायला लागलं. विचार जुळले, आवडी निवडी जुळल्या होत्या.
या दोघांनी सुरुवातीला ठरवलं होतं की एकमेकांचे फोन नंबर घ्यायचे नाहीत, फोनवर बोलायचं नाही आणि एकमेकांना भेटायचं नाही, तरीही आपली मैत्री टिकली पाहिजे. कधी भेटायचं नाही, सोबत रहायचं नाही त्यामुळे दोघेही बिनधास्त गप्पा मारायचे.
त्यामुळे दोघेही एकमेकांना जज करत नव्हते .
मनातलं सगळं बोलण्याचा एकमेव संपर्क म्हणजे ,फेसबुकचा मेसेंजर.
मनातलं सगळं बोलण्याचा एकमेव संपर्क म्हणजे ,फेसबुकचा मेसेंजर.
हळू हळू जाणवायला लागलं की किती एकसारखे स्वभाव होते दोघांचे! समविचारी .
त्यामुळे कुठलीच गोष्ट समजून सांगायची गरज पडायची नाही. लगेच कनेक्ट व्हायचं.
त्यामुळे कुठलीच गोष्ट समजून सांगायची गरज पडायची नाही. लगेच कनेक्ट व्हायचं.
मैत्री झाल्यापासून त्यांची बोलण्याची तऱ्हाच निराळी होती. . . फक्त आनंददायी!
कधीच एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यात जास्त लुडबुड केली नाही, खोलात गेले नाहित. ती त्याच्या पोस्ट बद्दल भरभरून लिहायची पण ती कधीच काही स्वतः च्या वेगळ्या पोस्ट टाकायची नाही त्यामुळे याला त्याबद्दल काहीच बोलता यायचं नाही किंवा कमेंट करता यायची नाही.
चॅटिंग चालू असताना,ती विचार करून हळूहळू टाईप करायची त्यामुळे तिला कधी कधी वेळ लागायचा पण याची टायपिंग फास्ट होती त्यामुळे तो तिच्या उत्तराची वाट पाहतच राहायचा.
तो तीन दिवसांपासून तिला खूप मिस करत होता, सगळे जुने दिवस आठवत होता आणि जुने मेसेजेस वाचत होता.
खरचं किती आनंद दिला होता तिने त्याला!
न पाहता, न भेटता देखील प्रचंड ओढ होती तिच्यासाठी.
आज तिचा प्रोफाइल पिक त्याने पुन्हा पुन्हा पाहिला.
तिने तिचा ठेवलेला ब्लॅक अँड व्हाईट फोटो. . तिला फोटोत पाहून तो तिला एंजल म्हणायचा. तो स्वतःशी हसला.
तिने हाच फोटो ठेवावा म्हणून त्याचा आग्रह!
तिने फक्त एकदाच बदलला होता प्रोफाइल पिक, पण त्याने पुन्हा हाच ठेवायला सांगितला होता.
पहिला दिवस कोरडा गेला होता, दुसऱ्या दिवशी त्यानेच दोन चार मेसेज टाकून पहिले पण उत्तर आलं नव्हते.
आज तिसऱ्या दिवशी तो भयानक बेचैन झाला होता.
आज तिसऱ्या दिवशी तो भयानक बेचैन झाला होता.
आता यावेळी . . तो खूप काळजीत होता. विचारात हरवला , मग तो भानावर आला.
"अरे एंजल कुठे गायब झालीस ? काय झालं? आहेस ना या जगात की?"
असा चिडून पहिल्यांदाच तिला मेसेज टाकला की ती आता तरी रिप्लाय करेल.
"असेल तिच्यासाठी मैत्री . . पण मी तिच्या प्रेमात आहे हे कसं सांगू तिला?" तो स्वतःशीच पुटपुटला.
अर्ध्या तासाने अचानक मेसेज आला," हो सध्या तरी आहे या जगात, हवं तर येवून बघ ! प्लीज मला भेटायला ये. शेवटची भेट समज!"
तो इतक्या टेंशन मधे सुद्धा मोठ्याने हसला.
'काय गुरु मिळालीय बुवा ही मैत्रीण. दुष्ट कुठली , मी जगात आहेस ना म्हणालो, तर शेवटचं भेट म्हणते!' तो स्वतः शीच बोलला.
"पण आपला नियम? तो मोडेल ना एंजल?" त्याने मेसेज टाकला.
"आपण बनवलेला नियम आपण तोडूच शकतो की? इतकं काय त्यात?" तिचे लगेचच उत्तर.
" ओके. मला चालेल. पण मग कुठे? कुठे भेटायचं ? तू कुठे राहतेस?"
" मी. . सध्या तुझ्याच शहरात आहे."
"दॅट्स ग्रेट, किती दुष्ट आहेस ग, आता सांगतेस काय ? पण एंजल, ते ठरलं होतं ना भेटायचं नाही म्हणून मग आता मेसेज टाकलास, म्हणून येतोय बरं का भेटायला . . पुन्हा भांडू नकोस! पण मग आज येवू की उद्या?"
"अरे आताच निघ , लगेच! पहिली आणि शेवटची भेट ना आपली मग घाई कर. . ये मी वाट पाहतेय!"
तिचा हा लगेच आलेला संदेश पाहून तो हरखून गेला, शरीरात अचानक ऊर्जेचा संचार झाला.
तिचा हा लगेच आलेला संदेश पाहून तो हरखून गेला, शरीरात अचानक ऊर्जेचा संचार झाला.
ती त्याला किती आवडायची हे कसं सांगणार होता तिला या चॅटिंग मधे. . पण आज मन म्हणालं की प्रत्यक्ष भेटतोय तर सांगायला काय हरकत आहे! ती काय म्हणेल? फारतर नाही म्हणेल इतकंच ना! म्हणू देत मला काही फरक पडत नाही.
तो पटकन तयार झाला. त्याला त्याचे आवडणारे बेस्ट कपडे त्याने घातले. चाफ्याचे अत्तर अगदी ठेवणीतले!
जाताना सुंदर लाल गुलाब आणि निशिगंधाचा पुष्पगुच्छ घ्यायला विसरला नाही.
विचार केला की दुसरं तिला काय गिफ्ट देणार? तिच्याबद्दल वैयक्तिक असं काहीच तर माहिती नाही त्याला. पण फुलं तिला आवडतात एवढं तर माहित आहे.
विचार केला की दुसरं तिला काय गिफ्ट देणार? तिच्याबद्दल वैयक्तिक असं काहीच तर माहिती नाही त्याला. पण फुलं तिला आवडतात एवढं तर माहित आहे.
तिने पाठवलेला मेसेज पुन्हा पुन्हा वाचत होता , मनात गुदगुल्या होत होत्या.
मेसेज टोन वाजला.
लोकेशन आणि पत्त्याचा मेसेज होता .
जवळच होता पत्ता, तो निघाला.
मेसेज टोन वाजला.
लोकेशन आणि पत्त्याचा मेसेज होता .
जवळच होता पत्ता, तो निघाला.
हो बरोबर, तिकडे, त्या एरियात एक मोठं “रोज केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल “होतं खरं. . . !
रोज केअर हॉस्पिटलच्या बाजूची अपार्टमेंट !
तो तिथे लवकरच पोहोचला.
हृदयात एक वेगळीच धडधड होत होती.
हा अनुभव एवढ्यासाठी वेगळा होता कारण. . एखाद्या मुलाने त्याच्या नेहमीच्या प्रेमिकेला भेटणे वेगळे पण ही तर. . . कधीच न पाहिलेली, न भेटलेली प्रेयसी होती!
हा अनुभव एवढ्यासाठी वेगळा होता कारण. . एखाद्या मुलाने त्याच्या नेहमीच्या प्रेमिकेला भेटणे वेगळे पण ही तर. . . कधीच न पाहिलेली, न भेटलेली प्रेयसी होती!
कशी वागेल?कशी बोलेल? कशी दिसत असेल रे ती ? गोड हुरहूर!
तिला पाहिल्यावर तो कशी प्रतिक्रिया देईल कळत नव्हतं .
त्याने गाडी पार्क करून लिफ्टमध्ये पाचव्या मजल्याचे बटन दाबले , फ्लॅट नंबर 501 , बरोबर आला आणि बेल वाजवली.
आणि दुसऱ्याच क्षणी एका सुंदर तरुणीने दरवाजा उघडला. ती मुलगी अगदी कॅज्युअल वेषात म्हणजे ट्रॅक पॅन्ट आणि टी-शर्ट वर होती, केसांचा घरगुती बांधलेला मेसी बन! साधी परंतु खूपच सुंदर!
पण तिचा चेहरा त्या प्रोफाइल पिक शी कुठेच जुळत नव्हता. . . असा अपेक्षाभंग होणारच होता. त्यामुळे त्यांने दारातच विचारलं, “एंजल ? आय मीन तिलोत्तमा?"
ती हसून म्हणाली, "प्लीज कम. शुभंकर राईट ?"
त्याने होकारार्थी मान हलवली आणि तो हसला.
"प्लीज कम इन, जिला भेटायला आलात ती तुमची एंजल आत आहे." ती आत जात म्हणाली.
तो एक क्षण हॉलमध्ये थबकला.
टेबलवर एंजल चा तोच ब्लॅक अँड व्हाईट फोटो होता , जो प्रोफाइल वर होता.
तो आत बेडरूम मध्ये तिच्या मागे गेला, आणि आतल्या खुर्चीवर बसला.
ती पाणी आणण्यासाठी किचन मध्ये गेली.
समोर बेडवर एक वयस्क महिला झोपलेली होती, त्याच्याकडे एकटक पहात होती, किती तेजस्वी चेहरा!
समोर बेडवर एक वयस्क महिला झोपलेली होती, त्याच्याकडे एकटक पहात होती, किती तेजस्वी चेहरा!
त्या मुलीने पाण्याचा ग्लास ट्रे मध्ये आणला होता, शुभंकर ने ग्लास हातात घेतला आणि चौकशी करेपर्यंत आवाज आला,
"आलास का शुभंकर? माफ कर रे, या जन्मात इतकीच साथ होती. . पुढच्या जन्मी असं नाही करणार! तुला एकदा पाहिलं, आता मी मरायला मोकळी!"
शुभांकरचा हात थरथरला, ग्लास खाली पडला आणि खोलीत सगळीकडे पाणी सांडलं.
अविश्वसनीय होतं हे. . ती वयस्क महिला , म्हणजे या तरुण मुलीची आजी हे बोलत होती.
तो पटकन उठून तिच्या जवळ गेला," तुम्ही ? तुम्ही कोण ? तिलोत्तमा. . ?"
"हां, मीच तुझी एंजल!"
ती नात पाणी पुसण्यासाठी पोंछा आणायला आत गेली असेल पण इथे एंजल च्या डोळ्यातून अश्रू वहात होते.
शुभंकरला जबरदस्त धक्का बसला होता. त्याला काहीच कळत नव्हतं. तो खूप संभ्रमित अवस्थेत होता.
तिने त्याचा हात घट्ट धरला होता, कुठल्या ओढीने माहित नाही पण त्याने एंजलला उठवून बसवलं.
मनात प्रचंड द्वंद्व होतं, फसवले गेल्याची भावना होती पण त्याला तिचा राग का येत नव्हता?
काहीतरी ऋणानुबंध असेल. . त्याशिवाय का अशी नाती बनतात. आता मात्र हिला जॉब विचारणार की तिच्या नाताच्या वयाच्या मुलाशी ही का चॅटिंग करत होती? का असा धोका दिला? कसं विचारायचं हे मनात जुळवत होता.
ती नात पाणी पुसून पटकन आजी जवळ आली.
इतक्यात एंजल ने त्याच्याकडे पहात हात जोडले. "सॉरी शुभंकर. . सॉरी डियर!"
आणि अचानक ती त्याच्या खांद्यावर निष्प्राण झाली.
आणि अचानक ती त्याच्या खांद्यावर निष्प्राण झाली.
नात मोठ्याने ओरडली "ग्रॅनी!"
आणि एकच शांतता!
आणि एकच शांतता!
नात रडत होती, शुभांकरच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. तिचा हात घट्ट धरलेला आणि खांद्यावर निष्प्राण मस्तक!
शुभंकर घरी परत आला पण त्याची अवस्था कुणीतरी प्राण काढून घेतल्यागत झाली होती.
******************
तिच्या तेराव्याला निरोप मिळूनही तो गेला नाही.
पंधराव्या दिवशी त्या नातीचा मेसेज होता,' एकदा भेटून जा, मी परत चालले आहे या शहरातून.'
पंधराव्या दिवशी त्या नातीचा मेसेज होता,' एकदा भेटून जा, मी परत चालले आहे या शहरातून.'
आता त्याला वाटलं , जायला हवं.
तो गेला आणि हॉलमध्ये शांत बसला. तिचं सगळं सामान वगैरे सगळं पॅक झालेलं दिसत होतं.
"शुभंकर सर, मी तिलोत्तमा! ती माझी आजी होती अनुसुया. तिला मी मागे स्मार्ट फोन आणि फेसबुक वापरायला शिकवलं होतं. आम्ही दोघीच सोबत राहायचो. मला नोकरीच्या चांगल्या संधीमुळे लंडनला जावे लागले. शिकत शिकत नोकरी करता येणार होती. तर जाताना माझा जुना फोन मी तिला दिला होता. बरीच एप्लिकेशन्स मी डिलीट केली आणि संपर्कासाठी फोन मात्र तिच्याकडे ठेवला.
परंतु माझं एफबी अकाउंट ती वापरेल असं वाटलं नव्हतं.”
परंतु माझं एफबी अकाउंट ती वापरेल असं वाटलं नव्हतं.”
“ओह् माय गॉड! म्हणजे ते तुमचं अकाउंट आहे तर! पण असं का केलं असेल त्यांनी?”
“ काय सांगणार? प्रेमाची भुकेली, २० व्यां वर्षी आजोबा गेलेले, कष्टाने दिवस काढलेले. आता कॅन्सर डिटेक्ट झाला होता, तिसरी स्टेज.
काय सांगू , तुम्हाला भेटण्याच्या ओढीने आम्ही या शहरात दवाखान्यात आलो, इकडे घर घेतलं. तिला खूप प्रेम आणि आनंद दिलात तुम्ही. थँक्यू!" तिने हात जोडले.
काय सांगू , तुम्हाला भेटण्याच्या ओढीने आम्ही या शहरात दवाखान्यात आलो, इकडे घर घेतलं. तिला खूप प्रेम आणि आनंद दिलात तुम्ही. थँक्यू!" तिने हात जोडले.
तो निःशब्द!
“ आम्ही कधीच भेटायचं नाही किंवा फोनवर बोलायचं नाही असं ठरवलं होतं म्हणजे सगळे ठरव तिनेच मांडलेले आणि मी फक्त हो म्हणायचो. म्हणूनच ती हळू हळू टाईप करायची. . “
तो एकेक आठवणी सांगत गेला आणि तिला आठवत गेला.
“ सत्तरीच्या बाईने फेसबुक वापरावा आणि मेसेंजर वर चॅटिंग करावं हे अविश्वसनीय आहे. मला तर ती न पाहिलेली एंजलच मनात बसली आहे. मैत्री म्हणून सुरुवात केली होती हो पण आता सांगायला हरकत नाही भावनिक रित्या खूप गुंतलो होतो तिच्यात. “ त्याचे डोळे भरलेले. . !
तो एकेक आठवणी सांगत गेला आणि तिला आठवत गेला.
“ सत्तरीच्या बाईने फेसबुक वापरावा आणि मेसेंजर वर चॅटिंग करावं हे अविश्वसनीय आहे. मला तर ती न पाहिलेली एंजलच मनात बसली आहे. मैत्री म्हणून सुरुवात केली होती हो पण आता सांगायला हरकत नाही भावनिक रित्या खूप गुंतलो होतो तिच्यात. “ त्याचे डोळे भरलेले. . !
“ कसली रोमँटिक होती माझी ग्रॅनी. . मला टिप्स द्यायची. “ती देखील आठवणीत अश्रू गाळत होती.
“तुम्ही त्यांच्या?”
"मी तिची नात, म्हणजे , तिच्या मुलीची मुलगी. प्रेमाला वयाची बंधनं नसतात असं म्हणायची ग्रॅनी . ती शेवटचा काळ छान जगली तुमच्यामुळे! तिचं मरणही सुखकर झालं. तुमच्यासारख्या जवळच्या मित्राच्या खांद्यावर तिने जीव सोडला. नाही का!"
त्याला बोलण्यासाठी काहीच राहिलं नव्हतं.
शुभंकर ने एंजल च्या फोटोला श्रध्देने हात जोडले आणि परत निघाला, कदाचित पुढच्या जन्माच्या आशेत!
***********
दिनांक. १४ नोव्हेंबर २४
लेखिका - ©® स्वाती बालूरकर,सखी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा