Login

रक्तदान : महादान ( अंतिम भाग )

रक्तदानाचे महत्त्व
रक्तदान : महादान

भाग ४ ( अंतिम भाग )

मागील भागात आपण पहिले कि डॉ कॉलेज मध्ये येऊन रक्तदान या विषयवार मुलांशी संवाद साधला . मुलांच्या प्रश्नांचे निरसन केले . आता पुढे

समीर ने सगळयांना आवाहन केले रक्तदान करण्याबद्दल अन सगळे कॉलेज मधून बाहेर पडले. बाहेर आलयावर डॉ म्हणाले , " आता मी तुमच्या पुढे मुलांच्या मनातील आढी कमी करायचा प्रयन्त केलाय . आता तुम्ही गावात जाऊन मोठ्या लोकांना समजवायचा काम हाती घ्या . उदयाचे शिबीर यशस्वी करायचे आहे आपल्याला त्यामुळे पुन्हा जोमाने कामाला लागा . चला येतो मी . "

डॉक्टर गेल्यावर सगळे एका चहाच्या टपरी जवळ येऊन चहा घेत होते . एकीकडे पुढे काय करायचे नियोजन करू लागले . तेवढ्यात कॉलेज मधून एक मुलगा त्यांच्या जवळ येऊन म्हणाला , " मला तुमच्याशी बोलायचे आहे . मी बोलू का ?"

स्वप्नील म्हणाला , " बोल ना . काय झाले ."

" नमस्कार , माझे नाव विनय आहे. मी आता १४ वी करतोय मला तुमच्या बरोबर हे काम करायला आवडेल . तर मी तुमच्या बरोबर येऊ का ? "

समीर , " अरे व्वा . ये कि . "

समीक्षा म्हणाली , " तुला आता डॉक्टरांनी सांगितलेले पटले का .? तुला खरच काम करायची इच्छा आहे ?"

" हो खरंच इच्छा आहे . माझे वडील आज १५ वर्ष झाली त्यांना दर महिन्याला एक रक्तची बाटली भरावी लागते . काही वेळेला त्यांना आवश्यक रक्तगट उपलब्ध नसेल तर खूप अडचण निर्माण होते . तुम्हाला मदत केली तर तेव्हढंच सत्कार्य . "

स्वप्नील म्हणाला , " ठीक आहे . आता आपण गावाचा भाग वाटून घेऊ . आणि तिथे दोघे दोघे जाऊ . लोंकाना समजवायचे काम करू . "

" चालेल. चला निघूया. " असं म्हणून सगळे आपापल्या भागात निघाले.

त्यांनी बऱ्याच लोकांशी संपर्क साधला. लोकांना रक्तदानचे महत्व पटवून दिले . उद्या रक्तदान करायला सांगितले. त्यांच्या बरोबर कॉलेज मधील अजून काही मुले त्यांना मिळाली. त्यामुळे गावापासून आजूबाजूला जी गावे होती तिथे पण जाऊन कामे करू लागली.

त्यांच्या बरोबर ती गाडीपप फिरत होती . मुले प्रत्येक घरा घरा जाऊन संवाद साधत होते. त्यामुळे लोकांना मुलांचे कुतूहल वाटत होते.

दिवसभर हे कार्य करून संध्याकाळी सगळे जिथे शिबीर होते तिथे आले. डॉ पण आले होते . सगळयांनी पहिल्यादा चहा घेतला. चहा घेताना कसा प्रचार केला याचे सविस्तर सांगू लागले.

विनय म्हणाला, " मी एका आजोबांशी बोलत होतो. त्यांना हा उपक्रम आवडला. ते म्हणाले की, माझ्या मुलाच्या बाबतीत रक्त लवकर न मिळाल्यामुळे त्याला खूप त्रास सहन करावा लागला. मला तर शक्य नाही रक्तदान करायला पण माझ्या नातीला मी नक्की पाठवणार. "

समीर म्हणाला, " डाँ आम्ही जनजागृती केलीय . उद्या मोठ्या संख्येत हे शिबिर पार पडायला पाहिजे.

" अरे पडेल. चांगला विचार करा. आपल्या कार्याला नक्की यश मिळणार. चला आपण उद्या भेटू. "


दुसऱ्या दिवशी म्हणजे २६ जानेवारीला झेंडा वंदन झाल्यावर बरोबर आठ वाजता सगळे राम मंदिराच्या सभागृहात जमले. तिथे डॉक्टरांची टिम हजर होती. त्यांनी सगळी तयारी केली होती तर मुलांनी जे रक्तदान करणार होते त्यांना चहा नाष्ट्याची सोय करून ठेवली.

नऊ वाजता गावच्या सरपंचांच्या हातून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. डॉक्टरांनी पहिल्यांदा रक्तदान केले. त्यामागोमाग या मुलांनी केले . त्यामुळे गावतील लोकांना त्यांच्यावर विश्र्वास निर्माण झाला.

बघता बघता गावातील साधारण १५० लोकांनी रक्तदान केले.

खरोखरच सगळ्यांना खूप आनंद झाला. ज्या गावातील लोक या गोष्टीला नावे ठेवत होती तिथे एवढ्या लोकांनी रक्तदान करून गावकऱ्यांना वेगळा संदेश दिला. त्यामुळे मुलांना आपण चांगले कार्य केल्याचे समाधान मिळाले.

डाँक्टर व चार पाच लोकांनी गावतील जनतेला एक नवा दृष्टिकोन दिला म्हणून सरपंचांनी सगळ्यांचे सत्कार करून आभार मानले.

डॉ म्हणाले , " अजून ही काही भागात अशी जनजागृती होऊन गावतील लोकसंख्येच्या ५० टक्के च्या वर लोकांनी रक्तदान करण्याची गरज आहे. ग्रामीण भागात नाही तर शहरी भागात पण जनजागृती होणे गरजेचं आहे.

त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की, तुम्ही आपल्या ओळखीच्या लोकांना याचे महत्त्व पटवून द्या. जास्तीत जास्त लोकांना रक्तदान करायला तयार करा. "

यावर सरपंच म्हणाले, " आम्ही तर लोकांना सांगूच पण आजपासून दर वर्षी १५ आँगस्ट आणि २६ जानेवारी रोजी आपल्या गावात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येईल. तर डाँक्टरानी दर वर्षी आमच्या गावत शिबिराचे नियोजन करावे ही विनंती. "


यातून मी वाचक वर्गाला विनंती करते तुम्ही पण रक्तदान करून दानाचे पुण्य मिळवावे.


समाप्त

©® सौ. चित्रा अ. महाराव