Login

रक्तदान : महादान भाग ३

रक्तदानाचे महत्त्व
रक्तदान : महादान

भाग ३

मागील भागात आपण पहिले कि कॉलेज मध्ये डॉक्टरांचे रक्तदान या विषयवार व्याख्यान ठेवले . बघू या काय होतंय ते व्याख्यानात ?


बरोबर तीन वाजता सगळे जमले . पहिल्यांदा डॉक्टरांनी मुख्याध्यापकांची भेट घेतली . तिथे चहापान करून ते सगळे सभागृहात आले . मुख्याध्यापकांनी बोलायला सुरवात केली , " नमस्कार , आज आपल्याकडे डॉ . आपटे आलेत . ते आपल्याला रक्तदानाबद्दल सांगणार आहेत . तर सगळयांना विनंती करतो कि आपण शांत चित्ताने ऐकावे. "

डॉ आपटे म्हणाले , " नमस्कार . मी डॉ आपटे . मी आपल्या गावात रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे . मी काय तुम्हाला भाषाण देणार नाहीये. तर आपण गप्पा मारू. मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. तुम्ही काही मला विचारा. चालेल ना ?"

सगळे एकदम ओरडले , " चालेल. "

एक मुलगा म्हणाला, " डॉ आम्हाला रक्तदानाची खरज गरज आहे का ?"

डॉ. म्हणाले, " याचे उत्तर तुम्ही द्यायचे पण सगळ्यात शेवटी. आधी मला सांगा , तुम्हाला माहितीय शरीरात रक्ताची का गरज असते ?

एका मुलगा म्हणाला , " आपण पौष्टीक अन्न खाऊन रक्त जमा करतो . ते रक्त आपल्या आख्या शरीरात वाहत असते . त्यामुळे शरीरातील सगळे अवयव चालू राहतात ."

" म्हणजे काय रे ?"

दुसरा मुलगा म्हणाला , "अहो ,किती सोप्प आहे हे . हे रक्त आपले अवयव सुरळीत चालू ठेवायचे काम करते . "

डॉ म्हणाले , " अगदी बरोबर . म्हणजे आपलं शरीर चालवायचे असेल तर रक्ताची खूप गरज आहे.

ह्या रक्तात काही घटक असतात . ते आपलं शरीर योग्य रीतीने चालू ठेवण्याचे काम करतात . "

मुलगा म्हणाला , " तुम्ही हे जे शिबीर आयोजित केले आहे . त्या शिबिरात तर तुम्ही आमचेच रक्त काढून घेता मग ....... "

" हो बरोबर आहे आमचे रक्त घेता मग आमची तब्येत खराब नाही का होणार ?" दुसरा मुलगा म्हणाला

डॉ म्हणाले आता मी याचे कार्य कसे चालते ते सांगतो म्हणजे तुमच्या प्रश्नाची उत्तरे मिळतील.

"आपण जे खातो त्याने आपले रक्त तयार होते हे तर तुम्हाला माहितीच आहे . साधारण १८ ते ६० वर्षापर्यँत तुम्ही हे रक्तदान करू शकता म्हणजे काय तर तुमच्या तरुण वयात हे रक्त आपण जर दिले तर आपण खाल्ल्यावर आपल्या शरीरात रक्त भरून येते . म्हणजे या वयात आपल्याला काय खायला पाहिजे ? किती खायला पाहिजे हे समजते त्यामुळे आपल्याला काही त्रास होत नाही . शरीरात लगेच रक्त निर्माण होत असते त्यामुळे त्रास होत नाही. "

एक मुलगी म्हणाली , " हे पटले. पण तुम्ही हे रक्त घेऊन त्याचे करता काय ? याचा तुम्हाला काय उपयोग काय ?"

" हे दान केल्यामुळे तुम्ही एका माणसाचा जीव वाचवू शकता . तुम्ही दिलेले रक्त आधी त्याची तपासणी करून ते दुसऱ्यास वापरू शकू असे रक्त ब्लड बँक म्हणजे जिथे एका पिशवीत साठवून ठेवतात . मग जशी गरज आहे तसे ते वापरले जाते.

मगाशी तुमचे सर सांगत होते कि काही दिवसा पूर्वी कॉलेज पाशी एका विदयार्थी चा अपघात झाला. रुग्णवाहिका येत पर्यन्त तिचे खूप रक्त वाया गेले . त्यामुळे तिला ऑपेरेशन करताना रक्ताची गरज होती पण लवकर कुठेही रक्त उपलब्ध नाही झाले त्यामुळे तिला जीव गमवावा लागला . खरंय ना ?" सगळ्यांनी माना हलवल्या .

ते पुढे म्हणाले , " त्याच वेळी तुमच्या एकाने सुद्धा विचार करून रक्त देयची तयारी दाखवली असती तर तुमची मैत्रीण आज जिवंत असती . असा प्रसंग कोणावर येऊ शकतो आणि या वयात तुम्हाला कोणताही आजार नाहीय . कारण आजार असणार व्यक्ती रक्तदान करू शकत नाही . त्यामुळे तुम्ही आनंदाने रक्तदान करू शकता .

रक्तदान तुम्ही केले तर थोडा अशक्त पणा जाणवतो पण फार वेळ नाही. तुम्ही अर्धा तासात जेवलात कि तो लगेच भरून येतो . त्यामुळे काळजी करण्याचे काही कारणच नाही . "

एक मुलगा म्हणाला , " डॉ तुमचे अगदी बरोबर आहे पण आपण ऐकतो कि जी सुई वापरतात त्यामुळे आम्हाला काही आजार झाला तर ... "

" तुझा प्रश्न अगदी बरोबर आहे पण प्रत्येक व्यक्तीला नवीन सुई टोचली जाते . तुमचा आधी रक्तगट चेक केला जातो मग तुम्हाला कॉटवर झोपवून नवीन सुई टोचूनच मग रक्त घेतले जाते त्यामुळे तुम्हाला काही त्रास होणार नाही . यावर एकच तुम्ही एकदा रक्तदान करूनच बघा . म्हणजे तुम्हाला त्याचा अनुभव येईल . "

समीर म्हणाला , " तुम्ही तर अनुभव घ्या पण आपल्या घरच्यांना समजून सांगा आणि जास्तीच जास्त लोकांनी रक्तदान करावे अशी मी तुम्हाला विनंती करतो . "

डॉक्टरांनी सरांचे आभार मानले आणि ते निघून गेले .

बघूया पुढच्या भागात हि पोरं करतायत कि नाही रक्तदान .

क्रमश :

©® सौ . चित्रा अ महाराव

अष्टपैलू लेखन स्पर्धा २०२५

🎭 Series Post

View all