रविवारची सकाळ होती. आज मनीषाला आराम होता, कारण आजचा नाश्ता बनवण्याची पाळी, तिची मुलगी किमयाची होती. त्याचबरोबर घरातली आवराआवर आणि साफसफाई ,ही जबाबदारी आज तिचा मुलगा मानवाची होती.
नवरा मंगेशकडून फारशी अपेक्षा नव्हती ,पण त्यानेही दर रविवारी आठवडाभराचा किराणा आणि इतर सामान आणून देण्याची जबाबदारी स्वीकारलेली होती .त्यामुळे काल रात्री त्याच्या हातात यादी मनीषाने सोपवलेली होती .
नाश्ता करून झाला की तो सामान आणायला जाणार होता. किमया ने छान पैकी पास्ता नाश्त्याला बनवला होता. थोडासा सगळ्यांनाच बदल .रोज रोज पोहे उपमा थालीपीठ खाऊन ,आपापल्या कामाला पळणार ,यांना रविवारी थोडीशी वेगळी चव चाखायला मिळत होती.
खरेतर मनीषाला हे नूडल्स पास्ता फारसे आवडायचे नाही, पण आपल्यासाठी मुलं आठवडाभर खातात ना ,आपण बनवलेला नाश्ता एक दिवस खाऊया त्यांनी बनवलेल्या चवीचा नाश्ता ,असा विचार करून मनीषा तो पास्ता आवडीने खात होती.
रविवारी नाश्ता झाल्यानंतर ,अर्धा तास त्यांच्या घरात ,त्या चौघांच्या गप्पांचा सेशन असे.आठवडाभर एकमेकांना सांगायचं राहिलेलं सगळेजण मनमोकळेपणाने सांगायचे. त्यांच्या अडचणी आणि काही चांगल्या गोष्टीच ॲप्रिसिएशन तिथेच व्हायचं. पुढच्या आठवड्यात किंवा महिन्यात काही विशेष असेल किंवा कुठे जायचं असेल तर त्यादृष्टीने ही चर्चा व्हायची ,हा अर्धातास त्यांच्यासाठी खरोखर फॅमिली कट्टा असायचा.
कधी मनीषाच्या शाळेतील त्रास ,कधी मंगेशच्या ऑफिसमधले टेन्शन्स ,कधी किमयाची मैत्रिणींसोबत ची भांडण ,आणि मानवचे अभ्यासातले प्रॉब्लेम, कुठल्याच विषयाला तिथे अडसर नव्हता. सगळ्यावर छान चर्चा व्हायची. प्रत्येक वेळी काही कसला कोणाला सल्ला हवा असं नसायचं ,तर ठीक आहे असं चालायचं ,असं म्हणून एक आश्वासक पाठीवर थोपटणे हवे असायचं ,ते या फॅमिली कट्ट्यावर हमखास व्हायचं .
मनीषाला आठवलं ,ही सवय तिला ,तिच्या सासर्यांनी लावली होती. त्यांचं लग्न झालं त्या वेळेला तीची नाही नणांदही ,त्यांच्यासोबत राहात होती .बाबा या सगळ्यांना घेऊन दर रविवारी ,अर्धा तास गप्पा मारायला न चुकता बसायचे. हीच सवय मनिषा आणि मंगेशनेही, ते गेल्यानंतर त्यांच्या मागे सुरू ठेवली होती, आणि यामुळे त्यांच्या आयुष्यात आलेल्या अनेक अडचणींवर त्यांनी यशस्वीपणे मात केली होती .
या रविवारी मंगेश ने त्याच्या ऑफिस विषयी सांगायला सुरु केली ,"
अग मनीषा सध्या तू सगळीकडे स्लोडाऊन चालू असल्या विषयी वाचले असशील ,आमच्या कंपनीलाही याचा फटका बसतो आहे. यापुढे मला पंधरा दिवसच कंपनीत काम असणार आहे आणि पंधरा दिवस ब्रेक असणार आहे आणि पगारही त्या प्रमाणात कमी मिळणार आहे तेव्हा आपल्याला आता पुढचे किमान सहा महिने घर खर्चाचे गणित कसे जमवायचे याविषयी विचार करावा लागणार आहे "
"बाबा आम्ही सगळे आहोत तुमच्या पाठीशी", किमयाने आणि मानवाने एकासुरात म्हटले ,"आपण कुठे कुठे पुढचे सहा महिने बचत करायची याविषयी विचार करू या आणि आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे की आई शिक्षिका आहे त्यामुळे आईच्या व्यवसायात नक्कीच स्लोडाऊन येणार नाही "
"आता आपल्याला आपल्या जीवनशैलीत थोडासा बदल केला की हा पंधरा दिवसाचा ब्रेक फारसा जाणवणार नाही हे नक्की" मनीषाने ही आपल्या मुलांची री ओढली .
"मीही पंधरा दिवस ब्रेक असेल त्यावेळेस दुसरे काही काम मिळते का यासाठी प्रयत्न करणारच आहे काही कंपन्यांमध्ये फ्रीलान्स काम मिळते का यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत "मगेंश म्हणाला.
"बाबा काळजी करू नका ,आपण कुठेकुठे बचत करू शकतो हे आधी बघूया ,म्हणजे तुमच्या कमी येणाऱ्या पैशांचा आपल्या जीवनात काहीच परिणाम होणार नाही"किमया .
"आणि काही खर्च कसेही झाले तरी बंद करायचे नाही जसे म्युचल फंडात चालू असणाऱ्या एसआयपी मेडिक्लेम आणि इन्शुरन्स याचा खर्च मात्र दरमहा नियमित जो आहे तो करतच राहू या "
मनिषा म्हणाली
"हॉटेलिंग शॉपिंग आणि पर्यटन स्थळी फिरायला जाणं याच्यामध्ये आपण तडजोड करू शकतो ,अगदी मन मारून नाही राहायचे पण शंभर टक्के ऐवजी आपण त्यावर 25 टक्के खर्च करू या."किमया.
"पेट्रोलचा खर्च वाचवण्यासाठी जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे पायी जाणे किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरणे करूया "इति मानव
"विकतचे खाद्यपदार्थ आणण्यापेक्षा रविवारी मी आईला मदत करत जाईल आम्ही घरीच थोडंसं आठवडाभराचे फराळाचे बनवून ठेवत जाऊ "किमयाचि आश्वासक आधार.
मंगेश ला खूपच रिलॅक्स वाटले आपली पूर्ण फॅमिली सोबत असताना या स्लोडाऊन ची खुप काही काळजी करण्याची गरज नाही ,हे जाणवलं .मुळात आपले कुटुंब खरोखरच फक्त सुखात नाही दुःखातही आपल्या सोबत असते ही जाणीवच सुखावणारी होती.

मैत्रिणींनो कधी सुरु करताय मग तुमच्याही घरी असा फॅमिली कट्टा. जो तुमच्या कुटुंबाचा आधारस्तंभ ठरेल आणि सर्वांच्या विकासासाठी हातभार लावेल.अनेक निराशेचे क्षण येण्याआधीच ,दूर पळवेल.