Login

मुलांसाठी फॅन्सी ड्रेस आयडिया / मुलांसाठी वेशभूषा आयडिया

Best options for boys fancy dress competition.

मुलांसाठी फॅन्सी ड्रेस आयडिया / मुलांसाठी वेशभूषा 

शाळा म्हणलं की वेगवेगळे उपक्रम आणि त्यात असणारी मजा ही आलीच. शाळेतला सगळ्यांना आवडणारा असा एक उपक्रम म्हणजे फॅन्सी ड्रेसची स्पर्धा. म्हणजेच वेशभूषा स्पर्धा. 

मुलींना वेशभूषा स्पर्धेसाठी तयार करणं तसं सोपं काम. कारण त्यांच्याकडे पर्यायही खूप असतात ना! पण मग मुलांचं काय? म्हणूनच आपण या लेखात बघूया मुलांना फॅन्सी ड्रेस स्पर्धेत काय काय वेशभूषा करून जाता येईल आणि त्यासाठी काय काय तयारी करावी लागेल. चला तर मग जास्त वेळ न दवडता सुरुवात करुया. 

आधी पाहूया थोर व्यक्तींची वेशभूषा:- 

१. छत्रपती शिवाजी महाराज:- अखंड महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा मुलं सहज करू शकतात. यासाठी कोणत्या साहित्याची आवश्यकता असेल हे बघू. 

  • जिरे टोप
  • माळा
  • कपाळावर लावण्यासाठी गंध 
  • छत्रपती शिवाजी महाराजांसारखा सदरा
  • तलवार 

खालील फोटो पाहून तुम्हाला अंदाज येईलच. (सादरकर्ता:- साई कांबळे) 

२. चाचा नेहरू:- लहान मुलांना अगदी प्रिय असलेले जवाहरलाल नेहरू यांची वेशभूषा देखील मुलं करू शकतात. 

ही वेशभूषा करण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टींची आवश्यकता असेल

  • जॅकेट 
  • गुलाबाचे फुल
  • टोपी 

(सादरकर्ता:- आयुष कुलकर्णी) 

आता पाहूया धार्मिक वेशभूषा

१. श्री कृष्ण:- कृष्णाचे कोणतेही रूप हे मनमोहक असते आणि त्यात लहान लहान मुलांनी श्री कृष्णाची वेशभूषा केली तर ते बाल गोपाळ अजूनच मोहक दिसतात. 

ही वेशभूषा करण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टींची आवश्यकता असेल

  • मुकुट 
  • मोरपीस 
  • बासरी 
  • दागिने 
  • गंध 
  • धोतर 

खालील फोटो बघून तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या सामनातून मुलाला कृष्णाची वेशभूषा करून देऊ शकता. 

(सादरकर्ता:- दर्शील वैरागडकर) 

(सादरकर्ता:- साई कांबळे) 

(सादरकर्ता:- आयुष कुलकर्णी) 

(सादरकर्ता:- श्रेयस कुलकर्णी) 

(सादरकर्ता:- रचित खंडारे) 

२. गुरू द्रोणाचार्य:- द्रोणाचार्य हे एक महान गुरू होते आणि त्यांची वेशभूषा करण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टींची आवश्यकता असेल. 

  • दाढी - मिश्या विग
  • केसांचा विग 
  • सोवळे
  • रुद्राक्ष माळा
  • जानवे
  • कपाळावर लावण्यासाठी पांढरे गंध 

(सादरकर्ता:- श्रेयस कुलकर्णी) 

३. खंडोबा:- खंडोबा किंवा खंडेराया हे महादेवाचे एक रूप. खंडोबाची वेशभूषा करण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टींची आवश्यकता असेल. 

  • तलवार 
  • दागिने 
  • धोती
  • उपरणे 
  • चंद्राची कोर असलेली पगडी
  • वाळे (पायात घालण्यासाठी)
  • भंडारा (हळद)

(सादरकर्ता:- आयुष कुलकर्णी) 

४. ऋषीमुनी /साधू:- ऋषीमुनी बनण्यासाठी खालील गोष्टींची आवश्यकता असेल. 

  • भगवे वस्त्र 
  • केस आणि दाढीचा विग 
  • कमंडलू 
  • माळा

(सादरकर्ता:- दर्शील वैरागडकर) 

(सादरकर्ता:- आयुष कुलकर्णी) 

५. सांता क्लॉज:- ख्रिसमस मध्ये सगळ्यांचं आकर्षण असणारा सांता क्लॉज बनण्यासाठी खालील गोष्टींची आवश्यकता असेल. 

  • लाल कपडे 
  • पांढऱ्या दाढी, मिश्या, केस यांचा विग 
  • चॉकलेटने भरलेली पिशवी 
  • घंटा

(सादरकर्ता:- विहान सावंत) 


 

दैनंदिन जीवनातील वेशभूषा 

१. दुकानदार:- आपल्या रोजच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे खरेदी विक्री. यासाठी आपला संबंध अनेक प्रकारच्या दुकानदारांशी येत असतो. त्याच दुकानदारांची वेशभूषा मुलं अगदी सहज आणि घरात उपलब्ध असलेल्या सामनातून करू शकतात. 

(I) भाजीवाला:- भाजीवाला बनण्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे. यासाठी तुम्हाला खालील गोष्टींची आवश्यकता असेल. 

  • डोक्याला बांधण्यासाठी पंचा / ओढणी 
  • भाजीची टोपली 
  • घरात उपलब्ध असलेली भाजी 

(सादरकर्ता:- दर्शील वैरागडकर) 

(II) दुकानदार:- दुकानदार बनण्यासाठी खालील गोष्टींची आवश्यकता असेल. 

  • घरातील थोडेफार सामान 
  • टोपी
  • कुर्ता आणि पायजमा 
  • पैसे म्हणून बनवलेल्या कागदी नोटा 

(सादरकर्ता:- आयुष कुलकर्णी) 

(III) पोलीस अधिकारी:- पोलीस म्हणलं एक सुरक्षितता वाटते आणि अश्या पोलिसांची वेशभूषा लहान मुलांनी केली तर क्या बात! 

यासाठी तुम्हाला खालील गोष्टींची आवश्यकता असेल. 

  • खाकी कपडे 
  • पोलिसांची टोपी 
  • काठी 
  • खेळण्यातील बंदूक 

(सादरकर्ता:- निशांत कोंडके) 

(सादरकर्ता:- साई कांबळे) 

(IV) ज्योतिष:- दैनंदिन जीवनात लोकं एखाद्या समस्येने ग्रस्त असतील तर ज्योतिषाचा सल्ला घेतात. त्यांची वेशभूषा करणे अगदी सोपे आहे. यासाठी तुम्हाला खालील गोष्टींची आवश्यकता असेल. 

  • झोळी 
  • सदरा आणि लेंगा 
  • पंचाग 

(सादरकर्ता:- निशांत कोंडके) 

(V) अँक्शन हिरो:- सध्याच्या युगात टीव्हीवर बघण्यात आलेले कलाकार लोकप्रिय असतात. त्यांची वेशभूषा करण्यासाठी खालील गोष्टींची आवश्यकता असेल. 

  • जीन्स आणि टी शर्ट
  • गॉगल 

(सादरकर्ता:- उत्कर्ष सांबरे) 

बॅट मॅन:- बॅट मॅन प्रत्येक लहान मुलाचा हिरो आहे. त्याची वेशभूषा करण्यासाठी खालील गोष्टींची आवश्यकता असेल. 

  • बॅट मास्क 
  • काळे कपडे 

(सादरकर्ता:- राघव खंडारे) 

उंदीर:- 

  • उंदराचे कपडे 

(सादरकर्ता:- आयुष कुलकर्णी)

0

🎭 Series Post

View all