भाग - १
"ऐ अशी चित्त्यासारखा ड्रेस घालून आली म्हणजे, तू काय स्वतःला चित्तीन समजते की काय...? कुठून आलीस येथे? आपण दादा, भाईलोग पाहिलेत...एवढे टाईट कपडे घातलेली चित्तीन पाहून तर आपल्याला, हसूच आवरेनां हाहाहा!" मोठमोठ्याने हसत पण मनातून घाबरलेला निरंजन म्हणाला. पुन्हा भानावर येत म्हणाला. "तू आहेस तरी कोण? मी काय वाईट केले बाई तुझे? सांग नां मला! तू तर कराटे मास्टर आहेस नां. तुम्ही कराटे कुठे शिकल्या? पण मग, खरेच मी काय वाईट केले तुझे...सोड नां मला. हवे तर पाया पडतो बाईऽ. माझी बिचारी गरीब बायको आणि म्हातारी आई वाट बघत असतील. ओ चित्तीन बाई प्लिज जाऊ द्या नां. मी कुठे चुकलो, कमीत कमी ते तर सांगा..!" निरंजन गयावया करु लागला.
एक सडपातळ पण आखीव रेखीव बांध्याची तरुणी. पायात गम बूट. संपूर्ण शरीर झाकेल असे, राखाडी रंगाच्या चित्ता प्रिंटमधला टाईट ड्रेस घातलेला. पाया पासून गळ्यापर्यंत बंद. चेहर्याला राखाडी रंगाचा मास्क, जणू फॅन्टमची ताईच अवतरली होती सारंगपूर मध्ये.
तिने एक नजर त्याच्याकडे बघितले. जवळच तिच्या सारखाच पोशाख घालून उभ्या असलेल्या हट्ट्याकट्ट्या मुलींना तिने इशारा केला. दोघींनी खाली हातपाय बांधून पडलेल्या निरंजनला बखोटी धरुन खुर्चीवर बसवून पुन्हा बांधले. समोर मोठ्ठी स्क्रीन होती. त्यावर वाॅट्सअप, फेसबुक, इंन्स्टाग्राम, फ्रेंड रिक्वेस्ट...आणि गुड माॅर्निग, गुड नाईट, जेवलीस का? कशी आहेस? काय करते? राग आला का?बोलत का नाहीस? बोल नां...! वेगवेगळ्या सिंम्बाॅल्स सहित, हे शब्द धुमाकूळ घालत होते. दिवा मालवून रुमचे दार बंद करुन त्या गेल्या.
निरंजनला कळेचना काय झाले ते...तो आठवायचा प्रयत्न करत होता. माडीवर बसलो होतो चॅटींग करतं. मग भूषणचा फोन आला. म्हणून बाहेर गेलो. तर...हो, तेव्हाच ह्या चित्तीन सारखा ड्रेस घातलेल्या बाईने मला कराटेचे हात हलवून धोपाटले...आई यय गंऽ काय सणकून हात पडत होते तिचे...पण, हिने मला का मारावे? "ओ बाईऽ आहे का कुणी इकडे, मी काय केले तुमचे वाकडे? का बांधून ठेवले मला?" तो मोठ्ठ्याने म्हणाला.
तेवढ्यात दूरुन त्याला आवाज आला.
"तुमचाही नंबर लागला वाटतं दाजीऽ"
"अरे भूषण तू आहेस होय...हरामखोरा मला फोन करुन अर्जंट बोलावलस, आणि इथं लपून बसलास? ये माझ्या समोर, हातपायच तोडतो तुझे...!" काहीसे चमकून आणि आवाज ओळखून मग रागाने निरंजन म्हणाला.

"अहो दाजी स्वतःचे हातपाय बांधले असताना माणसाने एवढ्या मोठ्ठ्या बाता...ठोकू नये म्हंटलं. मी काय स्वखुशीने थोडीनां तुम्हाला बोलावले. माझेही हाडंकाडं काल पासून मोडनं सुरु आहेत. मला जबरदस्तीने...नाही म्हणता येणार पण, स्वतःचे हाडंपेरं वाचवायसाठी तुम्हाला फोन करावा लागला..."
"पण तू असा समोर येन रेऽ लपून का बोलतो? सोड मला पटकन!"
"दाजी लपून बोलून काही फायदा आहे का? मी सुटलो तर तुम्हाला सोडेन नां? मी एका बराकीत बंद आहे. बस झोपण्यापूरतीच जागा आहे हो दाजीऽ ते अंडासेल म्हणतात नां...मी टिव्हीत पाहिल होतं होऽ बस तसंच आहे. तुमच्या बाजूलाच आहे. लेक कुठून दळभद्री सुचली काय माहित..." त्याचा रडायचा आवाज यायला लागला.

त्याचे ऐकून निरंजन गप्पगार झाला. म्हणजे हे तर गूढच आहे. चित्तीनबाईचे माझ्या सोबत काय वैर आहे? "थांब रे...रडू नकोस. मी काहीतरी करतो. पण हिने तुला, मला येथे का आणले?"
"दाजी एवढ्या दिवसां पासून आपण ऐकत आहोत. काही लोकं शहरातून नाहीशी होतात आणि काही दिवसाने परत येतात. मला ते कुठे जातात, गायब होतात ते आता समजले. म्हणजे ही बाई त्यांचा जीव घेत नाही. ती ह्या अंधार्या जागेत ठेवते त्यांना...मग बहूतेक पाठवते परत!"

आता मात्र निरंजन काय चुकले, त्याचा विचार करु लागला. स्क्रीन बघून, त्याचा आवाज ऐकून, त्याचे डोके भणभणू लागले. ह्या बाईला म्हणायचे तरी काय आहे? विचार करता करता कधी तरी त्याचा डोळा लागला.
मानेत कळ आल्यामुळे त्याला जाग आली. खोली अंधाराने भरलेली. स्क्रीन बंद होती. त्याने डोळे फाडून अंधारात बघायचा प्रयत्न केला. अचानक स्क्रीन सुरु झाली. तेच सिम्बाॅल, तेच वाक्य त्यावर पिंगा घालत होते. "दाजीऽ" ...च्या आवाजाच्या दिशेने निरंजनने बघितले. भूषणला निरंजन सारखेच खुर्चीवर बांधले होते. दोन दिवसातच त्याच्या डोळ्याभोवती काळी वर्तुळे आली होती. चेहरा सुकला होता. रडून डोळे खोल गेले होते. "अरे...दोन दिवसातच असा कसा झाला बेऽ" निरंजन ओरडून म्हणाला. "हो...म्हणे असा कसा झाला? मेकअप करुन येऊ का तुमच्या समोर? ह्या बाईंनी केला तेवढा पुरेसा नाही का माझा मेकअप..? थांबा तुम्ही, दोन दिवसाने तुम्हीही असेच दिसणार आहात..." काहीसा चिडून भूषण म्हणाला.
चला, कमीत कमी सोबती तर आहे. त्याही परिस्थितीत निरंजनला हायसे वाटले. "तू अंडासेलमधून इथे कसा आला?''
"अहो दाजी, कुणी तरी आत आल्या होत्या. स्प्रे मारला माझ्या तोंडावर. बेशुद्ध झालो. जाग आली तेव्हा, इथे होतो. कालपासून, अंडासेल आणि इथे, तळ्यात मळ्यात करत आहेत मला...एकदाचं माझ्या अंगणात टाकून द्या म्हणावं...असं केल्या पेक्षा..." तो पुन्हा रडू लागला.

रडून थकल्यावर भूषण शांत झाला. दोघेही आपल्याला इथे कशाला आणले त्याचा विचार करत होती. निरंजनला निरुपा आठवू लागली. 'आपण किती तुसड्या प्रमाणे तिला वागवतो. तरी सुद्धा राग न मानता आपली सरबराई करते. सतत दिमतीत हजर असते. किती कष्ट घेते माझी निरुऽऽ आपण तर तिच्या चेहर्याकडेही बघत नाही...' त्याला आता भरुन आले. 'देवा मला ह्या चित्तीन पासून वाचवं. मला माझी प्रेमळ बायको पाहिजे...मला तिच्याशी बोलायचे आहे. देवाऽऽ ऐकना....!' तो देवाचा धावा करु लागला.
क्रमशः
सतत मोबाईलवर व्यस्त राहणार्या निरंजनला, बायको सोबत कुठलीही चर्चा करणे जीवावर यायचे. बोर व्हायचे. मग आता, त्या दोघांच्या प्रश्नांची उत्तरे, त्यांना मिळतील...? त्याआधी कथेतील पात्रांची ओळख सुद्धा आपल्याला करुन घ्यावी लागेल. आणि पात्रांना
जाणून घेण्यासाठी, पुढील भाग वाचावा लागेल...!'
०००
जाणून घेण्यासाठी, पुढील भाग वाचावा लागेल...!'
०००
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा