भाग - २
"निरुपा ए निरुपा, काय करतेस गं भैताड बाईऽ तोंडात जीव आहे की नाही तुझ्याऽ कधीचा आवाज देतोय, लक्ष आहे कुठे तुझे...?"
"काय रे पोरा निरंजन, असा काय बोलतोस तिला? कधीतरी प्रेमाने बोल की तिच्याशी. बिचारी गरीब गाय...हरवलेल्या कालवडी सारखी हाहाहा"
"काय रे पोरा निरंजन, असा काय बोलतोस तिला? कधीतरी प्रेमाने बोल की तिच्याशी. बिचारी गरीब गाय...हरवलेल्या कालवडी सारखी हाहाहा"
"हाहाहा ती काय जनावर आहे का? गाय काय नी कालवड काय? काय आई तू पण? अगं ती तर बिचारी, हरणाचं पाडस आहे गं..." मोठ्ठ्याने हसून, निरुपाला धक्का मारुन बाजूला करत निरंजन म्हणाला. आणि तरातरा बाहेर अंगणात गेला. जाता जाता एक शिवी हासडून गेला. "तू सुधारायची नाही...आवाज दिला की 'ओ' देतच नाही ही बाईऽ काय माझं नशीब आहे. बाबांना माझ्यासाठी हीच भेटली होती का...झांबलट..? आण चहा, बाजूला हो माझ्या नजरे समोरुन..!" तिच्या हातातला चहाचा कप त्याने पटकन घेतला. उभ्या उभ्या चहा पिऊन घेतला. आणि, "आईऽ येतो गं..." म्हणतं बाहेर गेला.
जाणार्या निरंजनला निरुपा केविलवाण्या नजरेने बघत होती.
'किती प्रेमळ होता हां...का असा वागतो आता?' ती विचार करत होती. तेवढ्यात, "निरुपाऽ बाईऽ निरंजनच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नको. खुप साधासुधा मुलगा आहे गं तो. काय झाले माहित नाही. एवढ्यात जरा जास्तच चिडचिडा झाला. तुला जरा जास्तच बोलतो. मला काही त्याचे बोलणे आवडत नाही. पण आता तो लहान नाहीये. मी त्याला बोलली आणि निघून गेला तर...काही बरंवाईट केलं तर...मला बाई भितीच वाटते. म्हणून त्याच्या हो ला हो करते...तुझ्यावर हसते. निरुपा बाळ मला समजून घे होऽ" डोळ्यांना पदर लावतं निरंजनची आई सुलक्षणा म्हणाली.

निरुपाने मान डोलावली आणि घरातील कामात मग्नं झाली. 'बाई ह्या पोरीचं काय होईल काय माहित. जराही तरतरी नाही हिच्यात. नवर्याला रिझवणे हिला जमतच नाही. हा प्रेमातच कसा पडला हिच्या, कोण जाणे...?' आई मनातल्या मनात पुटपुटत म्हणाली.
काही दिवसांपुर्वीच निरंजनचा लहान भाऊ, आईने रागावले म्हणून घर सोडून गेला. तेव्हापासून निरुपाची सासू निरंजनला रागवतं नव्हती. पण तसेही, तिच्या ओठांवर एक आणि पोटात काही दुसरंच असायचं निरुपा साठी.
निर्विकार भावाने, निरुपा घरातील सगळी कामे आटपत होती. जणू काही झालेच नाही...
"निरुपा ए निरुपाऽ चल आवरले का? आजही उशीर व्हायचा नाहीतर." पर्स आणि टिफीन सांभाळत निरुपाची मैत्रिण बिंदूने तिला आवाज दिला. निरुपाने आवाजाच्या दिशेने थंडपणे नजर उचलत बघितले. "हो टिफीन घेते. थांब पाच मिनिट, आलेच."
"पाणी हवं का?"
"नको, चल लवकर...काय बाई तूऽ रोजचंच झालय तुझं. मी उशीरा आले तरी, हेच वाक्य असतं तुझं. कधी मुहूर्त लागेल कामं पटापट उरकण्याचा?" बिंदू तिच्यावर रागावत म्हणाली.
"पाणी हवं का?"
"नको, चल लवकर...काय बाई तूऽ रोजचंच झालय तुझं. मी उशीरा आले तरी, हेच वाक्य असतं तुझं. कधी मुहूर्त लागेल कामं पटापट उरकण्याचा?" बिंदू तिच्यावर रागावत म्हणाली.
निरुपा काहीच न बोलता टिफीन पॅक करुन, खांद्यावर पर्स अडकवून निघाली बिंदू सोबत. घराकडे लक्ष द्या...म्हणून जाता जाता सासूआईला सांगून गेली.
रस्त्याने जाताना, बिंदू तिच्याकडे बघत म्हणाली. "मला तुझा नवरा दिसला बाहेर रस्त्यावर. शेजारच्या विलास सोबत बोलत उभा होता."
मग त्यात काय...? अश्या अविर्भावाने निरुपाने तिच्याकडे बघितले.
"कमाल आहे बाई थंडपणाची...कशी गं तू निरुऽ काहीच कसा परिणाम होत नाही तुझ्यावर...? अगं तो त्या विलास सोबत बोलत होता...म्हणून सांगितले,
तरी तू काहीच विचारत नाहीयेस...!"
"काय होतं विलासला भेटला तर माझा नवरा...? मित्र आहेत नां ते?"
तिने निश्चल भावनेने म्हंटले. "खरेच कमाल, अगं बाई मी तुला माझा डाऊट सांगितला होता नां...? तरीही!"

"हे बघ, हा एकमेव आहे. जो माझ्या जीवाभावाचा आहे. जेव्हा माझ्या जवळ कुणीच नव्हतं तेव्हा हाच व्यक्ती आहे. ज्याने मला रिस्पेक्ट दिला. माझ्यावर प्रेम केले. माझ्या सोबत लग्नं केले...हां, एवढ्यात तो बदलल्या सारखा वाटतोय...पण त्यात माझीच चुकी आहे. तू म्हणतेस तसे काही त्याचे, विलासच्या बहिणी सोबत संबंध नाहीयेत...मला कळलं असतं. दुसरं काही कारण असेल...!
आणि हो, आता हा विषय संपव. माझ्या नवर्या विषयी मला काहीच ऐकायचे नाही..."
आणि हो, आता हा विषय संपव. माझ्या नवर्या विषयी मला काहीच ऐकायचे नाही..."
बिंदूने चमकून तिच्याकडे बघितले. क्षणभर आपण दुसर्याच कुणाशी बोलतोय, असे तिला वाटले. 'गोगलगाय पोटात पाय...चेहर्यावरुन माशी हलत नाही. आणि किती कणखरपणे नवर्याची बाजू घेते. म्हणूनच नां हिचा कुणीही फायदा घेतो. एवढा मोठ्ठा वाडा, ह्या बेघर निरंजन आणि त्याच्या बाबा, आईने आयता मिळवला. खोटं खोटं प्रेम दाखवून तिला जवळ केले. असू दे, मला काय? तिच्याच वाड्यातून हाकलून देतील, तेव्हा कळेल हिला...!'
मनोमन चरफडत बिंदू, तिच्यासोबत कारखान्या जवळ येऊन थांबली.
मनोमन चरफडत बिंदू, तिच्यासोबत कारखान्या जवळ येऊन थांबली.
आयुर्वेदिक सौंदर्यप्रसाधने बनवणारा तो कारखाना होता. गेली दहा वर्षे निरुपा तेथे काम करत होती. काम एके काम करण्याचा तिचा गुण, कारखाना मालकांना आवडायचा. म्हणून तिला, मॅनेजर पदी बढती मिळाली होती. आणि ती पण मनापासून कारखान्याच्या प्रगती कडे लक्ष द्यायची. जेमतेम शिकलेली निरुपा...इतिहासकालीन पार्श्वभूमी असलेल्या परिवारातील होती. तिचे वंशज औरंगजेबाच्या सैन्यात राबलेले होते. म्हणूनच त्यांचा हा वाडा मोगलकालीन होता.
कशीबशी डागडूजी करुन त्याला उभे ठेवले होते निरुपाने.
कशीबशी डागडूजी करुन त्याला उभे ठेवले होते निरुपाने.
क्रमशः
निरुपाच्या जीवनात पुढे काय झाले...? हे जाणून घ्यायचे नां?
वाचा मग पुढचा भाग..!
०००
वाचा मग पुढचा भाग..!
०००
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा