भाग - ४
पाच वाजता सगळ्या आपआपल्या घरी परतल्या. बिंदू, निरुपाला घरी सोडून पुढे गेली. निरंजन बाहेर बंगईवर बसून मोबाईल मध्ये डोके खूपसून होता. त्याच्या चेहर्यावर मंद मंद हसू होते. निरुपा नेहमीच्या चालीने संथ पाऊल उचलत त्याच्या बाजूला येऊन उभी राहिली. तिने मोबाईल मध्ये बघितले. निरंजन कुणाशी तरी मेसेजेसची देवाण घेवाण करत होता. मध्येच हसत होता.
तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. दचकून त्याने वर बघितले. "मंद बाई, कळतं नाही का तुला? असे कुणाच्याही मोबाईल मध्ये बघायचे नसते. बॅड मॅनर्स! तुला काय शिकवायचे म्हणा...मला वाटले होते. तुझ्यात मी बदल करेन. पण काही नाही, तू कधी सुधारणार नाहीस. जेवूण घ्या तुम्ही आणि झोपा. माझं मी वाढून घेईन..!" तिचा हात झिडकारत तो माडीवर गेला.
ती शांतपणे त्याच्या पाठमोर्या आकृती कडे बघत राहिली.
'काय झाले तुला निरंजन. मी जशी आहे तशीच तुला पसंत होती नां, मग आता कसा बदललास..?' ती विचार मग्नं बंगईवर बसली. पुन्हा मानेला झटकून उठली आणि आत गेली. 'चला जेवण बनवा, खां आणि झोपा, उद्या पुन्हा बोलणी ऐकत कामावर जा...माझं नशीब पालटणार नाही बहुतेक. वाटत होतं हातावरची रेषा बदलता आली तर...वडील, भाऊची कमतरता निरंजन पुर्ण करेल. पण कशाच काय, आई होण्याचे भाग्यही माझ्या नशीबात नाही बहुतेक...चला, वर्कटाईम सुरु करु आता. लाग कामाला निरु, तुझी कदर कुणालाच नाही येथे..!'
'काय झाले तुला निरंजन. मी जशी आहे तशीच तुला पसंत होती नां, मग आता कसा बदललास..?' ती विचार मग्नं बंगईवर बसली. पुन्हा मानेला झटकून उठली आणि आत गेली. 'चला जेवण बनवा, खां आणि झोपा, उद्या पुन्हा बोलणी ऐकत कामावर जा...माझं नशीब पालटणार नाही बहुतेक. वाटत होतं हातावरची रेषा बदलता आली तर...वडील, भाऊची कमतरता निरंजन पुर्ण करेल. पण कशाच काय, आई होण्याचे भाग्यही माझ्या नशीबात नाही बहुतेक...चला, वर्कटाईम सुरु करु आता. लाग कामाला निरु, तुझी कदर कुणालाच नाही येथे..!'
तिने स्वयंपाक आटोपला. सासू आणि तिने जेवायला घेतले. "का गं निरु एकच चपाती घेतलीस वाढूनं? हल्ली तू फार कमी जेवतेस रात्रीला. अश्याने कसे जमणार? बघ किती बारीक झालीस पोरी. कामंही खूप करतेस म्हणा. निरंजनच्या बोलण्याचे वाईट वाटून नको घेऊस. खुप प्रेम आहे गं त्याचे तुझ्यावर. मी आहे नां तुझ्या सोबत. मग बिनधास्त रहात जा..!" सासूबाई तिला धीर देत म्हणाल्या. तिने मान डोलावली आणि पुन्हा खाली मान घालून जेवत बसली.
सासूने पुन्हा तिच्या चेहर्याकडे बघितले. 'हिला काहीच फरक पडत नाही देवा...कसा जीव जन्माला घातलास रे बाबाऽ' ती वर बघत मनातल्या मनात बोलली.
सासूने पुन्हा तिच्या चेहर्याकडे बघितले. 'हिला काहीच फरक पडत नाही देवा...कसा जीव जन्माला घातलास रे बाबाऽ' ती वर बघत मनातल्या मनात बोलली.
सगळं आटोपल्यावर निरुपा झोपायला गेली. सासूबाईने तिला निश्चिंत झोपायला सांगितले. निरंजन येईल आरामात. काळजी करु नकोस म्हणाली. आपणही खोलीत जाऊन झोपली.
निरुपा, आई वडीलांची एकुलती एक लेक. वडीलांचा स्वभाव म्हणजे, दे हरी पलंगावरी. त्याआधीच निरुच्या आजोबांनी नाचगाणार्या बाईंंवर शेती, पैसा उधळलेला. तिचे वडीलही दारुच्या आहारी गेलेले. दिसेल त्याबाईशी लगट करण्याची त्यांची वृत्ती. तिच्या आईला मग राग यायचा. ती थोडे जरी बोलली तर, तिचे बाबा तिला बेदम मारायचे. अशाच मारहाणीत ती एकदा डोक्याला मार लागून दगावली...!
आधी आई नंतर एका महिन्यातच बाबा गेल्यावर...निरुचे म्हणून, माळरानावर मोडक्या स्थितीतील दगडी बांधकामाचा भला मोठ्ठा वाडा काय तो बाकी होता. वाड्यापासून अर्धा मैल दूर थोडे उंचावर पुरातन मंदिर होते. पुर्वी ते निरुपाच्या परिवाराच्या अखत्यारित होते. काळानुसार बदल झाला. आणि आता त्याची देखभाल दोन पिढ्यांपासून गावातील पुजारी करत होते.
निरुपा एकमेव वारस होती त्यांच्या घरातील. भलामोठ्ठा वाडा पाहूनच निरंजनच्या बाबाने तिला आपल्या मुलासाठी पसंत केले होते. म्हणजे त्यांनी निरुला तिच्या वडीलांचा चांगला मित्र असल्याचे भासवून...निरंजनला तिच्यावर प्रेमाचे जाळे फेकायला सांगितले होते. कफल्लक परिवारातील निरंजनलाही बाबांचे विचार पटलेत. पुढे मागे वाडा विकून करोडो कमावता येतील...हे त्यांच्या लक्षात आले होते. त्याचा भाऊ व आईला, बाबा आणि निरंजनने, त्यांच्या 'डावा' बद्दल कल्पना दिली नव्हती. पण आई चतूर होती. तिने ओळखून घेतला होता, नवर्याचा कावा. आपल्याला आयतं घर मिळतंय, आपल्या लेकाचं जीवन सुधारेल...ह्या भावनेने, निरुपा सून म्हणून पसंत नसताना, राग येऊनही ती, निरुपा सोबत वरवर चांगले वागायचा प्रयत्न करायची. बाबा अचानक गेल्यामुळे, निरुने दुःखी सासूबाईंना मानसिक आधार दिला. म्हणूनच काही महिन्याने तिचा स्वभाव बघून, खरेच तिला निरुपाची दया यायला लागली होती.
तिच्या लहान मुलाला मोबाईलचे व्यसनच जडले होते. उठला सुटला की, त्यावरील गेम्स खेळण्यात मश्गुल असायचा. चॅटींग करत असायचा. एकदा एका मुलीच्या आईने वाड्यावर येऊन भांडण केले. निरुपा स्थितप्रज्ञपणे बघतच राहिली. पण सासूबाई मुलाच्या वतीने त्या बाईशी भांडली. ती बाई गेल्यावर तिने, मुलालाही धारेवर धरले. प्रचंड रागावली. पण, दुसर्या दिवशी तिचा मुलगा तिला घरात दिसला नाही. तेव्हा मात्र ती हबकली. निरंजनचे वाढलेले मोबाईल प्रेम तिलाही खटकत होते. पण तिने आता चुप रहाणेच पसंत केले होते....
खट खट खट...दाराची कडी तीन चार वेळा सासूबाईंनी वाजवली. पण निरुने दार उघडले नाही. काय गाढ झोपली आहे ही पोरगी...'निश्चिंत झोप...' म्हणने एवढे मनावर घेतले ह्या पोरीने! देवा माझ्या पोराचा संसार कसा व्हायचा रेऽ मी आहे तोपर्यंत वारस येऊ दे रे बाबाऽ नवरा घरी आला नाही अजून, ह्या पोरीला काही फिकीरच नाही. आईने रात्री निरंजनला बाहेर जाताना बघितले होते. वाड्याची आतली कडी तिनेच लावून घेतली होती. पुन्हा आईने कडी वाजवत, हाताने दार ठोठावले.....
क्रमशः
निरुपाला एवढा का वेळ लागतोय दार उघडायला? जाणून घ्यायचे नां? मग वाचा पुढील अंतिम भाग!
०००
०००
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा