आम्हाला स्त्रियांना कसं ना कि प्रत्येक गोष्टीत मॅनेजमेंट आणि प्लेसमेंट रक्तातूनच मिळालेली असते ..
अशाच एका दिवाळीला ,बॉस म्हणजे वरिष्ठांच्या घरी फराळ घेऊन जायचे होते ...
जवळपास आणि शेजारी वगेरे ना ताटातच फराळ छान क्रोशरीच्या रुमालाने कव्हर वगेरे करून दिला जातो ...
जमल्यास आणि फराळ सगळा पूर्ण रेडी असेल तर लगेच एक्सचेंज पण केला जातो ..
अधिकारी एक्सिक्यिटीव्ह लोकांच्या घरी पार्सल नेताना डबा वगेरे भरून न्यावा लागतो ..
पार्सल म्हणून नेलेला डबा लगेच लगे हात परत रिकामा करून आणलेला बरा असतो..
बॉसच्या बायकोला एक मोठे ताट द्या म्हणजे फराळ त्यात काढून देता येईल असे सांगितले ..
डायनिंग टेबलवर ताटात पार्सल नेलेल्या डब्यातले सर्व फराळाचे पदार्थ छान एकामागूनएक बाहेर काढून नीट व्यवस्थित ताटात ठेवायला सुरवात केली ..
म्हणजे कसं कि चार पाच करंज्या एका बाजूला चार पाच लाडू त्याच्या जवळ असं..
अजून चकली ,शंकरपाळ्या,चिवडा ,अनारसे शेव,असं सगळं एकामागून एक डब्यातून बाहेर येऊन ताटात नीट प्लेस होणार होते ..
आणि तेव्हड्यात लाईट गेली ..
घरात अन टेबल वर पूर्ण अंधार भुडुक झाला ..हात फराळाच्या डब्यात होता पण ताट मात्र काहीच दिसत नव्हते..
मॅडम बिचाऱ्या लगेच टॉर्च नाहीतर कॅडल ची शोधाशोध करू लागल्या..
अचानक झालेल्या अंधारात त्यांनाही काही दिसत नव्हतं..
फराळाच्या डब्यात किती वेळ हात घालून ठेवणार ना ..
मॅडमना अंधारात काही सापडणार नाही लवकर याचा अंदाज घेऊन ..
तो फराळाचा डबा त्या ताटात पूर्ण उलटा करून रिकामा करून टाकला..
आणि अंधारातच मॅडमना बाय करून तिथून कसंबसं चाचपडत बाहेर आले...
आणि तेव्हड्यात लाईट आली ...
घरी आल्यावर सारखा विचार येत होता,..
फराळ नक्की ताटातच ठेवला गेला असेल ना ..
आणि सगळा एकत्र फराळ अस्ताव्यस्त विस्कटकेला कसा दिसत असेल ...नंतर...लाईट आल्यावर ...!?
@ Sush**
फराळ नक्की ताटातच ठेवला गेला असेल ना ..
आणि सगळा एकत्र फराळ अस्ताव्यस्त विस्कटकेला कसा दिसत असेल ...नंतर...लाईट आल्यावर ...!?
@ Sush**
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा