शीर्षक:-कृषीदेवाचा सण (सप्ताक्षरी काव्य)
ठेवून नभाखाली
आपले सारे धान्य
करे सृष्टीचा कौल
मोठ्या मनाने मान्य
आपले सारे धान्य
करे सृष्टीचा कौल
मोठ्या मनाने मान्य
कष्टमय जीवन
त्यास नाही उसंत
कवडीमोल भाव
हीच वाटते खंत
त्यास नाही उसंत
कवडीमोल भाव
हीच वाटते खंत
म्हणती बळीराजा
त्याचा न्याराच थाट
देतो सदा अन्नाचे
राबून पूर्ण ताट
त्याचा न्याराच थाट
देतो सदा अन्नाचे
राबून पूर्ण ताट
नित्यपणे जोडली
काळ्या मातीशी नाळ
शेतकरी, पोशिंदा
भूमीचा असे बाळ
काळ्या मातीशी नाळ
शेतकरी, पोशिंदा
भूमीचा असे बाळ
कर्म घाम गाळणे
स्वभाव त्याचा भोळा
पाहून आत्महत्या
येई पोटात गोळा
स्वभाव त्याचा भोळा
पाहून आत्महत्या
येई पोटात गोळा
खातो पोटभरून
पुण्यवान आपण
नित्य करू साजरा
कृषीदेवाचा सण
पुण्यवान आपण
नित्य करू साजरा
कृषीदेवाचा सण
© विद्या कुंभार
सदर कवितेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
छायाचित्र सौजन्य: साभार गुगल
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा