Login

आठवणीचे अस्तित्व

बाबांच्या आठवणी
मनाच्या पिंजऱ्यात
जपलेले ते क्षण
तुझ्याविण कोणी
जपणार नाही माझे मन

तुच माझा गुरू
तुच माझा सखा
तुनेच घातला मला
मार्गदर्शनाचा विळखा

कष्ट सारे करून सहन
नेहमी हसू चेहऱ्यावर
ढाल बनून कुटुंबाची
स्वप्न तुझी लपवलीस त्यामधी

मुलांची स्वप्न करण्या साकार
झिजवले तुझे मनाचे विचार
फरक आहे जनरेशनचा
म्हणून हसत मोडले
तुझे तत्व ही वारंवार

मुलांसाठी तू
सर्व काही केले
तुझ्या असण्याने
आम्हा बळ मिळाले

आता मात्र तू एक
आठवण म्हणून राहिलास
तरी त्या आठवणीने
जगण्याचे सामर्थ मिळाले

बापाच कर्तव्य करण्यातच
तुझं अख्ख्य आयुष्य गेले अन
तुझ स्वत:च आयुष्य
जगण्याचं मात्र राहूनच गेले

आठवणींच्या तलावात
आहे तुझेच प्रेमत्व
कधी न विसर पडो मला
तुझ्या संस्काराचे गुपित
अन कायम राहू दे
माझ्या जीवनात
तुझ्या आठवणींचे अस्तित्व.........