रचना -" पण होणार काय याचा?"
रवी -" माहिती नाही... पण ते डायलॉग आहे ना की... किसी चीज को तुम दिलं से चाहो तो पुरी कायनात उस्से तुम्हे मिलानेकी कोशिश मै लग जाती है.... जर तो खरा प्रेम करत असेल तर तो त्याला नक्की मिळेल..."
दोघंही अर्णव कडे बघू लागले...
____________________________________________
पक्ष्यांच्या त्या किलबिलाटाने अर्णवला जाग आली. तो उठल्यावर त्याच डोकं जड वाटत होत . का वाटू नये?..
काल होताच तेवढ्या नशेत .... त्याला काल जे काही झालं ते काहीच आठवत नव्हतं. तो बेडवरून उठून हॉल मध्ये गेला. तिथं रवी आणि रचना ऑफिसला जायला तयार होत होते. रवी डोक्याला हात लावत म्हणाला.
अर्णव -" गूड मॉर्निंग गाईस..."
रवी आणि रचना त्याच्याकडे असे बघत होते जस तो खूप मोठा गुन्हा केला आहे.
रचना -" काल कुठ होतास ?"
अर्णव - " बहुतेक बीच वर होतो..."
रचना - " काय करत होतास ?"
अर्णव मान खाली घालून म्हणाला .
अर्णव - " ड्रिंक करत होतो...????"
तेवढ्यात रवीचा फोन रिंग झाला. रवी कॉल वर बोलत बाहेर गेला.
रचना -" चल तयार हो... ऑफिसला जावं लागेल... खूप लोड आहे कामाचा..."
अर्णव डोकं हलवून बाथरूम कडे गेला. रवी कॉल वर बोलून परत आत आला.
रवी -" आपल्याला जावं लागेल . आज नवीन एच .आर . येणार आहे . "
रचना - " हम्म... अर्णव आल्यावर जाऊयात . "
अर्णव लवकरच तयार होऊन परत आला. रचना , रवी आणि अर्णव सगळे कारमधून ऑफिसला निघाले.
रवी -" अर्णव ... आपल्याला आता नवीन पोजेक्ट मिळणार आहे.."
अर्णव खिडकी बाहेर बघतच म्हणाला.
अर्णव -" हमम.."
ऑफिस येऊ पर्यंत तो कुणाला काहीच बोलला नाही. ऑफिस मध्ये गेल्यावर जसिका म्हणाली.
जसिका -" हे... आता अर्ध्या तासात तुमची मीटिंग फिक्स झाली आहे."
रवी -" आता लगेच... पण आम्हाला खबर नव्हती. "
जसिका -" हो... नवीन एच. आर घेणार आहे... सो रेडी फॉर मीटिंग..."
छान अस स्माईल देत जासिका म्हणाली.
सगळे आपापल्या टबेला पाशी गेले. पण अर्णव चा मात्र कशातच लक्ष नव्हता. कसा असेल त्याच प्रेम त्याच्यापासून दूर जात होती.
तेवढ्यात मेन दरवाजा ओपन होण्याचा आवाज आला. तिथून पहिला एक माणूस एकीचा बॅग आणि एक सुटकेस घेऊन येत होता आणि मागून या ऑफिस ची न्यू एच. आर ची एन्ट्री झाली. तिचे ते मोकळे सोडलेले केस , तिचे ते घारे डोळे कोणीही बघितल की घायाळ होईल , तिचे ते हाय हिल्स तिचे छोटी असलेली हाईट थोडी का होईना मोठी करत होती, तिच्या मागे मागे दोन अजुन माणसे मोबाईल वर बोलत केबिन मध्ये गेले. ते लोक आत जाताच , जसिकाला फोन आला. ती काहीतरी बोलून फोन ठेवली आणि म्हणाली.
जसिका -" हे गाईझ... तुम्हा सगळ्यांना आत मीटिंग ला बोलावलं आहे. "
रवी -" सगळ्यांना ??"
रचना -" सगळे म्हणल्यावर सगळेच ना???..????????????"
अर्णव मात्र खूप उदास उदास होता. त्याला मीटिंग बदल काडीचाही इंटरेस्ट नव्हता. सगळे बॉस च्या केबिन मध्ये गेले. आतला वातावरण खूपच सीरियस होता. मेन सीट वर एच . आर बसलेली होती. ती मोबाईल मध्ये काहीतरी करत होती , तीच लक्ष या सगळ्यांवर येताच त्यांना बसण्यासाठी खूनवली. सगळे आपल्या आपल्या खुर्चीवर बसले. मोबाईल मधून डोकं बाहेर काढून ती उठली आणि सगळ्यांना उदेशून म्हणू लागली.
प्रीती -" हॅलो गायीज... मी तुमची नवीन एच . आर प्रीती शर्मा .... दुर्देवाने तुमच्या ऑफिसमधील काम बघता बाकी ब्रंच चे प्रॉफिट चे मार्जिन मोठा आहे.... तुम्हाला सांगण्यात मला खेद होत आहे की तुम्हा सगळ्यांचा या महिन्याचा पगार कट करणार आहे. "
सगळे एकमेकांकडे बघत होते. म्हणजे एक महिना पूर्ण विनापैसा काढणे म्हणजे अशक्य अस काम.
प्रीती -" तरी या पुढे जर हीच प्रगती असेल तर नाईलाजाने मला तुम्हाला काढावं लागेल..."
एवढं ऐकुन अर्णव आता बोलू लागला.
अर्णव -" वन मिनिट मॅडम.... सर्वात प्रथम या ऑफिस मध्ये स्टाफ खूपच कमी आहे.... आणि त्यामानाने प्रॉफिट चांगलाच आहे.... आणि राहील १ महिनाच्या पगाराचा तुम्ही बिंदास कापा पण तेंव्हाच जर तुम्ही दिवसाचे ९ तास जर एका कॉम्प्युटर समोर काढत असाल तर... आम्ही मानतो की आम्ही काही दिवसाची सुट्टी घेतली होती पण त्यासाठी तुम्ही १ महिनाच पगार काढू शकत नाही.... जर तुम्हाला माझं म्हणणं आवडलं नसेल तर बिंदास मला काढून टाका..."
एवढं बोलून तो तिथून उठून बाहेर गेला. प्रीती सकट सगळे त्याच्याकडे बघत होते. रवी आणि रचना लगेच केबिन मधून उठून अर्णवच्या मागे गेले.
अर्णव त्याच्या टेबलावर असलेलं सामान भरू लागला.
रचना -" अरे अर्णव काय बोलून आलास ??...????????"
अर्णव -" मग आम्ही या कंपनी साठी ९ तास देत असतो पण ती मात्र आपल एक मात्र ऐकुन घेत नाहीत. "
तेवढ्यात जसिकाच्या टेबलावर असलेलं फोन वाजतो.
जसिका -" हॅलो.... येस मॅम... ओके मॅडम..."
जसिका फोन कट करून अर्णव च्या टेबलाजवळ येऊन म्हणाली.
जसिका -" तुम्हाला मॅडमनी केबिन मध्ये बोलावली आहे."
रचना -" रिझाईन करायला बोलवत असेल..."
हे तिघे परत केबिन मध्ये आले. प्रीती त्यांना बसण्यासाठी इशारा केली.
प्रीती -" मिस्टर अर्णव .... ठीक आहे... तुम्ही खूप मेहनती आहात अस मैनेजेर सांगत होते. मी तुम्हाला एक चान्स देते. पण मला या पुढील ३ महिन्यात प्रोफिटचा चांगला मार्जीन पाहिजेल. "
रचना आणि रवीला आनंद झाले मात्र अर्णव च्या चेहऱ्यावरील एक रेष सुध्दा हलली नाही.
रचना -" थँक यू मॅम...????????"
प्रीती -" ओके.... गो बॅक टू युवर वर्क..."
सगळे आनंदात केबिन बाहेर आले .
रचना -" चला ... आता कामाला लागलं पाहिजेल... आपल्याकडं मात्र फक्त ३ महिने आहेत.."
रवी -" चिल यार... होईल चांगलं..."
सगळे आता जोरात काम करू लागले.अर्णव सुद्धा आता कामाला लागला होता. तो ब्रेक मध्ये सुद्धा कामच करत होता. कदाचित पूजाला विसरण्यासाठी तो कामात मग्न होत असेल.
संध्याकाळचे ६ वाजत आले होते. सगळे आपापले काम बंद करून घरी जात होते. रवी आणि रचना सुद्धा काम आटपून घरी जाण्याची तयारीत होते. रवी मोबाईल मध्ये काही मेसेजेस पाठवून रचना कडे वळला.
रवी -" चला ... जायचं???..."
रचना -" हो खूप वेळ झाला आहे..."
अर्णव अजुन कॉम्प्युटरमध्ये काहीतरी काम करत होता.
रचना -" अर्णव ... चल घरी जाऊ..."
अर्णव -" मला अजुन काम आहे... तुम्ही जावा मी आलोच काम पूर्ण करून..."
रचना -" अरे उद्या कर म्हण... चल आता जावूया... आणि पूजाच्या बाबांना सुद्धा बघायचं आहे.."
पूजा हे नाव ऐकताच तो अजुन मोठ्यांनी म्हणाला
अर्णव -" तुला कळत नाही का??... काम करून मी येईन... तुम्ही जावा..."
रचना -" ओके... अस युवर विश... ????????... पण बार मध्ये जाऊ नको म्हणजे झालं..."
रचना रागारागात बाहेर जाऊ लागली तिच्या मागे रवी सुद्धा जाऊ लागला. अर्णव मात्र कामात बिझी होता.
२ तास काम करून सुध्दा अर्णव मात्र कॉम्प्युटर मध्ये अजुन रस होता. काहींना काही करतच बसला होता. तेवढ्यात केबिन मधून प्रीती एकटी बाहेर आली. प्रीती अर्णवला अजुन काम करत असल्याचा पाहून ती त्याच्या जवळ जाऊन म्हणाली.
प्रीती -" सो मिस्टर अर्णव काम झालं नाही वाटत अजुन .."
अर्णव आवाज ऐकुन थोडा दचकला .
अर्णव -" नो मॅडम इट्स ओवर....."
प्रीती -" मग माझं वाट पाहत होतास काय??"
अर्णव -" नाही तस नाही... मी आता जाणारच होतो..."
प्रीती -" अरे... मस्करी करत आहे.. चल आपण सोबत जावूया..."
अर्णव -" मॅडम तुमचे पर्सनल सेक्रेटरी दिसत नाहीत.."
अर्णव त्याच काम आटपत म्हणू लागला.
प्रीती -" मी त्यांना वेळेवर पाठवते. मला सवयच आहे उशिरापर्यंत काम करायला... तुला पण सवय असेल ??"
अर्णव -" नाही.... तुम्ही घातलेल्या कंडीशन नुसार मला असच काम करू लागणार आहे.."
प्रीती हसू लागली.
प्रीती -" ????????... दॅट्स गूड... तुला कार चालवता येत?"
अर्णव -" हो... "
प्रीती -" चल मग माझ्या कार मध्ये... तू ड्राईव्ह कर.. आज मी खूप थकली आहे."
प्रीती आणि अर्णव दोघेही पार्किंग मध्ये आले. अर्णव गाडी पार्किंग मधून बहर काढला. प्रीती तिच्या बाजूला बसली.
अर्णव आता गाडी स्टार्ट करून चालवू लागला.
अर्णव -" मॅडम .... अॅड्रेस??"
प्रीती -" ते तर तुला सांगतेच पण पहिला एका ठिकाणी जायचं आहे ... तिथे चल..."
अर्णव -" कुठे ??"
प्रीती -" चल तर तुला सांगते.."
प्रीती तिला दिशा दाखवत होती . तो त्या दिशेनी जात होता.
प्रीती -" बस आता लेफ्ट ला घे..."
लेफ्ट ला वळताच... अर्णव गाडीला थांबवला. तो ते ठिकाण बघून कार मधून उतरला... तो तेच ठिकाण होता जिथे तो पूजाला प्रपोज मारणार होता....
प्रीती -" चल... "
अर्णव -" इथे???"
प्रीती -" चल तर चल..."
एवढं बोलत प्रीती अर्णवचा हाथ धरून ओढतच घेऊन जाऊ लागली.
*******************************
क्रमशः
ऋषिकेश मठपती
पुढील भाग लवकरच... आवडल्यास नक्की कमेंट करा... शेअर करा... धन्यवाद...????????????????
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा