अचानक ती रडत रडत ऑफिस च्या बाहेर पळतच गेली ????????????????... तिला रवी आणि रचना दोघेही बघत होते. रचना एकदा रवी कडे आणि नंतर केबिनकडे नजर फिरवून पूजाच्या मागे जाऊ लागली. पूजा आपले ओले डोळे घेऊन तशीच धावत होती आणि मागे मागे रचना होती... पळत पळत पूजा कुठे जात होती हे तिला सुद्धा माहिती नव्हतं. रस्त्याच्या कडेला ती एका ऑटावाल्याला थांबवली. मागून रचना येऊन तिला म्हणाली.
रचना -" मी पण येऊ शकते का?"
पूजा रचनापासून लपवत डोळे पुसत म्हणाली.
पूजा -" हो...का नाही?...????"
दोघेही ऑटोमधून जात होते. रचना ऑटोवाल्याला अॅड्रेस सांगून परत पूजा कडे वळाली.
रचना -" अरे तू ऑफिसला सगळ्यांना का नाही भेटलीस?"
पूजा -" अग .. एक महत्वाचं काम लक्षात आल म्हणून ..."
रचना -" म्हणून डोळ्यातून पाणी आल वाटत..."
पूजा -" नाही ग ... खरच एक महत्त्वाचं काम आहे."
रचना -" बर बर ... माझ्यासाठी तुझ्याकडे १० मिनिटे आहे का?"
पूजा -" का ग?" रचना -" तस नाही... सहजच.."
पूजा -" म्म म... ओके.."
ऑटो अचानक थांबल.
रचना -" चल... "
पूजा -" इथ???"
रचना -" हो..."
बीचवर खुप सारे लोक होते. सगळे आपापल्या धुंदीत होते. कोणी बीचवर फिरत होते . कितीतरी कपल्स तिथे फिरायला म्हणून आले होते . रचना पूजाला सुद्धा तिथे घेऊन आली होती. रचना पुजाच हाथ पकडून म्हणू लागली.
रचना -" चल... "
दोघेही बीचवर फिरत होते.
रचना -" पूजा ... एक विचारू?"
पूजा -" हो विचार की.."
रचना -" तू खरच या लग्नासाठी तयार आहेस काय?"
पूजा -" अस का विचारत आहेस?"
रचना -" अग तू उत्तर तर दे..."
पूजा मान खाली घालून म्हणाली
पूजा -" हो..."
रचना -" खरच??"
पूजा -" हो ग..."
रचना -" मग ऑफिसमधून रडत का आलीस?"
पूजा -" मी कुठ रडत आले ?"
रचना -" पूजा बस कर ... किती फसवशील???... तू मला नाही तर स्वतः ला फसवत आहेस..."
एका क्षणासाठी पूजा शांत बसली. समुद्राच्या त्या लाटेकडे बघत ती म्हणाली.
पूजा -" अॅक्च्युअली आय लव अर्णव ????????..."
रचना हे ऐकूनच उडाली. तिला कधी एकदा अर्णवला फोन करू अस झालं होत... पण ती ठरवली की नको, प्रत्येक्षात त्याचा रिअँक्शन कसा असेल हे बघावे.... म्हणून रचना आपल्या मनाला सावरली. पूजा मात्र शून्यात बघत होती. न राहवून रचना म्हणाली.
रचना -" मग प्रॉब्लेम काय आहे?"
पूजा -" त्याच्या मनात माझ्याबद्दल काय आहे माहिती नाही... आणि बहुतेक तो दुसऱ्या कुणासोबत तर रिलेशशिपमध्ये आहे.."
रचना -" तुला अस का वाटलं?"
पूजा -" कारण आज ऑफिस मध्ये बघितलीस ना... की बॉस त्याला एका मिनिटासाठी पण सोडत नव्हती आणि याचा अर्णवला काहीच प्रॉब्लेम नव्हता...????????"
ही गोष्ट रचनाला सुद्धा पटल. 'तो काल रात्री कुठे होता ?.. कुणासोबत होता?... माहिती नाही... आणि आज सकाळी अचानक तो प्रीती ( बॉस) सोबत आनंदात येतो.. म्हणजे दाल में कुछ काला है.... हे गोष्ट फक्त एक जण सांगू शकतो. तो म्हणजे खुद्द अर्णव... मी त्याच्याशी कन्फर्म केल्याशिवाय पूजाला काही सांगू शकणार नाही...' पूजा खाली मान घालून बसलेली होती. तिच्या गालावरून अश्रू खाली येत होते. हे वेदना रचना सुद्धा अनभवू शकत होती. रचनाला खुप वाईट वाटल , तिच्या खांद्यावर हात ठेऊन म्हणू लागली.
रचना -" डोन्ट वरी... सगळं काही ठीक होईल..."
पूजा तिच्याकडे बघू लागली आणि स्मित करत म्हणाली.
पूजा -" रचना एक विचारू ?"
रचना -" विचार ना.."
पूजा -" माझ्यासोबतच अस का होत ग ?... लहानपणापासूनच माझ्याजवळ बाबा नव्हते. नंतर मग आयुष्याच्या वेगळयाच वळणावर मी गेले. तिथून मग तुम्ही आणि अर्णव एक नवीन उमेद घेऊन माझ्या जीवनाची दिशाच बदलली. मग मला बाबसुद्धा मिळाले. पण एका अटीवर ज्यात माझी मर्जी नाही.. पण बाबांचं प्रेम मिळवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे... पण या प्रेमाचं काय???... एक प्रेम मिळवण्यासाठी मला दुसरं प्रेम गमवावे लागणार आहे..????????????"
पूजा हुंदके देत रडु लागली. रचना तिला मिठीत घेऊन समजावू लागली...
रचना -" पूजा... श्श... शांत हो बघू... सगळं ठीक होईल..."
तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. पूजाच्या मोबाईल वर बाबांचं फोन आला होता. ती पटकन डोळे पुसून कॉल रिसिव्ह केली.
पूजा -" हा बाबा ... हो आलेच..."
पूजा कॉल कट करत म्हणाली.
पूजा -" रचना ... चल बाय... काम आहेत... परत भेटू... लग्नाला यायचं ह... निघते..."
रचना ला मात्र अजिबचं वाटलं .
रचना -" ओके... अँड टेक केअर.... सगळं चांगलं होईल..."
पूजा -" नशिबात काय लिहिलंय माहिती नाही रचना ..."
एवढं बोलून ती गेली. इकडे मात्र रचना आता बीचवर विचार करत बसलेली होती. शेवटी ती सुद्धा ऑफिसला निघाली. पण रागात... अर्णव चा तिला खूप राग आला होता... ती त्याला आता जाब विचारणार होती... ऑटावाला ऑफिसच्या बाहेर थांबवला. रचना त्याला पैसे देऊन रागा रागात ऑफिसमध्ये जाऊ लागली.
रचना -" आता बघतेच त्या अर्नवच्या बच्चुला...????????????"
रचना अर्नवला शोधू लागली. मात्र तो कुठेच नव्हता. रचना रवीच्या केबिन जवळ येऊन रवी ला म्हणाली. रचना -" रवी.... अर्णव कुठे आहे?..????????"
रवी तिच्या रुद्र अवतार बघून थबकलाच .
रवी -" का ?" रचना -" तू सांगणार आहे का नाही?.... मग तू मार खाणार आहेस..????????"
रवी -" अग झालं तरी काय???..."
रचना -" तू आधी सांग... तो कुठे आहे?"
रवी -" अग तो अजुन बॉसच्या केबिनमधेच आहे."
रचना -" काय?????????"
रवी -" हो..." रचना -" एवढ उशिरापर्यंत काय करत आहेत आत दोघ ??..."
रवी -" काम असेल ग..."
रचना -" अरे पण एवढं... थांब त्याला येऊदेच सांगते बरोबर त्याला..."
रवी -" अग पण झालं तरी काय ?."
रचना - " तो आल्यावरच कळेल तुला..."
रचना आणि रवी दोघेही अर्णव यायचा वाट बघत होते... न राहवून रचना म्हणाली...
रचना -" रवी... चल आपण जाऊयात केबिन मध्ये..."
रवी -" अग काय एवढं घाई... येईल ना तो.."
रचना -" तू येणार आहेस का नाही?"
रवी -" बर बाबा... चल .."
दोघेही केबिनमध्ये जात असतानाच त्यांना मागून एक आवाज आला. " रचना बेटा..." पूजाचे बाबा ऑफिस मध्ये आले होते.
रचना -" अंकल... तुम्ही इथे???"
अंकल -" का??... येऊ नये का?"
रवी -" नाही... तस नाही...पण अचानक आलात ना.. म्हणून विचारली ती..????????"
रचना -" हो अंकल .."
तिघेही बोलत असताना अर्णव केबिन मधून बाहेर आला.
अर्णव -" अरे अंकल... तुम्ही इथे??"
रचना मात्र त्याला मारण्याच्या नजरेने बघत होती.
अंकल -" अरे विशेष नाही... तुम्हाला माहितीच असेल की.. पूजाच लग्न ठरलय ते..."
पूजाच लग्न अस म्हणाल्यावर तर अर्णवचा चेहरा मात्र उतरला.
रवी -" हो माहिती आहे ना... आजच सकाळी ती पत्रिका देण्यासाठी आली होती."
अंकल -" हो का ?... पण मग मला ना लग्नासाठी कपड्याची शॉपिंग करायची होती... अर्णव तुझ्या ओळखीची कोणती कपड्याचा शॉप आहे का??"
अर्णव -" हो आहे ना... "
अंकल -" मग आपण तिथेच शॉपिंग करूयात..."
अर्णव -" हो... चला मग... "
रवी -" अंकल तुम्ही व्हा पुढे आम्ही येतोच..."
अंकल -" ओके ओके... या लवकर मी गाडी काढतो.."
अंकल गेल्यावर तो अर्णव ला म्हणाला .
रवी -" अर्णव... तू पूजाच्या लग्नाचं शॉपिंग करण्यासाठी चाला आहेस..."
अर्णव -" हो..."
रवी - " पण का??"
अर्णव -" मला वाटतं ना ती कुठ पण असो , पण सुखी असो... आणि आपल्या नशिबातच ती नाही आहे तर ... काय करणार..????????"
रचना मनातल्या मनात म्हणाली ' ह्म म... नशिबात आता वेगळीच आली आहे ना म्हणून..????????" अर्णव -" कमीतकमी पूजाच्या लग्नासाठी तर काही काम करूयात..." तेवढ्यात ऑफिस समोर गाडी आली. अंकल हॉर्न वाजवू लागले.
अर्णव -" रवी येणार आहेस??.."
रवी रचना कडे बघत म्हणाला..
रवी -" हो आम्ही दोघेही येत आहोत..."
रचना त्याच्याकडे रागातच बघू लागली. तिघेही गाडीत बसले. अर्णव अंकलला दिशा दाखवत होता. शेवटी तो शॉप जवळ येऊन थांबवला. काही वेळानी पूजा सुद्धा तिथे आली. पूजा आणि अर्णव ची एका क्षणासाठी नजरेला नजर भिडली. नंतर लक्षात आल्यावर अर्णव सगळ्यांना शॉप मध्ये घेऊन गेला. शॉप मध्ये खूप सारे लोक खरेदी साठी तिथे आलेले होते. लग्नाचं सीजन असल्यामुळे तिथे खूपच गर्दी झाली होती. अर्णव सलीम भाई ला बोलावून घेतला आणि सर्व काही सांगितला की अंकल ओळखीचे आहेत. जरा सांभाळून वैगरे ... काही काळानंतर पाहुणे मंडळी सुद्धा आली. त्यात नवरा मुलगा सुद्धा आलेला होता.
तो मात्र एकदम चकचकीत होऊन आलेला होता ... त्याच नाव करण... दिसायला बरा होता .. उंची सुद्धा बरीच होती. सगळे शॉपिंग करत होते. इकडे मात्र रचना अर्णव ला रागातच बघत होती. सगळे काही मजेत चालेले होते . पण दोन जीव अस पण होत की ते एकमेकांना सोडून जगू शकत नव्हते. अर्णव आणि पूजा नजरेचे लपंडाव खेळत होते. पण पूजाच लग्न ठरलं होत. करण पूजा जवळ जाऊन उभा राहिला. ती त्याला बघून स्मित करू लागली होती पण खोटं स्मित करत होती. अमन सुद्धा स्मित करत करत तिला हग करू लागला. हे मात्र अर्णवला सहन झालं नाही. तो नजर दुसरीकडे केला. दोघांचं जीव तडपडू लागलं होत...
दोघंही एकमेकांकडे बघत सुद्धा नव्हते . पण एकमेकांच ओढ मात्र होती. तेवढ्यात अर्णव चा फोन वाजला . स्क्रीनवर प्रीतीच नाव झळकत होत... रचना ते बघताच अजुन रागात आली. अर्णव कॉल रिसिव्ह केला..
अर्णव -" हॅलो..."
********************************
क्रमशः
ऋषिकेश मठपती
( पुढील भाग लवकरच... हा भाग आवडल्यास नक्की कळवा ... कमेंट करा ... काही चुकीचं वाटल तर नक्की कळवा...आजकाल बिझी असल्याने भाग यायला उशीर होत आहे... त्या बद्दल माफी असावी... आणि नक्की शरे करा ... धन्यवाद...????????... )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा